चटकदार कांद्याची चटणी -Lockdown Recipe
साहित्य :
३ मोठया आकाराचे कांदे ( बारीक चिरलेले )
२० ते २५ लसूण पाकळ्या ( बारीक ठेचलेल्या )
१/२ छोटा चमचा हळद
२ मोठे चमचे लाल मिरची पावडर
३ ते ४ चमचे तेल
चवीनुसार मीठ Maza Blog
कृती:
सर्वप्रथम एका भांड्यात तेल तापवून त्यात ठेचलेला लसूण घालणे व थोडा परतून घेणे त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून घेणे कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घेणे त्यानंतर हळद व नंतर मिरची पावडर घालून घेणे व परतून घेणे त्यानंतर मीठ घालणे आणि पुन्हा सगळे व्यवस्तीत परतून घेणे आता भांड्यावर झाकण ठेवणे व २ ते ३ मिनिटे कांदा शिजू देणे ..
अशी हि छान झणझणीत कांद्याची चटणी तयार
तांदुळाच्या अथवा कुठल्याही भाकरी सोबत किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावायला छानच लागते .. Maza blog
चटपटीत व कुरकुरीत कारली
साहित्य:
5 कारली
सुकं खोबरं एक वाटी
तीळ एक मोठा चमचा
जिरं एक मोठा चमचा भाजलेलं
पाव चमचा काळे मीठ
चाट मसाला एक मोठा चमचा किंवा जलजीरा
मिरची पावडर 1 मोठा चमचा… Maza blog
कृती:
• कारल्याची फक्त देठं काढून एकसारखे काप (बारीक गोलाकार चकत्या) करावेत .
• उकळत्या पाण्यात एक चिमुट हळद व एक चिमुट मीठ घालून कारल्याचे काप टाकावेत .
• झाकण ठेवून पाच मिनिटं सळसळ उकळून घ्यावेत . नंतर चाळणीत किंवा रोवळीत ओतून पाणी काढून टाकावं . त्यावर लगेच गार पाणी ओतावं . पाणी पूर्णपणे निथळल्यावर तुकडे मुठीत दाबून पाणी काढून टाकावं .
• हे करताना तुकडे मोडू देऊ नयेत. ते सर्व तुकडे कागदावर दहा मिनिटं पसरावेत .
• एक ते दीड डाव तेल गरम करून कारल्याचे तुकडे चुरचुरीत-कुरकुरीत तळून काढावेत .
• तिखट , मीठ , हळद , हिंग, आमचूर , जिरेपूड , कोथिंबीर, चाट मसाला, खोबरा किस टाकून चांगले एकजीव करावे…Maza Blog Recipe
Author : Snehal, Ahmednagar

मिसेस स्नेहल ह्यांची केक रेसिपि वाचा
तुम्ही देखील ब्लॉग लिहू शकता. जर तुमच्या कडे तुमच्या स्वतःचे काही लेखन असेल व तुम्ही ते इंटरनेट वर टाकू इच्छित तर आम्हाला मेल करा. आम्ही कोणतेही मूल्य न घेता तुमचे लेखन आमच्या वेबसाईट वर प्रकाशित करू. – माझा ब्लॉग
Nice one….