नव्या नवरीने ने घ्यायचे उखाणे- Marathi Ukhane
1)पतिव्रतेचे व्रत घेऊन सर्वांशी प्रेमाने वागेन
.. रावांचे नाव घेताना तुम्हा सर्वांचे आशीर्वादच मागेन
2)ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल,
… रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल
3)कृष्णाने पण केला, रुक्मिणीलाच वरीन,
… रावां सोबत जगताना आदर्श संसार करीन.
4)शुभमंगल झाले अक्षदा पडल्या माथी
.. राव आता मी तुमची सात जन्मासाठी
5)अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी,
आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे..रावांची राणी.
6) नील नभाच्या तबकात नक्षत्रांचा हार,
… राव मला आवडतात फार
7) गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी,
…रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी.
गृह्प्रवेशाला घ्यायचे उखाणे
1)स्वर्गीय नंदनवनात सोन्याच्या केळी
.. रावांचे नाव घेते गृह्प्रवेशाच्या वेळी
2)तिन्ही लोकात श्रेष्ठ ब्रम्ह, विष्णू, महेश
.. रावांचे नाव घेऊन करते गृहप्रवेश
3)घरी टाकले पाऊल नववधू बनून
सर्वांच्या भीतीने जीव गेला बावरुन,
…रावांची साथ आणि सासरच्यांचा पाठिंबा पाहून
भीती.. छे केव्हाच गेली पळून!
4)1.. 2… 3… .. रावांचं नाव घेते करा मला फ्री
मोठे उखाणे
1)हंड्यावर हंडे सात
त्यावर ठेवली परात
परातीत होते सातू
सातूचा केला भात
भातावर वरण, वरणावर तुपाची धार
तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा
जोड्यात हलगडी, हलगाडीत बलगडी
बलगडीत पिंजरा, पिंजर्यात रघु
राघूच्या तोंडी उंबर… रावांचं नाव ऐकलंत ना, मग काढा रुपये शंभर..
2)सासरचा गाव चांगला
गावामध्ये बंगला
बंगल्याला खिडकी, खिडकीत द्रोण
द्रोणात तूप, तुपासारखं रूप
रूपासारखा जोडा, चंद्रभागेला पडला वेढा
चंद्रभागेची पाच नाव, नावेत बसावं
आणि.. रावांनी देहू, आळंदी, पंढरपूर फिरवावं