भारतामध्ये चहा पिण्याचा ट्रेंड खूप जास्त आहे. सकाळी उठल्याबरोबर चहा पिल्यावरच दिवसाची सुरुवात करतात. तसेच अनेक लोकांना चहासोबत काहीतरी खायला आवडते. पण चहा बरोबर काही गोष्टी खाण्याच्या टाळल्या पाहिजेत. जाणून घेऊयात कोणत्या गोष्टी चहा सोबत खाऊ नये. जगभरात प्रत्येक दिवसाची सुरुवात ही कडक आणि फक्कड चहाच्या घोटाने होते. चहा पिल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि ताजेतवाने वाटू लागते. सकाळ, संध्याकाळ घेतलेला चहाचा प्रत्येक कप ऊर्जा देतो. दुधाचा चहा या व्यतिरिक्त अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या चहाचे सेवन लोक करतात.
चहा चहापत्ती चहा पावडर चहापाणी प्या पण ही पथ्ये पाळा.
ब्लॅक टी , ग्रीन टी ,कॅमोमाइल आणि हिबिस्कस टी असे अनेक चहाचे प्रकार पडतात. काहींना चहासोबत बिस्कीट खायला आवडतात. तर काहींना पोहे, भजी ,बेकरीचे पदार्थ इत्यादी .सकाळचा चहा असो व संध्याकाळचा . चहा बरोबर अनेकांना काहीतरी खायला आवडते . असे काही पदार्थ आहेत ते चहा बरोबर खाणे टाळावे. त्याने आरोग्यास हानी होऊ शकते.
तर असे कोणते पदार्थ आहेत जे चहासोबत खाणे टाळले पाहिजेत ते आपण जाणून घेऊयात.
चहा चहापत्ती चहा पावडर चहापाणी प्या पण ही पथ्ये पाळा .
सुका मेवा :
दुधाबरोबर लोहयुक्त पदार्थ खाणे टाळावे. सुका मेव्यात लोहाचे प्रमाण भरपूर असते . त्यामुळे चहा बरोबर सुका मेवा खाल्याने आरोग्यास हानी होऊ शकते . म्हणून चहा सोबत सुका मेवा खाणे टाळावे.
लोहयुक्त भाज्या :
चहा बरोबर लोहयुक्त पदार्थ खाऊ नये. कारण चहा मध्ये ऑक्सिलेट आणि टॅनिन हे पदार्थ असतात. जे लोहयुस्क्त पदार्थ शोषून घेण्यापासून प्रतिबंध करतात.त्यामुळे हिरव्या पालेभाज्या , सुका मेवा, तृणधान्य , कडधान्य याच सेवन चहा बरोबर कधीच करू नये.

लिंबू:
शारीरिक फिटनेस ठेवण्यासाठी वजन नियंत्रण कार्यक्रमामध्ये लिंबू टाकून चहा पिण्यासाठी सांगतात . बऱ्याच लोकांना असे वाटते कि ,लिंबू टाकून चहा घेतला तर वजन खरंच कमी होते.
परंतु चहा मध्ये लिंबू मिसळले तर ऍसिडिक बनते आणि पोटात जळजळ होते. तसेच सकाळी रिकाम्या पोटी लिंबू – चहा पिल्याने ऍसिड रिप्लक्स आणि छातीत जळजळ होते . त्यामुळे असा चहा पिणे टाळावे.
चहा चहापत्ती चहा पावडर चहापाणी प्या पण ही पथ्ये पाळा. .
बेसन :
भजी किंवा बेसन पिठापासून तयार होणाऱ्या पदार्थाचे चहाबरोबर सेवन करणे ही भारतामध्ये सामान्य बाब आहे .आपल्यामधले बरेच लोक असं करतात . परंतु तज्ज्ञांचे मत आहे कि ,
असे सेवन केल्याने पचन तंत्रावर ताण येतो . त्यामुळे शरीराची पोषक तत्वे शोषून घेण्याची क्षमताही कमी कमी होत जाते. त्यामुळे असे सेवन करणे टाळावे.
हळद :
चहा बरोबर हळद असलेले पदार्थ खाऊ नये. त्यामुळे गॅस , बद्धकोष्ठता अश्या वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात . चहाची पाने आणि हळद एकमेकांना सुसंगत नाहीत . म्हणून चहासोबत हळद असलेल्या पदार्थाचे सेवन करू नये.
चहा चहापत्ती चहा पावडर चहापाणी प्या पण ही पथ्ये पाळा.
थंड पदार्थ :
गरम चहासोबत किंवा चहा पिल्यानंतर लगेच थंड पदार्थ कधीही खाऊ नये. काहींना चहा घेतल्या नंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते .पण असे केल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात . याचे कारण म्हणजे वेगवेगळ्या तापमानाचे पदार्थ एका वेळेस खाल्याने पचन क्रिया कमकुवत होते आणि मळमळ सुरु होते. त्यामुळे गरम चहा पिल्यानंतर किमान ३० मिनिटे तरी थंड काहीच खाऊ किंवा पिऊ नये.