सार्थ श्री संत तुकाराम गाथा मराठी अर्थ सहित
::- अभंग क्र.१०१८ -::

::- तुकाराम गाथा अभंग क्र.१०१८ -:: मराठी अर्थ
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात – या कलियुगामध्ये मुखाने हरीचे नाम गावा त्याच्या आनंदात नाचावे व टाळी वाजवावी एवढेच एक मुख्य साधन आहे. या हरिनामाने आजपर्यंत कितीतरी असे महान पापी तरले गेलेले आहेत त्याकरता मी हे लोकांना तुम्हाला सांगतो की तुम्ही या आपल्याकडे आयत्या आलेल्या हरी नामरूपी नावेत बसा व आपले कल्याण करा.विठोबाचे या पांडुरंगाचे नाम घेण्यास कोणत्याही प्रकारचे कष्ट करावे लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या अंतकाळी हेच एक शस्त्र तारू शकेल.
जय जय विठोबा रुक्माई l विठोबा रुक्माई l l जय जय विठोबा रुक्माई l विठोबा रुक्माई l l
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल l जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल ll
अभंग क्र.१०१८ मराठी अर्थ समाप्त
::- अभंग क्र.१०१९ -::

सर्वकाळ माझे चित्ती l हेचि खंती राहिली l l १ l l
बैसले ते रूप डोळा l वेळावेळा आठवे l l २ l l
वेव्हाराची सरली मात l अखंडित अनुसंधान l l ३ l l
तुका म्हणे वेध झाला l अंगा आला श्रीरंग l l ४ l l
::- अभंग क्र.१०१९ -:: श्री संत तुकाराम गाथा मराठी अर्थ सहित
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात – “माझ्या चित्तामध्ये हरीच्या भेटीची एकच तळमळ लागलेली आहे.।।१।।
श्रीहरीचे रूप माझ्या डोळ्यामध्ये भरले आहे व मनात ठसले आहे, त्याचाच वारंवार आठव होतो.।।२।।
आता व्यवहाराची गोष्ट बोलावयाचे थांबले आहे, कारण हरीच्या रूपाचे अखंड अनुसंधान लागले आहे.।।३।।
मला श्रीरंगाचा वेध लागला आणि मी श्रीरंगाशी एकरूप झालो.”।।४।।
जय जय विठोबा रुक्माई l विठोबा रुक्माई l l जय जय विठोबा रुक्माई l विठोबा रुक्माई l l
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल l जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल ll
सार्थ श्री संत तुकाराम गाथा मराठी अर्थ सहित
अभंग क्र.१०१९ मराठी अर्थ समाप्त
आपला सेवक:-
श्री ज्ञानेश्वर माऊली खंडागळे
मो:९९२१६००८३०
दि.०६/०८/२०२२
वार-शनिवार