निबंध माझी आई

निबंध माझी आई

आपल्या जीवनात आपला पहिला गुरू म्हणजे ‘आई ‘ . जी आपल्याला लहानपणी बोट धरून चालायला शिकवते . आईची सर जगातील कोणालाच येऊ शकत नाही.’ स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ‘ असे आपण म्हणतो . आईची माया हि अगाध आहे . या आई बद्दल आपणा सर्वांना आदर असतो. आपल्या आयुष्यात कधी दुःख असोत ,संकट येवोत किंवा ठेच लागलेली असो तोंडातले सगळ्यात पहिले उद्गार आईच असते. आज आपण माझी आई या विषयावर निबंध बघणार आहोत.मराठी निबंध आई माझी आई निबंध लेखन

प्रस्तावना:

प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाची व्यक्ती असते , ती म्हणजे – ‘आई ‘. आई हा शब्द अत्यंत साधा आणि सोपा आहे . परंतु त्याच शब्दामागे अपरंपार माया , प्रेम ,वात्सल्य हे सगळं दडलेल आहे.
एक संपूर्ण जगच या शब्दामध्ये सामावलेल आहे असं म्हणता येईल. .आपल्याला जन्म देऊन या सुंदर अश्या जगात आणणारी आई ही ईश्वराचं रूप आहे. ईश्वर हा प्रत्येक ठिकाणी नाही राहू शकत.म्हणून त्याने आईला बनवले.आणि म्हणूनच आईला ईश्वराचं दुसरं रूप समजलं जात.

आई म्हणजे:

आई म्हणजे वात्सल्याचा सतत वाहणारा झरा . तसेच आई म्हणजे – ममता,प्रेम , आत्मा आणि ईश्वराचा संगम आहे. मायेची ऊब देणारी स्त्री म्हणजे आई होय.आई हा एक नुसता शब्द नव्हे ,
तर ती एक सुंदर अशी भावना आहे. म्हणून म्हटले आहे , आईसारखे दैवत साऱ्या जगामध्ये नाही. तसेच साने गुरुजी यांनीही म्हणले आहे , आई माझा गुरु आई ही कल्पतरू.मराठी निबंध माझी आई माझी आई निबंध लेखन

माझी आई:

आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहे ती म्हणजे आई . आपण आईचा नेहमी आदर करावा .आपली आई हि आपल्या आयुष्यातील सर्वात पहिला गुरु आहे.आपली आई ही नेहमी आपली काळजी घेते .आपल्यासाठी सर्व काही अर्पण करते. आपली आई आपण उठण्या पूर्वीच तिच्या नेहमीच्या कामांना सुरुवात करते .तसेच आपल्या सर्वांसाठी गोड खाद्य बनवते.जरी ती तिच्या कामात व्यस्त असली तरी आपल्या साठी वेळ काढते. आपल्याबरोबर खेळते .तसेच शाळेतला अभ्यास करण्यास मदत करते.तसेच अन्य उपक्रमांमध्ये पण मला मार्गदर्शन करते.

मेहनती व कष्टाळू :

आपली आई ही खूप कष्टाळू आणि मेहनती आहे. ती सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काम करत असते. ती नेहमी घरातल्या व्यक्तींसाठी झटत असते.तरीही तिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असते . आपण ही तिच्या कडूनच शिकतो कि, कठीण परिश्रम आपल्याला यशस्वी बनवते . आपल्या घरामध्ये कोणाला बर नसतं तेव्हा तीच त्यांची काळजी घेते .मराठी निबंध माझी आई माझी आई निबंध लेखन

निबंध माझी आई

संस्कार:

आई ही संस्काराची शिदोरी असते. आपली आई लहानपणापासून आपल्यावर चांगले संस्कार करते . वेदना होताना पहिले ओठावर येणार शब्द म्हणजेच – आई.संकटाच्या वेळी साथ देणारी आणि दुःख सोसून सुखात ठेवणारी ही पण आईच असते. आई आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. तिने केलेले संस्कार , तिने दिलेले बळ ,महत्वाकांक्षा ,आणि संकटांवर मात करण्याची शक्ती . ही अनमोल अशी शिदोरी जगण्याचं साधन आहे. मराठी निबंध माझी आई माझी आई निबंध लेखन

आई मायेचा सागर :

खरंच आई ही मायेचा अथांग असा सागर आहे. या विषयावर अनेकांनी काव्ये , कविता आणि निबंध लिहिले आहेत. रामायणातील श्री प्रभू रामचंद्रांनी स्वर्णमयी लंकेपेक्षा आणि स्वर्गापेक्षा आपली जन्म भूमी अयोध्या याला सर्वश्रेष्ठ मानले आहे. त्यांनी आपल्या जन्मभूमीची बरोबरी आईबरोबर केली आहे.मराठीमधील प्रसिद्ध कवी यशवंत यांनी आपल्या कवितेमध्ये ”स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी” ही ओळ लिहून आईची महानता वर्णन केली आहे.

निष्कर्ष:

आई ही एक व्यक्ती नसून आपल्या जीवनाचा आधार स्तंभ आहे. या जगामध्ये आईची तुलना कधीच कोणाशी करता येणार नाही . आणि तिची जागापण दुसरं कोणीच घेऊ शकत नाही.
म्हणून प्रत्येकाने आपल्या आईवर खूप प्रेम करावे . आणि देवाजवळ तिच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी .मराठी निबंध आई माझी आई निबंध लेखन

Post Office Vima फक्त ₹ 399 ची विमा योजना

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *