माहिती:
शाळा हे असे ठिकाण आहे जिथे आपण खूप शिकतो आणि अभ्यास करतो . त्यालाच ज्ञानाचे मंदिर असेही म्हणतात. आपण सर्वजण आपल्या आयुष्याचा बराचसा वेळ आपल्या शाळेत घालवतो,
आपण आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा वेळ आपल्या शाळेत घालवतो. आपल्या शाळेशी आपल्या खूप आठवणी जोडलेल्या असतात .म्हणूनच प्रत्येकाच्या आयुष्यात आपली शाळा खूप महत्वाची असते .माझी शाळा हा असा विषय आहे, जो अनेकदा निबंध , कविता लिहायला दिला जातो. शाळेतील शिक्षक त्यांचे ज्ञान देऊन आम्हाला यशाचा योग्य मार्ग दाखवतात.
आज या लेखात आम्ही विद्यार्थ्यांसाठी माझी शाळा या विषयावर निबंधलेखन दिला आहे.निबंध माझी शाळा निबंध लेखन माझी शाळा निबंध लेखन
बऱ्याचश्या मुलांना निबंध लेखनाचे काम आवडते . कारण निबंधाला कोणत्याही उत्तरांची घोकंपट्टी करावी लागत नाही . आणि निबंध स्वतः लिहू शकतात. कनिष्ठ शाळेमध्ये या स्तरावर,
मुलांना निबंध लेखनासाठी परिच्छेदांमध्ये अर्थपूर्ण वाक्य कसे ठेवायचे आणि लिहायचे ते शिकवले जाते. कनिष्ठ शाळेतील या मुलांना त्यांच्यासाठी निबंध लेखन अधिक मनोरंजक
बनवण्यासाठी हा नमुना निबंध आम्ही घेऊन आलो आहोत .निबंध माझी शाळा निबंध लेखन माझी शाळा निबंध लेखन
मुलांना माझी शाळा या विषयावर परिच्छेद , निबंधलेखन लिहिण्यात अडचण येत असेल , तर एक महत्वाची टीप देखील आहे. जी तुम्ही फॉलो करून चांगल्या प्रकारे निबंधलेखन करू शकता.निबंधाचा संपूर्ण परिच्छेद लिहिण्यापूर्वी, आपल्या शाळेबद्दल काही महत्वाच्या ओळी किंवा मुद्दे बनवावेत. आम्ही तुम्हाला उदा . साठी एक यादी तयार केली आहे.ती यादी खालीलप्रमाणे आहे.

शाळा वर्णन :
माझी शाळा ही आमच्या गावातील सर्वात लोकप्रिय आणि उच्च दर्जाची शाळा आहे.माझ्या शाळेची इमारत खूप सुंदर, आणि प्रशस्त आहे. तसेच शालेय शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या अनेक वस्तूंनी सुसज्ज अशी आहे.माझ्या शाळेमध्ये एक मोठं मैदान आहे. आम्ही सगळे अनेक मैदानी खेळ तिथे खेळतो. आम्ही एकत्र मिळून अभ्यासही करतो.माझ्या शाळेतील वर्गशिक्षक तसेच बाकीचे विषय शिक्षक खूप प्रतिभावान आहेत. ते आम्हाला नेहमी नवीन गोष्टी शिकण्यास मदत करतात.आम्ही सगळे मिळून शाळेमध्ये वेगवेगळे सण साजरे करतो.आम्ही सगळे मिळून शाळेच्या ग्रंथालयात पुस्तके वाचतो. आमच्या शाळेचे ग्रंथालय खूप मोठे आहे.आमच्या शाळेत प्रयोगशाळा देखील आहेत.
सगळ्या प्रयोगशाळा ह्या सुसज्ज आहेत.मला रोज शाळेत जायला आवडते . कारण मी माझ्या मित्रांसोबत अनेक नवंनवीन गोष्टी शिकतो.आणि त्या आमलात आणतो .आमची शाळा शिस्तीच्या बाबतीत खूप कडक आहे. विद्यार्थ्यांचे गणवेश स्वच्छ आहेत का ? नखे कापली आहेत का? केस वाढलेले नाहीत ना ? हे सगळे पाहिले जाते. तसेच विद्यार्थ्यांच्या घरी मासिक अहवाल देखील पाठविला जातो.शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते. यावेळी मान्यवर व्यक्तीला बोलवले जाते. वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा आणि मनोरंजनाचे कार्यक्रम ही होतात. परीक्षेमध्ये तसेच खेळामध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्यास चांगले बक्षिस दिले जाते .निबंध माझी शाळा निबंध लेखन माझी शाळा निबंध लेखन
अशा प्रकारे आपणही माझी शाळा या विषयावर १० ओळी निबंधलेखन करू शकता .