निसर्ग कविता मराठी

परिवर्तनीय काळ सृष्टीचा | Best किमयागार निसर्ग कविता मराठी 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी प्रो डॉ प्रवीण( जी आर ) जोशी यांची -परिवर्तनीय काळ सृष्टीचा- हि एक निसर्ग कविता मराठी आहे

परिवर्तनीय काळ सृष्टीचा | निसर्ग कविता मराठी

परिवर्तनीय काळ सृष्टीचा | Best किमयागार निसर्ग कविता मराठी 2023

कोण पोसतो कावळा चिमणी
कोण पुरवतो दाणा पाणी
सृष्टीच्या या पंखा वरूनी
कंठ फुटता म्हणतो गाणी
।। 1 ।।



का पृथ्वी ही अधांतरी पण
कोण सहज तीजला तोलतो
अर्भकाच्या जन्मा नंतर
कोण श्वास भारून जातो
।। 2 ।।



मोठा भोपळा वेली वर का
लहान आवळा वृक्षावरी पण
मोठे वृक्ष उन्मळून पडती
महापुरात वाचतात तण
।। 3 ।।



मोठे मोठे शूरवीर असुनी
का हरला लंकेचा रावण
इवल्याश्या वनराने मग
केले भिमाचे गर्व हरण
।। 4 ।।



नद्या नाळे तुडुंब भरती
जलप्रपात का खाली पडतो
साचलेल्या घनजर्द मेघी
जलबिंदू कोण भरून देतो
।। 5 ।।



सृष्टी चराचर हीच ईश्वर
तुम्ही आम्ही आहोत नश्वर
साक्ष देतो प्रभात काळी
प्राचीचा तो सुर भास्कर
।। 6 ।।



स्त्री आधी का पुरुष आधी
कोण सांगेल याचे उत्तर
अनंत युगे कोण निर्मितो
तोच स्वामी बलवत्तर
।। 7 ।।



झाडे हलती फांद्या हलती
वृक्षराजी पण नाचत डोलती
अंगाला पण स्पर्श करता
फुलांचे मग गंध दरवळती
।। 8 ।।



पंचभूतांच्या पंच तन्मात्रा
सहज सृष्टीस का निर्मिती
अनादी अनंत परंपराही
जगी जीवात्मा घडवीती
।। 9 ।।


रोज नव्याने निसर्ग असा
मुक्त हस्ते उधळण करतो
रवी चंद्राच्या कलाकलाने
नवीन रंग सहजच भरतो
।। 10 ।।



पृथा फिरते सूर्या भोवती
चंद्र पृथें मागेच धावतो
नक्षत्रांचा पुष्पहार घेउनी
रजनीकांत ऐटीत फिरतो
।। 11 ।।



दिवसामागे दिवस सरते
चंद्र सूर्याचे गणित तसे
पृथेच्या ह्या संध्याकाळी
क्षितीवरती प्रभा दिसे
।। 12 ।।



ग्रीष्मऋतु तापते धरती
अवतांण देई पावसाला
थेंब होऊन प्रेम बरसतो
मृदुगंध होऊनि विश्वाला
।। 13 ।।

मोती सर मातीत मिळता
उबदार झेलते ओंजळीत
फुटती घुमारे त्या कोंबला
नव सृजनाच्या दिठीत
।। 14 ।।



प्रकृती पुरुष सिध्दांत वसे
अद्वैताच्या त्या पलीकडे
जीवन रहाटी अशीच असते
अनादी अनंत जगाकडे
।। 15 ।।



पुनवेचा चंद्र उगवतो
धरती शीतल करायला
हा कोणता न्याय जगी या
उधाण का येते सागराला
।। 16 ।।



बाल वृध्द तारुण्य अवस्था
नियम असे जीव जगताचा
जन्मणार तो लयास जातो
परिवर्तनीय काळ सृष्टीचा
।। 17 ।।

परिवर्तनीय काळ सृष्टीचा | Best किमयागार निसर्ग कविता मराठी 2023

किमयागार निसर्ग कविता मराठी 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

16 thoughts on “परिवर्तनीय काळ सृष्टीचा | Best किमयागार निसर्ग कविता मराठी 2023”

  1. भालचंद्र चितळे

    प्रवीण सर, छान कविता. निसर्गवर्णन

  2. डॉ. निशिकान्त श्रोत्री

    निसर्गाची अनुभूती देणारं सुंदर काव्य!

  3. नितांत सुंदर अशा निसर्गकाव्यातून अद्वैताच्या तत्वज्ञानाला गवसणी घालणारी उत्कृष्ट कविता

  4. क्षितिज कुलकर्णी

    आगळ्या भाषेत अद्भुत सत्य मांडणारी कविता…

  5. रविकांत शार्दूल नाशिक

    दीर्घ काव्य रचना….
    प्रत्येक कडवे सुविचार वाटावा असा आहे.
    म्हणजे १७ सुविचारांची कविता वाचण्याचा आनंद मिळतो.
    अर्थात मतप्रवाह वेगळा असला तरी कवीनी अधोरेखित केलेली भावना अभ्यासात्मक आहे. मनःपूर्वक शुभेच्छा!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
29 − 22 =