निसर्ग कविता 2023

ओल्या मातीचा गंध | किमयागार निसर्ग | Best निसर्ग कविता 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी Prachi Parchure Vaidya यांची -ओल्या मातीचा गंध – हि कविता -किमयागार निसर्ग- या विषयावर असून हि एक निसर्ग कविता आहे

ओल्या मातीचा गंध | निसर्ग कविता 2023

ओल्या मातीचा गंध | किमयागार निसर्ग | Best निसर्ग कविता 2023

त्रासले सारे आता
वैशाख वणव्याने
तप्त उन्हाच्या झळांनी
कासावीस झाली मने

गंध मातीचा आज
श्वासात बिलगला
वसंताचे आगमन होताच
तो क्षण अजून बहरला

मनातला वणवा
पावसाने पेटवला
मातीच्या सुगंधाने
आत्मा थंडावला



ढगाळला आकाश
सुटला थंडगार वारा
कोसळल्या धारा
सुगंधात फुले मोर पिसारा

शांतवीत तगमग
आली अवकाळी सर
फूल मातीचे सुगंधी
गंध स्वार वाऱ्यावर

जेव्हा वृक्षांची तोड होते
तेव्हा गंध मातीचा येतो
अवणीच्या कुशीत शिरून
अवशेष धुमसत रडतो



वन्यप्राण्यांच्या व्यथा ऐकता
जीव कासावीस होतो
गंध मातीचा येतोय आता
भावनांचा कल्लोळ माजतो

गंध मातीचा दरवळतो
जुळते मातीशी नाते
सैनिक असो वा शेतकरी
त्यांच्याशीच नाते जपते

सुटता मंद वाऱ्याचा झोत
उल्हासित होई मन
सुखद गारव्याने आता
सर्व सुखावती जन



अवखळ बाळासम
पक्षी खेळती मातीत
पंख उभारून सारे
थेंब टपोरे झेलीत

जीव भावणारा गंध
आसमंती दरवळ
चराचरी पसरली
मखमली हिरवळ

बहरल्या वेली फुलांनी
पानापानांतून डोकावत
दरवेळी फुले सुगंधाने
गंधीत झाला आसमंत



नाते ओल्या मातीचे
फुलते वृक्षवल्लीतून
अंकुरतात बीज छान
पहा राना रानातून

गंधीत होते गंधवती
सजते मोहक रुपाने
गंध ओल्या मातीचा
मनात बहरतो आनंदाने

इंद्रधनू दिसे नभात
चैतन्य येई धरणीवर
नको नको हा उन्हाळा
हवी सरीवर सर

धरणीवर पडताच
टप टप थेंब पावसाचे
ओल्या मातीच्या सुगंधाने
खुले रूप निसर्गाचे



किती वर्णावे गुपीत
निसर्गाच्या सोहळ्याचे
वसुंधरा ल्याली साज
हिरवाई सोहळ्याचे

मृगाच्या पहिल्या पावसाने
पशुपक्षीही आनंदले
शेतकऱ्याच्याही चेहऱ्यावर
हास्याची लकेर खुले

फिके अत्तर ही पडे
गंध यावा तो मातीचा
झाडा झाडांत घुमावा
पावा मंजुळ वाऱ्याचा



पिकांचे गाणे गातो
काळ्या आईचा गंध
लावतो जणू मनाला
दरवळणारा सुगंध

काळ्या मातीचा गंध
सुगीची चाहूल देतो
बळीराजाला पिकांचा
आनंद देऊन जातो


शेताचे पाहिलेले हिरवे स्वप्न
पूर्ण होईल लवकर
चार दिवस येतील सुखाचे
भ्रांत मिटेल वर्षभर

आता रुजेल गर्भात
बीज नव्या निर्मितीचे
फुटतील धुमारेही
कोंब हिरव्या सुखाचे

खळाळती झरे किती
जणू पावा गोविंदाचा
खेळ चाले रानोमाळी
रंगलेल्या निसर्गाचा…


नाते ओल्या मातीचे
फुलते वृक्षवल्लीतून
अंकुरतात बीज छान
पहा राना रानातून

गंधीत होते गंधवती
सजते मोहक रुपाने
गंध ओल्या मातीचा
मनात बहरतो आनंदाने

ओल्या मातीच्या सुगंधाने
मंत्रमुग्ध होई तनमन
हिरवी सृष्टी पाहताना
डोळे जाती दिपून

ओल्या मातीचा गंध | किमयागार निसर्ग | Best निसर्ग कविता 2023

किमयागार निसर्ग | Best निसर्ग कविता 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
26 × 30 =