काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी अंजली माधव देशपांडे यांची -निसर्गाची किमया – हि कविता -किमयागार निसर्ग- या विषयावर असून हि एक निसर्ग kavita आहे
निसर्गाची किमया | निसर्ग kavita

झरझर बरसती धारा
सृष्टीच्या या अंगणी
नवचैतन्य आले धरेला
बहरुन आली ही धरणी..॥धृ॥
निसर्ग बहरला चोहीकडे
हिरवीगार शाल पांघरूनी
फळाफूलांनी नटली सुंदर
वनराणी धरणीच्या सदनी..॥१॥
ऋतुचे दिनरात चक्र चाले
उन्हाळा,हिवाळा आणि पावसाळा
वेगवेगळ्या ऋतुंच्या रंगांना
धरणी कुरवाळे लडीवाळा..॥२॥
कधी आकाशी निळसर छटा
दाखवितो सदनी
कधी लालसर छटेचा
प्रकाश पाडी भूवनी..॥३॥
रात्र आणि दिवस चक्र चाले
सृष्टीचे दिनरात
नाही खंड कुठेच पाडूनी
नाही चुकवी गणित..॥४॥
किमयागार तो खरा विविध कला दाखवितो
सृष्टीच्या अंगणी त्याचा
खेळ सदोदीत चालतो..॥५॥
विविध रंगानी नटलेला
निसर्ग डोळ्यास भावतो
चहुकडे पाहुनी मनी
हर्ष उल्लास दाटतो..॥६॥
बियाणे पडताच धरणी
त्यास आकार देते
रोपांच्या रूपानी भूवरी
ते रोप तरारुन येते..॥७॥
त्या त्या ऋतुत तिच फळेफूले
उमलूनी आम्हांस दान करते
किती थोर ही धरणी
सदोदीत आमचे लाड पुरविते..॥८॥
वेगवेगळ्या प्रकारे
निसर्ग आम्हांस सुख देतो
किती आभार मानावे त्याचे
त्याला वंदन आम्हीं अरितो..॥९॥

निसर्गाची किमया | किमयागार निसर्ग | Best निसर्ग kavita 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
खूप छान लिहिली आहे
खूप सुंदर कविता आहे
खुपचं छान निसर्ग कविता
खूप छान लिहिली आहे. वाचून आनंद झाला.
impressive and masterpiece👍🏼💗
खूप सुंदर कविता आहे