पाऊस कविता मराठी

पावसातील मंदमंद वारा | पावसाळा आणि आठवणी | Best पाऊस कविता मराठी 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी प्रकाश पाटील यांची -पावसातील मंदमंद वारा- हि कविता -पावसाळा आणि आठवणी- या विषयावर असून हि एक पाऊस कविता मराठी आहे

पावसातील मंदमंद वारा | पाऊस कविता मराठी 2023

पावसाळा आणि आठवणी | Best पाऊस कविता मराठी 2023

हा मंद मंद वारा
शेतावरून आला
वाटे सुगंध त्याचा
फुला हुनी न्यारा!१!

पानोपाणी झाडातूनी
आले पक्षी ही भरूनी
वाटे किलबिल तयाची
जशी गोड गोड गाणी.!२!

नदी नाले आले पाणी
वाहे दू थडी भरूनी
नाचे मोर ते बघुनी
आपले पंख पसरूनी.!३!

थेंब थेंब पावसानं
झाली हिरवीगार धरणी
वाटे हिरवळी बघूनी
नटली पैठणीत धरणी.!४!

शेतातून मोत्या वाणी
आली कणसं भरूनी
इंद्रधनुच्या रंगानं
सप्तरंगी झाली धरणी.!५!

राब राबूनी देवा आता
आम्ही खूपच थकलो
धन धान्याने माझं
घर भरु दे रे आता.!६!

शेता शेतातून जवा
पिक येईन जोमात
तव्हा म्हणे तो बायकोला
तुला घेईन शालू नवा.!७!

पिक बहरले माझे
बरसू नको जोरात
या वर्षाला तरी
पिक येऊ दे घरात.!८!

दर वरीसले पिकं रे
जात पाण्यात वाहून
दुबार पेरणी साठी कुठे राहू मी गहाण.!८!

दर वर्षाला शेतात
पिक माझं सावरतो
पोरा वाणी त्याला मी रोज रोज जपतो.!८!

नको परीक्षा पाहू रे
नाही माझं कोन्ही
तुझ्या भरवशावर
शेत पिकवतो आम्ही.!८!

नको सरकारी मदत
नुसती आश्वासनं
शेत मालाची माझ्या
फिक्स कर किंमत.!९!

पावसात घर माझं
सारं टप टप गळत
किती लाऊ मी धीर
ते तुला नाही कळत.!१०!

कापसाला या वर्षी चांगला मिळेल भाव
पोरीचं लग्न यावर्षी लावून देऊ थाटात.!११!

दर वर्षी स्वप्न माझं
जात पाण्यात वाहून
कसा जगेल शेतकरी
पाहू कोणता स्वप्न.!१२!

नोकरदारांचा रोज वाढत असतो पगार
राजा असून मी का
नेहमी मागतो उधार.!१३!

भ्रष्टाचारानेच पुढारी
बंगला गाडीने फिरतात
दिन रात कष्ट करून
आमचं घर नाही होतं.!१४!

पोराला शाळेत टाकले
पैसे आणू कसे त्याला
एक वेळा भुक राहून
शाळेत पाठवतो त्याला.!१५!

नको नको रे देवा!
असं काही माही करु
फासावरती धन्याला
नको रे तू लटकवू.!१६!

पड पड रे तू पाणी
करना तु आबादानी
माझ्या या संसाराला
नजर लागो न कोणी.!१७!

हा मंद मंद वारा शेतावरून आला
वाटे सुगंध त्याचा
फुला हुनी हा न्यारा..!१८!

पावसातील मंदमंद वारा | पावसाळा आणि आठवणी | Best पाऊस कविता मराठी 2023

पावसातील मंदमंद वारा | पाऊस कविता मराठी 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

पावसातील मंदमंद वारा | पाऊस कविता मराठी 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *