काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी Rija Ismail patel यांची -पावसाळा आणि आठवणी – असून हि एक पावसाळा कविता आहे
पावसाळा कविता | पावसाळा आणि आठवणी

आभाळा एवढा तो दूर होता
आठवणीत डोळ्यामध्ये भरला,आसवांचा पूर होता
गायकाने जणू आपल्याच
-साठी गाण्याला लावला सूर होता
तरीही पाहा ना,तो आभाळा एवढा दूर होता
कश्या विसरु मी त्या भेटी
सोबत बसून खाल्लेला
तो झुणका आणि बाजरीची रोटी
मोह नाही माझ तुझ्यावरती प्रेम आहे
जेवढं आभाळचं जमिनीवर
तसच माझही तुझ्यावर सेम आहे
तुला वाटत जर असेल हा एक गेम आहे
तरीही मी तुला सांगतेय ना हे प्रेम आहे
स्वभाव गोडीचा आणि रूप तो ओढीचा
होडीत काढलेला तो फोटो आपण आपल्या जोडीचा
आठवणीत आहे माझ्या पुल तो एका काडीचा
आणि हा तू जपलेला आहे ना,
फोटो मी घातलेल्या साडीचा
स्वपनात माझ्या तू माझा झाला होता
आणि स्वतःतू मला भेटायला आला होता
स्वपन अर्धवट नसत पाहायचं
सांगना पिया तूझ्यावीणा मी कसं राहायचं
येते तुझ्यापाशी बनून प्रेमाची वाफ
बरस ना तू बनून वात्सल्याचे पाणी साफ
तुच माझ गीत आणि जगातील प्रत्येक रीत
आठवू लागले मी तुला कविता लिहीत-लिहीत
अनुप्रीतीने फुलांना केसात सजव ना
पावसात घेऊन जा आणि मला भिजव ना
गरमा-गरम चहा देखील पाजव ना
बासरी माझ्यासाठीच तू वाजव ना
आठवतोय तूझ्या सोबतीने केलेला राज
पाऊसात केलेला मी कोल्हापुरी साज
तुझ्याकडून मिळाला मला राणीचा ताज
वाटू लागले पावसासोबत आला आहे तू आज
अंधार होता त्यात तू प्रकाशाची किरण
मी भात तर तू अनुरागस वरण
मी वाहती नदीतर तू
आठवणीने तिला सामावून घेणार धरण
वाहत-वाहत पाऊस तुझ्याकडे आला असेल
कदाचीत माझ भेटण तूला झाल नसेल
तरी ही मी तुला दिसेल
कारण मी नाही तर काय
माझ प्रेम कायम तुझ्यावर असेल
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह