पावसावर कविता

पाऊस हा असा | पावसाळा आणि आठवणी | Best पावसावर कविता 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी कु. ऋतुजा गिरीश कुलकर्णी यांची -पाऊस हा असा – हि कविता -पावसाळा आणि आठवणी- विषयावर हि एक पावसावर कविता आहे

पाऊस हा असा | पावसावर कविता 2023

पाऊस हा असा | पावसाळा आणि आठवणी | Best पावसावर कविता 2023

पाऊस हा असा, भिजवून जातो.
पाऊस हा असा,  हसवून जातो.
सख्या तुझ्यां कित्येक आठवणींत,
तो मला रडवून जातो
पाऊस हा असा…

आठवतेयं मला आज ही
आपली ती पहिली भेटं
रात्री ची वेळ अनामिक
पाऊस अचानक आला थेटं.

बसस्टॉपवर एकटीचं उभी मी
मनांत भिती दाटली होती
तु समोरून येऊन त्याचवेळी
मला छत्री दिली होती.

एकाच त्या छत्रीत दोघे
अर्धे ओले झालो होतो
अनोळखी असूनही आपण दोघे
एकाच वाटेवर चालत होतो.

पाऊस धुवांधार बरसतं होता
मधेचं ढग गर्जत होते
अबोल होते अधीर जरीही
नजरेने संवाद घडतं होते.

भयाण त्या तिमिराला छेदून
वीज एक ती चमकली
तोल जाताना माझा मगं
तुझ्या आधाराने मी सावरली.

देहांचा झाला स्पर्श एकमेकांना
शरीरातून कंपाची लहर गेली
माझ्या मनाने मला त्याचवेळी
पहिल्या प्रेमाची कबुली दिली.

अखेर तो पाऊस एकदाचा
किमान थोडासा ओसरला होता
तुझ्या छत्रीत अजून थांबण्याचा
कुठलाच बहाणा सापडतं नव्हता.

मी निरोप घेऊन निघताना
तु मैत्रीसाठी विचारले होते
तुला पुन्हा भेटण्याचे कारण
नकळत तुचं दिले होते.

कैक घडल्या भेटी त्यानंतर
प्रेम तुला होऊन गेलं
अशाच एका रात्री पुन्हा
तु प्रेम व्यक्त केलं.

ती रात्र होती अविस्मरणीय
मी चिंब भिजले होते
तु मला अलवारं जेव्हा
तुझ्या मिठीत घेतले होते.

आज पुन्हा तसाच पाऊस
तशीच चं रात्र आहे
पण एकटीच मी उभी
सरीत तुला शोधत आहे.

कसे विसरू मी ते
सांग क्षण आपुले प्रेमाचे?
कैक असेचं पाऊस आहेत
साक्षीदार आपल्या त्या भेटींचे.

अशाच एका पावसाने तुला
इतके जवळ केले होते
मी गीत प्रेमाचे लिहिण्यापूर्वी
प्रेम माझे हिरावले होते.

नको ना येऊ सख्या
तु पुन्हा पावसाच्या रूपाने
मला नाही सोसतं आताशा
तुझे ते वेडे शहारे.

उगाचंच पुन्हा मनी तु
आशा देऊ नको ना
विरक्त या दगड मनांत
प्रेम रुजवू नको पुन्हा.

मला कळते तुझी काळजी
पण मला जमणार नाही
तुला विसरून सख्या मी
कधीचं आनंदात राहणार नाही.

पुरे झाली ही आता
अल्लड वागणाऱ्या ढगांची मस्ती
मी ओळखून आहे सख्या
तुझी त्या पावसाशी दोस्ती
आता हदयातील त्या अश्रूंचे
गीत ओठी हे आहे
पाऊस आणि तुझे छळणे
मला सवयीचे झाले आहे.
पाऊस हा असा,
हसवून जातो
रडवून जातो
सख्या तुझ्या कित्येक आठवणींत
तो मला रडवून जातो
पाऊस हा असा…

पाऊस हा असा | पावसाळा आणि आठवणी | Best पावसावर कविता 2023


THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
19 + 23 =