बाप कविता मराठी लिहिलेली

बाप | Best बाप कविता मराठी लिहिलेली इन 2023

सौ. चंद्रकला प्रमोद अमृतकर यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत बाप कविता मराठी लिहिलेली विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

बाप कविता मराठी लिहिलेली

काव्य बंध समूह
काव्य लतिका
प्रत्येक रविवारी होणारे स्पर्धा
दिनांक 15 10 2023
विषय वडील /बाबा/ पप्पा / बाप/

बाप | बाप कविता मराठी लिहिलेली

सारे वर्णन आईची वेडी माया
पण बाप असे कुटुंबाचा पाया||१||


माया बापाची जणू नारळ पाणी
राग जरी वर , आत प्रेमळ खाणी ||२||


घरा (कुटुंबा)साठी बाप राबे दिनरात
देह झिजे त्याचा, जशी दिव्याची वात ||३||


ढाल बनूनी उभा राही दारात
ना हिम्मत कोणाची येण्या घरात ||४||


बापाची माया जणू कस्तुरी परीक
दिसेना जणू जाणावी अंतरीक ||५||

बाप कविता मराठी लिहिलेली

हृदयाच्या जखमा सावरी त हसणारा बाप
जगी त्याचे कोणी केले नाही माप||६||


लेक सासरी जाय बाप हृदयी धापा टाके
बापाची माया आभाळाहून वाटे फिके ||७||


वृद्धापकाळी येता साठी सत्तरी
बालपणाचे व्हा तुम्ही खेळ करी ||८||


नका देऊ धोका त्यांच्या अंतरी
सर्वस्व जपले त्यांनी आपले सर्वतोपरी ||९||


वृध्दाश्रमाची वेळ ती आणू नका
नाहीतर तुमचा जन्म जाईल फुका ||१०||

सौ चंद्रकला प्रमोद अमृतकर धुळे

बाप | Best बाप कविता मराठी लिहिलेली इन 2023

बाप कविता मराठी लिहिलेली

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *