भेळ

भेळ- पुणेरी कल्पना, गजानन, पुष्करणी, प्रवीण, आपटे भेळ

तसे म्हणाल तर भेळ हे मधल्यावेळचं खाणं….पण आता कुठं अस कसलं काय, मधली वेळ, आधीची वेळ, नंतरची वेळ सगळं सारखेच…..त्यामुळे सध्या रात्रीच्या जेवणाच्या ऐवजी प्लॅन ठरतो….पोटभर भेळ…..खर तर एका डिश ने समाधान होत नाही ,पण पातेल्यात शिल्लक राहील का नाही ते बघून इतरांना पण मिळायला हवी असे निर्बंध………….

तशी गोष्ट फारच जुनी आहे, पुण्यात ज्या भेळी प्रसिद्ध होत्या…..
त्यात सारसबाग, कल्पना, गजानन, पुष्करणी, प्रवीण, आपटे, बंडगार्डन बागेशेजारी, अनामिका, अशा अनेक…. प्रत्येकाची खासियत वेगवेगळी होती…
कोणाचे चुरमुरे मोठे कोणाचे बारीक, कोणाचे जास्त वेळ कुरकुरीत असायचे, कोणाचं ताज कुरकुरीत, शेव, गाठी, बुंदी, भावनगरी, आणि उगीच डाळ आणि फापट पसारा नसलेलं चांगल्या ते ला मधले फरसाण, कोणाचं चिंचेचं खजुराचे पाणी, कोणाचा खर्डा, अजिबात खवट नसलेले खारे दाणे, तर कोणाचं तिखटाचं प्रमाण….सिझन च्या सुरवातीला कितीही महाग असली तरी ग्राहकानां आवडते म्हणून कैरी…पुणेरी भेळ

पुणेरी भेळ

एकूण काय तर ज्याला जशी सवय असेल तशी आवड…
वेळ म्हटले की तोंडाला पाणी येते
या सगळ्यात अप्पा बळवंत चौकात, मेहेंदळे मुझिकल्स च्या जवळ, गजानन भेळेला पर्याय कधीच नव्हता असं वाटतं…
अर्थात ही गोष्ट खूप जुनी आहे, म्हणजे साधारणपणे १९८० ची असावी…
साधारण ८x५ ची जागा…लाकडी फळ्यांचं शटर, बसकं खोपटं म्हणू शकतो…..नंतरच्या काळात तिथे बिल्डिंग झाली, एक गाळा मिळाला….पण त्या लाकडी खोपट्यात, करणारे दोघे जण.. एक लाकडी बाक, ज्यावर 2 जण बसू शकतील, बाकीच्यांनी रस्त्यावर उभं राहून भेळेचा आस्वाद घ्यायचा…

ठराविक प्रमाणात साहित्य घेऊन यायचे आणि त्यामुळे काही वेळातच भेळ संपून जायची…
म्हणजे घरी बसून प्लॅन करून, बराच वेळ चर्चेत घालवून, आता आपण भेळ खायला जाऊ अस म्हणलं की तिथे जाऊन हमखास, भेळ संपली हे कानावर ऐकायची तयारी ठेवायची….

शुभ्र पांढरा सदरा, पायजमा..
भरदार मिशा…
मोजके बोलणं….
पण ते दोन्ही सद्गृहस्थ अत्यंत मन लावून भेळ करायचे, फार अवघड नाही…..
अल्युमिनियम च्या ताटल्या, त्यात कागद, चमचा….
सगळ्या वस्तूंचं प्रमाण ठरलेलं…
चिंच खजूर पाणी, ताजे फरसाण, कुरकुरीत चुरमुरे, कांदा, टोमॅटोच मिश्रण, तिखट बेताचे, सिझन ला कैरी….त्यावर भुरभुरलेली कोथिंबीर…. वा वा वा वा

आज छान होती पण जरा वेगळीच होती हे गजानन भेळ च्या बाबतीत कधीच झालं नाहीये…. कायम, फारच सुंदर
पावसाचे दिवस चालू असताना जी मजा आहे ती कोणत्याच रेस्टॉरंट मध्ये अनुभवायला मिळणार नाही मिळणार नाही

Thank You for Reading. पुणेरी भेळ

Read about Super Food

मिसेस स्नेहल ह्यांची केक रेसिपि वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *