मराठी कथा – “मोनाची नजरकैद” – अरुण देशपांडे

मनाने,शरीराने खचत चाललेली मोना,तिचे टपोरे डोळे, निस्तेज नजर , गोरा गोमटा उतरून गेलेला मलुल चेहरा, अंगातले ढिले ढिले अजागळ वाटावे
असे गबाळे ड्रेस, रंग -चमक नसलेल्या भारी विटक्या साड्या ती वापरते. अशाच अवतारात वावरतती ठरवून असे रहात नाही,………….मराठी कथा – “मोनाची नजरकैद” – अरुण देशपांडे

तिच्या जुन्यावळणाच्या घरातली माणसे तिला यापेक्षा चांगले राहू देत नाहीत.ती सुंदर दिसणार नाही याची काळजी घेतात.
जागता पहारा असतो मोनावर, तिला मोकळेपणाने बोलण्याची, हसण्याची, मिसळण्याची परवानगी नाही. कुणी मुली तिच्या घरी
आल्या तर त्यांच्याशी ती बोलते पण मुलांशी तेही तरुण ?.हे केवळ असंभव..!

मी तिच्या मैत्रिणीचा भाऊ, मोनापेक्षा लहानच.तरी ती माझ्याशी बोलू शकत नाही. कैक वेळा बाहेरच्या व्हरांड्यात येऊन समोरच्या खांबाला टेकून पायऱ्यांवर पाय सोडून ती बसलेली दिसते. ओपन व्हरांडा, रिकामी खुर्ची, न लावलेला दिवा,उदास अंगण, तिन्हीसांज वेळ, मन खिन्न करून टाकणारे वातावरण , या वेळेत मोना हमखास येऊन बसते………………मराठी कथा – “मोनाची नजरकैद” – अरुण देशपांडे

तिचे लांबसडक केस खांद्यावरून तिच्या छातीवर रुळत असतात, मोना बोटांनी केसांच्या लडी वाळत , जणू मनातला गुंता सोडावित असते.
तिच्या नाजूक सडपातळ हातात मोबाईल असतो. त्यावर फोन येत नाहीत.ती कुणाला फोन करू शकत नाही. तिच्या घरातील माणसांना भीती वाटते – नव्या
जगाचे वारे तिला लागले तर ? भीतीने घेरलेल्या घरात तिचे राहणे “नजरकैद’पेक्षा फार वेगळे नाहीये.

मोनाच्या डोळ्यात कधी ओळख असल्याची चमक मला दिसते पण लगेच ती सावरून घेते स्वतःला , मी पाहतो तिच्याकडे ,तेव्हा एक गुढ – उदासवणे स्मित तिच्या अस्फुट ओठावर दिसते. त्याक्षणी मला चित्रातली “मोनालीसा” आठवते, आणि मी विचार करतो या मोनाच्या गूढ स्मिताआड काय दडले असेल ?
मराठी कथा – “मोनाची नजरकैद” – अरुण देशपांडे

मराठी कथा- “मोनाची नजरकैद” – अरुण वि.देशपांडे

मराठी कथा

आपण वाचत होतात “मोनाची नजरकैद” हि लघुकथा. तुमचे अभिप्राय आम्हाला नक्की कळवा आणि आमची हि कथा कृपया तुमच्या मित्रांशी शेअर करा.

स्वप्नील खैरनार यांचे आणखी लिखाण वाचा – Marathi Poem On Love

Made In India Smartphone Review वाचण्या साठी क्लिक करा

विविध लज्जतदार पाककृती मराठी मध्ये वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Please Share and Subscribe to get latest posts by us.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *