काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी अर्चना कुलकर्णी यांची -तो अवतार ईश्वराचा- हि कविता -पावसाळा आणि आठवणी- या विषयावर असून हि एक मराठी कविता पाऊस आहे
तो अवतार ईश्वराचा | मराठी कविता पाऊस 2023

बालपणीच्या पावसाची आठवण
मनातल्या कप्प्यात गोड साठवण
ग्रीष्म ऋतूतील ऊष्णतेत भाजणं
पाऊससरीचे शीतल फुंकर मारणं
कागदी होडीला पाण्यात बोळवणं
पावसाच्या धारेत ओलेचिंब होणं
सोसाट्याचा वारा छत्रीच उलटणं
सुटीचा आनंद खूsप मस्ती करणं
घरी धपकन पाठीत धपाटा खाणं
गरमागरम कांदाभजींनी सुखावणं
रात्रीच्या प्रहरीत थंडीनं काकडणं
आईच्या उबदार कुशीत विसावणं
पावसाच्या धारांशी घट्ट मैत्री होती
इंद्रधनुष्याची मग भेट घडत होती
ढगात जाण्याची वाटच जणू होती
स्वर्गात जाऊ म्हणे खुणावत होती
ढगांची गडगड,आजी दळत होती
वीज चमकून ,डोळे दिपवत होती
घरी काळोखात भीती वाटत होती
नको ती चित्रे नजरेस दिसत होती
पहाटे हिरवीगार वेल डोलत होती
वेलीवर फुले आनंदाने हसत होती
रंग मनोहर नजरही सुखावत होती
रात्रीची भिती दूर दूर पळत होती
तेव्हा नं पाऊस पहाणे आवडायचे
त्याचे ते रिमझिम रिमझिम पडणे
म्हणजे मला गोड हसणे वाटायचे
मीही गालातल्या गालात हसायचे
त्या सरळ धारा धो धो कोसळणे
मंत्रोच्चारच ऋषींनी उच्चारलेले
त्याचे तांडव मात्र नको असायचे
त्याच्या शांतीला देव आठवायचे
पाऊस आणि प्रेमाची खास दोस्ती
तरुण युगुलाला देतो साक्ष प्रेमाची
मलाही आली आहे याची प्रचिती
आज आठवते त्या दोघांची मस्ती
त्या दोघांनी जमवला खेळ सारा
पाऊस धारा सोसाट्याचा वारा
त्यात ढगांचा कल्ला गडगडणारा
जोडीला त्यांच्या तो थंडीचा मारा
अशा मिट्ट त्या खोडकर रात्रीत
आडवाटेत तो नी मी एका छत्रीत
पाऊस वार्याच्या गोड झटापटीत
अलगद शिरले मी त्याच्या मिठीत
भानावर आलो तेव्हा मी लाजले
स्वतःला बळेच अलगद सोडवले
मनातील भाव डोळ्यांनी वाचले
मनोमनी आमचे शुभमंगल झाले
वयाने पावसाचे रूप बदलले आहे
जेष्ठाचा पाऊस वडपूजन आणतो
आषाढात पंढरपूराची वारी करतो
श्रावणी सणांची मांदियाळीच देतो
भक्ती श्रीगणेशासह भाद्रपद येतो
अश्विनात दुर्गामातेचा वास असतो
आयुष्याच्या त्या सर्व वळणांवरची
विविध रुपे मी देखिली पावसाची
कलाकार असे देखणा जीवनदाता
अन्य नसे तो तर अवतार ईश्वराचा

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह