ह्या पोळ्या पासून काव्यबंध सप्टेंबर दीर्घ कविता लेखन स्पर्धा चालू होत आहे. या द्वारे आम्ही न थांबता मासिक मराठी कविता लेखन स्पर्धा घेण्याचा जो संकल्प केला होता त्याच्या पुढच्या पायरीवर आलो आहे.
काव्यबंध सप्टेंबर 2023 | मराठी कविता लेखन स्पर्धा

हि एक दीर्घ कविता स्पर्धा असणार आहे. दीर्घ कविता असण्यामागे कारण हेच आहे कि प्रत्येक कवीला आपल्या भावना उत्स्फूर्तपणे मांडता याव्यात आणि त्यांच्या नावाने ती कविता ओनलाईन रेजीस्टर करता यावी. जेने करून गुगल सर्च मध्ये कवींच्या नवा सहित त्या कविता येतील.
दीर्घ कविता म्हणजे अश्या कविता ज्यांची शब्द संख्या हि कमीत कमी 250 शब्द असते. ह्यावेळी गैरसोय टाळण्यासाठी शब्द मर्यादा 300 वरून 250 पर्यंत कमी केली आहे. या कवितांचे वैशिष्ट्य असे कि कवीचे शब्दज्ञान आणि आशयघनता याचे परीक्षण यात अतिशय चोखपणे होते. वाचणार्यालाही कवितेच्या विश्वाचे अगदी बारकाईने आकलन होते आणि कवी आणि वाचक दोघेही समान उंचीवर कवितेचा आस्वाद घेत असतात.
“कविता लिहा आणि बक्षिसे जिंका” मराठी कविता लेखन
स्पर्धेचे विषय
गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला
“कविता लिहा आणि बक्षिसे जिंका” मराठी कविता लेखन
स्पर्धेच्या तारखा
१) कविता रेजीस्टर करण्याचा कालावधी
सर्व स्पर्धकांनी दिनांक १४ सप्टेंबर २०२३ सकाळी ६ .०० पासून ते २१ सप्टेंबर २०२३ रात्री ११.५९ पर्यंत आपल्या कविता सर्व माहिती सहित लेखाच्या शेवटी दिलेल्या कविता नोंदणी फॉर्म मध्ये सबमिट करव्यात. (काही अडचण आल्यास आशू छाया प्रमोद +91 78209 94118 यांना संपर्क करावा)
२) कविता माझा ब्लॉग वर प्रसिद्ध करण्याचा कालावधी आणि कविता परीक्षण
२१ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर पर्यंत परीक्षक सर्व कवितांचे परीक्षण करतील. दिनांक २८ सप्टेंबर २०२३ सकाळी ८.४५ ते ९.१५ या वेळेत आयोजाकांद्वारे पात्र झालेल्या सर्व कविता माझा ब्लॉग वेबसाईट वर प्रसिद्ध केल्या जातील.
“कविता लिहा आणि बक्षिसे जिंका” मराठी कविता लेखन
३) कविता प्रसार करण्याचा कालावधी
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या मध्ये जेवढे गुण परीक्षकांच्या हातात आहेत तेवढेच गुण स्पर्धकाच्या देखील हातात आहेत. स्पर्धक जितक्या जास्त लोकांना माझा ब्लोग वेबसाईट वर आपली कविता वाचायला आमंत्रित करेल तितके त्याला जास्त मार्क मिळतील. म्हणजे अर्धे मार्क परीक्षकांकडून आणि अर्धे मार्क कवितेच्या वाचक संखे वरून मिळतील आणि दोघांचे एकत्र गुण स्पर्धकाला मिळतील. गुण विभाजन तुम्हाला पुढे बक्षिसे आणि प्रशस्तीपत्रक हेडिंग खाली वाचायला मिळेल.
कविता जास्तीत जास्त प्रसार करण्यासाठी स्पर्धकांना २८ सप्टेंबर सकाळी ९.१५ पासून ते ५ आक्टोबर २०२३ रात्री ११.५९ पर्यंत वेळ मिळेल.
४) स्पर्धेचा निकाल
दिनांक 8 आक्टोबर २०२३ रोजी*** स्पर्धेचा निकाल जाहीर केला जाईल.
***( स्पर्धकांच्या संखेत जर अचानक वाढ झाली तर निकालाची तारीख बदलू शकते याची नोंद घ्यावी.)
“कविता लिहा आणि बक्षिसे जिंका” मराठी कविता लेखन
काव्यबंध Kavita Spardha नियम :-
१) कविता स्वलिखित आणि पूर्ण नवीन असावी. दीर्घ कवितेची शब्द मर्यादा २५० शब्द आहे. त्यामुळे २५० पेक्षा कमी शब्द संख्या असलेल्या कविता प्रसिद्ध केल्या जाणार नाहीत आणि त्या बाद होतील.
२) कविता ही या आधी दुसऱ्या कुठल्याच ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर प्रकाशित केलेली नसावी.
३) कविता एकदा माझा ब्लॉग वेबसाईट वर प्रसिद्ध झाल्यानंतर ती पुन्हा वापरासाठी इतर कुठल्याही वेबसाईटवर देऊ नये. कवितेच प्रसार करण्यासाठी वेबसाईट ची लिंक मिळेल, शेअरिंगसाठी तिचाच वापर करावा.
४) सामाजिक तेढ निर्माण होईल अशी रचना ग्राह्य धरली जाणार नाही.
५) एक स्पर्धक एकच कविता रेजीस्टर करू शकतो. ती कविता विषयाला अनुसरून असावी आणि दिलेल्या चार विषयातील एक विषय रचनेमध्ये अधोरेखित झालेला हवा.
६) काॅपी पेस्ट, चोरलेली/ फाॅरवर्ड केलेली कविता आढळल्यास रचना बाद होईल आणि रचनाकाराला भविष्यातील कोणत्याही स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही
७) स्पर्धेत काव्यरचना दिलेल्या वेळेवर रजिस्टर करावी. आयोजकांच्या परवानगी शिवाय वेळेनंतरची रचना प्रसिध्द केली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
८) कविते मध्ये चोरलेला मजकूर नाही आहे हे आधी चेक केले जाईल आणि त्यानंतरच वेबसाइट वर प्रसिद्ध केली जाईल
९) प्रसिद्ध केल्यानंतर आपल्या कवितेची लिंक जास्तीत जास्त लोकांना पर्यंत पोहोचेल याची काळजी घ्यावी.
“कविता लिहा आणि बक्षिसे जिंका” मराठी कविता लेखन
बक्षिसे आणि प्रशस्तीपत्रक
१) वरील नियम पाळून पात्र ठरलेले सर्व स्पर्धक प्रशस्ती पत्रकासाठी संरक्षित केले जातील.
२) प्रत्येक पात्र दीर्घ कवितेला 2 टप्यांमध्ये गुण मिळतील
a) पहिला टप्पा – स्पर्धकाच्या कवितेला किती वाचकांनी भेट दिली हा आकडा तपासला जाईल. आणि वाचकांच्या संख्येनुसार 10 पैकी मार्क मिळतील.
१ ते १० वाचक = १ मार्क
११ ते २० वाचक = २ मार्क
२१ ते ४० वाचक = ३ मार्क
४१ ते ५० वाचक = ४ मार्क
५१ ते ७० वाचक = ५ मार्क
७१ ते १०० वाचक = ६ मार्क
१०१ ते १३० वाचक = ७ मार्क
१३१ ते १६० वाचक = ८ मार्क
१६१ ते २०० वाचक = ९ मार्क
२०० पेक्षा जास्त वाचक = १० मार्क
“कविता लिहा आणि बक्षिसे जिंका” मराठी कविता लेखन
सूचना:- दिनांक २८ सप्टेंबर सकाळी ९.१५ पासून ते ५ आक्टोबर २०२३ रात्री ११.५९ पर्यंत या कालावधीतील वाचक संख्याच ग्राह्य धरली जाईल. त्यामुळे स्पर्धकांनी त्याच कालावधीत आपली कविता जास्तीत जास्त शेअर करावी. या कालावधीच्या आधी किंवा नंतर आलेले व्ह्यूज आणि वाचक मार्कांसाठी मोजले जाणार नाहीत.
“कविता लिहा आणि बक्षिसे जिंका” मराठी कविता लेखन
b) दुसरा टप्पा :- परिक्षकांतर्फे कवितांचे परीक्षण केले जाईल. आणि त्यांच्याकडून कवितेला १० पैकी मार्क मिळतील
वरील दोन्ही टप्प्यातील मार्कांची बेरीज करून शेवटी २० पैकी सर्वात जास्त मार्क मिळवणाऱ्या कवितांमधून पहिले ३ नंबर्स काढण्यात येतील
पहिल्या ३ क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यांना खालील प्रमाणे रोख रक्कम आणि प्रशस्ती पत्रक मिळतील
तिसरा क्रमांक ->रोख ₹ २००
दूसरा क्रमांक ->रोख ₹ ३००
पहिला क्रमांक ->रोख ₹ ५००
सर्वांना लिखाणासाठी हार्दिक शुभेच्छा.
कविता नोंदणी फॉर्म
वर दिलेल्या नावावर क्लिक करून आपली कविता नोंद करून घ्या. आणि पुढील माहितीसाठी खाली दिलेल्या whats app ग्रुप ला जॉईन व्हा.
->> Whats App Group
फॉर्म भरताना काही अडचणी असल्यास आयोजकांना किंवा whats app ग्रुप मध्ये विचारू शकता.
आयोजक
१) अनिता बर्गे भोसले
9881850748
२) आशू छाया प्रमोद
78209 94118
३) प्रतिक्षा गजानन मांडवकर
8308684865
पर्यवेक्षक
१) सौ. शितल ताई बाविस्कर राणेराजपूत
२) सौ. संध्या ताई देशपांडे
“कविता लिहा आणि बक्षिसे जिंका” मराठी कविता लेखन
संचालक
मनीष अकोलकर
आणि माझा ब्लॉग टीम
समाप्त
आमच्या इतर कविता वाचा.