मराठी चित्रपट २०२१ Must Watch- २०२१ मध्ये मराठी चित्रपटसृष्टीने खूप चित्रपट मराठी प्रेक्षकांना दिले. त्यातले प्रमुख चित्रपट खाली दिले आहेत.
1) सरसेनापती हंबीरराव
कोणत्याही ऐतिहासिक चित्रपटाचा ते भव्य सेट उभा राहावे लागत असल्याने त्या वातावरण निर्मितीसाठी बराच खर्च होतो. चित्रपटाचा केवळ तीन दिवसाचे शूटिंग बाकी होते आणि त्याची संपूर्ण तयारी झाली असताना नेमके लॉक डाऊन जाहीर झाल्यामुळे शूटिंग थांबावे लागले होते. नंतर या शूटिंगला सात महिन्यांनंतर परवानगी मिळाली पण त्यातही पावसाचा संकेत ओढावला. असे म्हणतात ना चांगल्या गोष्टी येण्यासाठी जास्त वाट बघावी लागते ते खरेच आहे. प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित’ सरसेनापती हंबीरराव’ हा भव्य ऐतिहासिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बोर मध्ये त्यासाठी नव्याने भव्य सेट उभारण्यात आला आहे. शुटिंगला सुरुवात झाली आहे आणि पुन्हा एकदा सर्व टीम आलेल्या संकटाशी दोन हात करत आहे. नियोजित शूटिंग जिद्दीने पूर्ण करून लवकरच पोस्ट प्रोडक्शन काम सुरु करून सरसेनापती हंबीरराव प्रदर्शनासाठी तयार होणार आहे.
Marathi chitrapat
2) पावनखिंड
‘पावनखिंड’ या चित्रपटाचे दर्शक आहेत दिग्पाल लांजेकर. अजय-अनिरुद्ध या जोडीने ह्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात पावनखिंडीमधील थरार हा नेहमीच अधोरेखित होतो. हा भव्य दिव्य चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला बाजी प्रभू देशपांडे यांची भूमिका येणार आहे . बांदल सेना आणि मावळ्यांनी दिलेला लढा पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे .पूर्वी घोड खिंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी आपल्या प्राणाची आहुती देत गनिमांची वाट रोखून धरत बाजीप्रभूंनी पराक्रमाची शर्थ केली होती. बाजीप्रभूंच्या पवित्र रक्तानं पवन झाल्याने या खिंडीला ‘पावनखिंड ‘नाव पडलं. हा पूर्ण घटनाक्रम ह्या चित्रपटातून अपेक्षित आहे.
Marathi chitrapat
3 ) झोंबीवली – मराठी चित्रपट २०२१

अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी यांच्या प्रमुख भूमिका ‘झोंबीवली ‘ या चित्रपटात आहेत.काही दिवसांपूर्वी या मराठी सिनेमा चे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले होते. याच्या हटके पोस्टर मुळे सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगली होती. कारण हॉरर आणि कॉमेडी यांचं भन्नाट कॉम्बिनेशन या चित्रपटात बघायला मिळणार असे कलून आले. पोस्टरमध्ये दाखवण्यात आलेली झोंबी त्या विषयीची कथा याची उत्सुकता देखील वाढवली होती.
झोंबिवली ३१ एप्रिल २०२१ रोजी प्रदर्शित झाला असून ह्याला चक्क IMDB ची 10 पैकी 8.9 रेटिंग आहे. तर हा चित्रपट नक्कीच बघा.