जोडून सुट्ट्या आल्या की मनाला आपोआप बाहेर फिरायला जायचे वेध लागतात.. त्यात हा पावसाळ्याचा विस्मयकारक आनंदून टाकणारा महिना, १३/१४/१५ जोड सुट्ट्या आल्या आणि प्लॅनिंग सुरू झालं.. सुरुवात बरेच दिवसापासून मनात असलेल्या सापुतारा हिल स्टेशन पासून झाली, पण लागणारा वेळ, ऑफिसची न मिळणारी एक्स्ट्रा सुट्टी आणि मुलाच्या अभ्यासामुळे सापुतारा प्लॅन थोडा लांबवला.. बिच वर जायचा सीझन न्हवता आणि श्रावणात असंही सीफुड फक्त सी – फूड झालं असतं म्हणजे बघून समाधान मानावं लागलं असतं, त्यामुळे कोकणातल्या सगळया किणाऱ्याना सुद्धा किनार दिली. मग आपणा पुणेकरांची कुंपणाची धाव, लोणावळा किंवा महाबळेश्वर चा विचार आला.. १५ ऑगस्टच्या गर्दीचे आधीचे अनुभव आठवून ह्या दोन ऑप्शन्सलाही फुली मारली.
माथेरान भटकंती मराठी माहिती- हॉटेल, पाहाण्यासारखी ठिकाणे

मग जवळचं माथेरान आठवलं.. तसं मुंबई, ठाणे, पुणे तिन्ही सिटी पासून जवळ असल्यामुळे गर्दीची रिस्क तिथे ही होती.. पण ॲक्सेसाबिलिटी आणि माहिती आभवी बरेचं लोकं तिथं जाणं टाळतात असं म्हणून रिस्क घेतली..
माथेरान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
तालुका – कर्जत
जिल्हा – रायगड
पहाटेचा गर्दी सुरू होण्यापूर्वीचा प्रवास, सायकलिंग मुळे पाठ असलेला रस्ता, पावसाळी हवामान आणि नयनरम्य वातावरण ह्यामुळे टोल सोडल्यास नॉनस्टॉप ड्राईव्ह करत दस्तुरी पॉइंट पर्यंत पोहोचलो.. अपेक्षित गर्दी होतीच पण लवकर पोहोचल्यामुळे थोडा रिलीफ होता.. माथेरान ला नो-वेहिकल झोन आहे, दस्तूरी पॉईंटलाच गाड्या पार्क कराव्या लागतात, तिथून एकतर टॉय-ट्रेन किंवा घोडा किंवा हात रिक्षा हे तीनच मार्ग.. आमच्या सारखे हौशी फिटनेस प्रेमी चालतच प्रेफर करतात, गर्दी बघून तिघांनीही तोच पर्याय निवडला.

माथेरान भटकंती मराठी माहिती- हॉटेल, पाहाण्यासारखी ठिकाणे
माथेरान हॉटेल
त्या निसर्गरम्य परिसरात कधी पाऊसाचा, कधी बाजूने वाहत असलेल्या झर्याचा, खाली दरीत समोरच्या डोंगर रांगांवर दिसणाऱ्या धबधब्याचा आनंद घेत घेत आम्ही रुळाच्या बाजूने दस्तुरी पॉइंटहून माथेरान मधील बुक केलेल्या स्प्रिंगवुड रिसॉर्ट पर्यंत गेलो. अक्षरशः … काय तो डोंगर, काय ती झाडी, काय ते हाटील.. सर्व ओक्के मध्ये होतं
थोडा आराम करून जेवण वैगेरे झाल्यावर, पुन्हा पॉइंट्स फिरायचे ठरवले, ऊन पावसाचा खेळ सुरूच होता.. घोडा केला की वेळेचं बंधन येतं म्हणून दुसऱ्या दिवशी लांबच्या पॉइंट्स ला जाताना घोडा करू.. आता चालतच जाऊ असं ठरलं..
माथेरान भटकंती मराठी माहिती- हॉटेल, पाहाण्यासारखी ठिकाणे

माथेरानला पाहाण्यासारखी ठिकाणे
मंकी पॉइंट, हार्ट पॉइंट, चेनॉ पॉइंट असे जवळचे पॉइंट उरकून, समोर पॅनॅरोमा पॉइंट करायचा ठरवला, वेळ थोडा होता, नो-वेहीकल प्रमाणे माथेरान बऱ्या पैकी नो-नेटवर्क आणि नो लाईट पण आहे, अंधाराच्या आत परत हॉटेल ल पोहोचायचे होते, डिस्टंस बऱ्या पैकी होते. तरीही नावा प्रमाणे पॅनॅरोमा पॉइंट अगदी व्हिज्युअल ट्रीट असल्यामुळे मोह आवरला नाही आणि पटापट पाऊले त्या दिशेने चालू लागली. नंतर सुमसान रस्त्यावर कुणीच दिसेना आम्ही तिघेच.. मागून एक नवीन लग्न झालेलं जोडपं आवाज देत आलं.. मुंबईचेच होते, भाषेहून केरळी वाटतं होते, “अकेले जाना थोडा टेंशन, can we walk together sir? अशी रिक्वेस्ट त्यांनी केली.. ॲक्च्युली तो आमच्या मनातलं बोलला.. पण आम्ही सुद्धा काही हरकत नाही, त्यात काय एवढं, असा भाव आनत त्यांना सोबत घेतलं.. थोड्या दूर गेलो पण जसा अंधार वाढला तसं तिकडे जाऊन ही काही फायदा होणार न्हवता हे जाणवलं, शिवाय निर्मनुष्य रस्ता वं माकडांचे आवाज, जगो जागीचे सूचना फलक हे सगळं पाहून सगळ्यांनी परत फिरण्याचा निर्णय घेतला.. माझ्या सोबत ट्रेकिंग साठी आणलेला हेड टॉर्च असल्यामुळे, अंधारातही सोईच ठरलं.

मार्केट जवळ आल्यावर धन्यवाद देत ते जोडपं निघालं व आम्ही तिघेही हॉटेल वर येऊन जेवण करून मस्त दिवसभर काढलेले फोटोज् शेअर करत बसलो, तिथलं जेवण फर्स्ट क्लास होतं आणि स्प्रिंगवूड रिसॉर्ट मध्ये वायफाय असल्यामुळे फोटो अपलोड सुद्धा सहज होत होते.

माथेरान मराठी माहिती
दुसऱ्या दिवशी मस्त राहिलेले लांबचे पॉइंट्स घोड्यावर करायचे ठरवले, घोडसवारीचा आनंद घेतला पण आम्हाला जी मज्जा पावसाळ्यात चालण्यात येत होती तशी मज्जा कशातच नाही.. घोड्यावर पॉइंट्स ला उतरल्यावर वेळेचं थोडं बंधन असतच. उरलेला अर्धा दिवस राहिलेले जवळचे पॉइंट्स आम्ही परत चालतच कव्हर करायचे ठरवले..


दोन दिवसात .. खंडाळा पॉइंट, अलेक्झांडर पॉइंट, शारलोट लेक, लॉर्ड्स पॉइंट, किंग एडवर्ड पॉइंट, इको पॉइंट, हनिमून पॉइंट, लुईसा पॉइंट, मलंग पॉइंट, मंकी पॉइंट, हार्ट पॉइंट आणि बरेच फोटोग्राफी स्पॉट्स पाहिले.. यथेच्छ फोटोग्राफी ही केली, टॉय-ट्रेन मधल्या डीडीएलजे पोझ पासून वेग वेगळे इंस्टा रीलस् पर्यंत भरपूर कॅमेरा करामती केल्या, तिसऱ्या दिवशी थोडीफार शॉपिंग करून पुण्याकडे रवाना झालो ते पुन्हा येईन .. पुन्हा येईन .. पुन्हा येईन हे आश्वासन देऊनच..
Quick Question माथेरान कोणत्या जिल्ह्यात आहे?
Writer:- Mr. Abhijit Toradmal

Khup cha sundar😍