17 kilometres walk to celebrate 17 years of togetherness
लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याची भन्नाट पद्धत
तुम अगर साथ देने का वादा करो
मैं यूँही मस्त नग़मे लुटाता रहूंऽऽऽ
यंदा लग्नाचा १७वा वाढदिवस कसा साजरा करावा सुचत नव्हतं, आमच्या पेक्षा टीनएजर मुलगाच जास्त एक्साईटेड, पण त्याचं सेलिब्रेशन ते काय, फिरायला जायचं, किंवा किमान एखाद रिसॉर्ट मध्ये डे स्पेंड करायचा अशी फरमाईश, वर्कलोड आणि सुट्टी आभवी सगळे प्लॅन रद्द करून शेवटी मॉल मध्ये एका फॅमिली सह मूव्ही आणि लक्झरी रेस्टॉरंट वर निभावलं, पण आम्हा दोघांच्या सध्याच्या आवडीचा विषय म्हणजे फिटनेस ह्या संबंधित काही केल्याशिवाय सेलिब्रेशन अपूर्ण वाटत होतं. मग काय? वीकेंड ला काही तरी भन्नाट करायचं ठरवलं.

लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याची भन्नाट पद्धत
लग्नाचा १७वां वाढदिवस साजरा करण्या करिता १७ किलोमिटर वॉक. सौं.ची स्वीकृती येणं थोडं अवघड वाटतं होतं कारण आतापर्यंत तिने माझ्यासोबत जास्तीत जास्त ८/९किलोमिटर वॉकिंग/रणींग केले होते. पण मनाची चिंता थेऊर च्या चिंतामणी बाप्पांनी लगेच दूर केली. घरातून बरोबर १७/१८ किलोमिटर वर बाप्पांचं श्रीक्षेत्र.. सौंनी विचारल्या क्षणी स्वीकृती दर्शविली. आणि आज पहाटे १७ किलोमीटरची श्रींची चिंतामणी वारी दोघांनी सोबतीचे १७ वर्षाचे स्मरण करत पूर्ण केली..

Writer:- Mr. Abhijit Toradmal

Thank you for publishing our exciting anniversary activity.
Wonderfully written.. exiting idea of celebrating Anniversary 🤟
Thank you
Mast 👌👌 Khup bhaari 👏👏👍
Bappa bless you all 💐👌👍
Thank you so much