वडील कविता मराठी

सावली पित्याची | best वडील कविता मराठी in 2023

रुपाली देव हंबर्डे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत वडील कविता मराठी विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

वडील कविता मराठी

स्पर्धे करिता
काव्यबंध समुह
काव्यलातिका
आयोजित रविवार काव्यलेखन स्पर्धा
दिनांक १५/१०/२०२३

विषय…. बाबा

सावली पित्याची | वडील कविता मराठी

शब्द आज मूक माझे
सोबतीला सूर नाही ,
थबकले  डोळ्यात जणू
आसवांचा पूर नाही ।!१!!

      आठवांचा उठती लाटा
      किनारा नक्कीच नाही
      भास  की आभास असे हा
      बाबा तुम्ही दूर नाही ।!२!!

वाट घरट्याची आता
परतुनी पायवाट नाही
माघारी पाऊल येईल
असे कोणते वळण नाही ।!३!!

       शांत की अशांत मन हे
       कोणती  जाण नाही
       दूरदेशीला नसे परतावा
       एवढे ही अजाण नाही ।!४!!

संवाद नसे की वाद आता
शब्द स्मरणात नाही ,
भावना बोलती मुक्याने
शब्दात मावणार नाही ।!५!!

        अंतरीच्या वेदनेला
         हसरी किनार नाही ,
         काळजातली ज्योत तेवते
         ती कधीही विझणार नाही|!६!!

सांज चाहुली कुणाला
का कधी चुकणार नाही ,
प्रेमसाऊली  पित्याची
पण कधीही ढळणार नाही ।!७!!

रुपाली देव हंबर्डे.
चिंचवड पुणे.

सावली पित्याची | best वडील कविता मराठी in 2023

वडील कविता मराठी

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह