लहू कुपले आणि राजेश साबळे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत शेतकरी कविता मराठी विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
तु शेतकरी | शेतकरी कविता मराठी
काव्यबंध समुह आम्ही मराठी साहित्याचे शिल्प
वार : . गुरुवार
दिनांक: .३१/०८ /२०२३
विषय : . शेतकरी
शिर्षक : . तु शेतकरी

सुकली त्याची शेती दृष्ठ लागली कोनाची नष्टावली सारी शेती
आस लागली ढळायला |l१॥
शेतकर्याच्या डोक्यावर उन्हांचा हा मारा कष्ट करतो उन्हांमध्मे कसला आला नाही त्याला थारा॥२॥
राबराबतो त्याला भाकरीची आस नाही भुक त्याला कशी येई पोट भर आन नाही सपनात येई त्याच्या शेताची ती
लाही लाही ||४॥
तुझ्या या कष्टांच फळ मिळेभांक रीला चव तुझे या सृष्टीवर आहे दिलदार मन ॥ ५॥
तुझ आहेस या जगाचा पोंशीदा तुझ आहेस या जगाचा जिवन दाता॥६॥
पैसा त्याला कसला आला रोजगारा ची हामी नाही
कधी राहिला उपाशी किती सांगावी ती
तुझी किमया न्हारी ॥७॥
घाम गाळून तु केल रक्ताच पाणी आणि
पिकवलस सोन्याच मोती ॥८॥
तुझ्यात दिसला तो शेता मधील देव, तुझ्यात दिसला तो घळ्यातील राशीतला देव, तुझ्यात दिसला
त्या पिकाच्या सोन्याच मोती मधील देव, दिसला तु मंदिरातील देवा पेक्षा तु सर्वश्रेष्ठ ॥९॥
तुला साध दिली त्या तुझ्या बैल जोडीनं अन तुझ्या कारभारीन अन
पिकवलं आईच्या उदरातुन
सोन्याचं मोती ॥१०॥
कुमार : लहू कुपले कोल्हापूर
बळीराजाची व्यथा | शेतकरी कविता मराठी
काव्यबंध समूह, आम्ही मराठी साहित्याचे शिल्पकार आयोजित.
दिनांक :- ३१ ऑगस्ट २०२३
गुरुवारचा उपक्रम …
आजच विषय:- शेतकरी
।।बळीराजाची व्यथा।।

वरुण राजाची कृपा, झालीया औंदा ही छान।
झालं शिवार हिरवं, तलाव भरलं पाण्यानं।।
चार वर्षाचा दुष्काळ, सोसला लई दमान।
कणीस मोत्याच येईल, शेतात भरून दाण।।
हा शेतकरी आमचा, कर्जात गेला बुडून।
रोज ऐकायला येतं, गेला की विष पिऊन।।
सारे सांगून थकले, जीवाचं करून रानं।
नाही फिटणार कर्ज, उगाच त्रागा करून।।
किती सुखानं सारा, संसार ठेवला मांडून।
जरा प्रेमानं रहा की, जरासा विचार करून।।
कंपनीच्या वस्तूला या, देती किंमत ठेवून।
शेती मालाची किंमत, ठरवणार हो कोण।।
कृषी प्रधान आहे हा, म्हणाया देश महान।
बळीराजाला आमच्या, या देशात नाही मान।।
उन्हा मागून सावली, येते की दबा धरून।
तसा येईल पाऊस, उन्हात नाचत अजून।।
जरा समजून घ्या की, आपण आपल्या मनानं।
आता सुटलं कोड, संसार करू या सुखानं।।
………………………………….
रचना-राजेश साबळे, ओतूरकर
उल्हासनगर (ठाणे)

शेतकरी कविता मराठी
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह