डॉ. मानसी पाटील आणि विजया गोरे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत शेतकरी कविता संग्रह विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
राबत्याचे हात रिते | शेतकरी कविता संग्रह
स्पर्धेसाठी
काव्य बंध समूह आयोजित
दि ३१/८/२३
काव्य लतिका
प्रत्येक गुरुवारी होणारी स्पर्धा
विषय: शेतकरी
शीर्षक:- राबत्याचे हात रिते

जग सारे धावते वेगाने
चंद्रयान पोहोचले चंद्रावर
शेतकरी अजून मातीतच
घाम गाळत जागेवर……१
दिवस नाही रात्र नाही
कष्टाला त्याच्या सीमा नाही
पाऊसपाण्यावर शेत अवलंबून
असतो का भरवसा काही…..२
अवचित दुष्काळ पाणीटंचाई
अन् निसर्गकोपाची भीती
उजाड माळरान आणतो
निराशेचे ढग डोळ्यापुढती….३
मोठे लोक कर्ज बुडवून
होतात डोळ्यासमोर फरार
त्याच्या गळ्यात दोरीचा फास
कर्ज पाच पन्नास हजार…..४
असते एकच आस त्याला
पीक यावे दरवर्षी खास
सगळ्या जगात लोकांना
मिळू दे सुखाचा घास…..५
इतके सगळे करुनही
नाही बाजारभावाची हमी
सगळ्यांचा पोशिंदा पण
त्याच्या घरी सगळ्याचीच कमी…६
एकच मागणे देवा दरसाल
पाऊसपाणी नीट पडू दे
नको राबत्याचे हात रिते
त्याला माणूस म्हणून जगू दे….७
©️®️. डॉ मानसी पाटील
————————————
बळीराजा ही तुझी कहाणी | शेतकरी कविता संग्रह
काव्यबंध समूह.
काव्यालतिका स्पर्धा
दि.31.08.23
विषय – शेतकरी
शीर्षक:- “बळीराजा ही तुझी कहाणी “

गांधीबाबा माणूस मोठा होऊन गेला
‘खेड्याकडे चला’ मंत्र जनाला देऊन गेला
जन्मदाती एक माय , काळी माती दुसरी माय
तिच्या कुशीत खेळण्याचे होते एक वय
पाटी पेन्सिल हाती आली पण काळी माय जवळची झाली
पोटाची खळगी भरण्यासाठी तीच कामी आली
शिकून मोठे होतानाही तिचाच होता आधार
जगण्यासाठी कायम असतो तिचाच हातभार
ऊन पाऊस, रात्र दिवस पर्वा नाही केली
कधीतरी उगवेल सोन्याचा दिवस आशा वाटत राहिली
पूर-पाऊस , सुकाळ-दुष्काळ निसर्गाची लहर
दलाल , आडते ,राजकारण्यांचा झाला हा कहर
कष्ट करून काळया मातीत गुरासारखे राबतो
टाळूवरचे लोणी मात्र तिसराच कुणी खातो
पिकासाठी केलं घामाचं खत आणि रक्ताचं पाणी
कर्जबाजारी बळीराजा गातो दुःखाचीच गाणी
फास घेऊन बळी जाणं हेच त्याचं प्राक्तन
जगण्याच्या लढाईत हरून जीव करतो अर्पण
तरीही उगवेल याच मातीत पुन्हा नव्याने तो
हिरव्या पिवळ्या पिकाशी इमान राखील तो .
विजया गोरे.
सिव्हिल लाइन्स,
नागपूर.

शेतकरी कविता संग्रह
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह