शेतकरी kavita

मोती घामाचं आणि अन्नदात्याचे खडतर जीवन | 2 Best शेतकरी kavita

सौ. भारती बागल आणि रवी आटे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत शेतकरी kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

मोती घामाचं | शेतकरी kavita

काव्यबंध समूह
काव्य लतिका
दिनांक 31 ऑगस्ट 2023

विषय शेतकरी


शीर्षक
🌹मोती घामाचं🌹

मोती घामाचं | शेतकरी kavita

हाती घेऊन टिकाव फावडं
रात दिसा राबतो
उज्वल भविष्यासाठी लेकरांच्या
मोती घामाचा ढाळतो

अन्नदाती काळी माय
प्रेम तिच्यावर करतो
सुख दुःख स्वप्न सारी
तिच्या कुशीत पेरतो

जन्म अवघा कष्टाला
आनंदाने वाहतो
पावसासाठी फक्त तो
हात वरून राजास जोडतो

राब राबुनी शेतात
हिरं घामाच्या मोत्याचे बनवतो
रास धान्याची खळ्यावरची
डोळे भरून पाहतो

सपान मुला बाळांच्या शिक्षणाचं
काळ्या आईला सांगतो
उपवर झाल्या मुलीच्या
अक्षदा धरणी कुशीत पेरतो

तुटकी चप्पल फाटकी कापड
परी स्वाभिमान जपतो
हरामच्या पंचपक्वान्नापेक्षा
आनंदे कष्टाची भाजी भाकरी चाखतो

झाडे लावुनी बांधा बांधावरती
निसर्ग समतोल साधतो
अवघ्या जगाचा पोशिंदा
बळीराजा बनतो

उजाड ओसाड धरणी पाहता
जीव त्याचा जळतो
साथ मिळता पावसाची
पुन्हा नव्याने बहरतो

ऊन वारा वादळ पाऊस
आनंदाने झेलतो
नम्र मधुर मवाळ
अमृतवाणी बोलतो

घामाच्या मोत्याचे अलंकार
जन्मभर घालतो
हिरवीगार धरणी होता
आनंदाने डोलतो

कधी नैसर्गिक आपत्ती येते
कधी माल फुकापासरी जातो
बळीराजाच्या कष्टाला
नेहमीच कुठे दाम योग्य भेटतो

नैसर्गिक आपत्तीला
आत्मविश्वासाने तोंड देतो
दारिद्रयाचे घाव
आनंदाच्या ढालीवर झेलतो


सौ भारती राजेंद्र बागल
वडूज सातारा 🙏

अन्नदात्याचे खडतर जीवन | शेतकरी kavita

काव्य बंध समूह
काव्य लतिका
प्रत्येक गुरुवारी होणारी स्पर्धा
दिनांक 31 ऑगस्ट 2023
विषय- शेतकरी
शीर्षक-अन्नदात्याचे खडतर जीवन

अन्नदात्याचे खडतर जीवन | शेतकरी kavita marathi

शेतकरी सतत करीत असतो काबाडकष्ट
सर्वांचेच उदर भरून दुःखही करतो नष्ट

गाय बैलाची जोडी व थोडी शेतीतील अवजारे
एवढ्याच धनावर फुलवतो हिरवे हिरवे नजारे

फाटलेली बनियान व कपडे असतात मळलेले
राब राब राबतच राहतो नशीब तरी फाटलेले

कडाडून विजा होते जग बुडविणारी वृष्टी
क्षणार्धात त्याने फुलविलेली नष्ट होते सृष्टी

पर्यावरण स्नेही जणु स्वप्न पाहतो सुकाळाचे
मात्र जीवनी सदैव त्याच्या संकट दुष्काळाचे

विज्ञान तंत्रज्ञानाची जरी होतच आहे प्रगती
शेतकऱ्यांच्या श्रमाविणा सर्वांचीच अधोगती

करावेत पाझर सिंचन तलाव धरणाचे प्रकल्प
बदलून टाकावा काळ्या मातीचा कायाकल्प

जलसंपत्तीचा होऊ न द्यावा कधीच अपव्यय
कडक करा कायदे कोणाचीही करू नका गय

सहकारी जोडधंद्यातही सामावून घ्यावे त्यास
मुलीच्या लग्नासाठी व्हावे लागू नये उदास

उत्पादन खर्चावर आधारित दर त्याला मिळावा
त्याच्या कुटुंबाचा दोन भाकरीचा खर्च जुळावा

ज्योतिबांनी व्यथा मांडली ब्रिटिशांच्या दरबारात
होऊ नये त्याचे शोषण फसवणूक स्वतंत्र भारतात

प्राधान्याने लक्ष द्यावे त्याच्या जिंदगानी कडे
का बरे त्याचे पाऊल पडत राहावे सरणाकडे

रचयिता-रवी आटे
सानपाडा ;नवी मुंबई
भ्रमणध्वनी-९३२४७४५९७०

अन्नदात्याचे खडतर जीवन | शेतकरी kavita

शेतकरी kavita

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
21 + 22 =