आठवण कविता : जगणं अवघड करणारी हि आठवण : मराठी कविता

मित्रांनो हि कविता अशी आहे कि तुमच्या जोडीदाराची समजूत घालण्यास मदत करेल. तुमच्या मनात ज्या आठवणीने काहूर घातलाय तो तिच्या पर्यंत पोहोचवायला मदत करणारी हि कविता आहे. तिच्या मनात तुमची थोडी जरी काळजी असेल तर नक्कीच ह्या कवितेमुळे तिला तुम्ही घेतलेली काळजी आणि तुमच्या चांगुलपणाची आठवण करून देईल.
आठवण कविता Athavan Aathavan Marathi Kavita

आठवण कविता Athavan Aathavan Marathi Kavita

एकांतात तुझी आठवण आली, तुझ्याशिवाय काय जीवनाला अर्थ माझ्या?
अनंत ऋतूंचे चक्र चालवत असे, नुसत्या हाताचा स्पर्श तुझ्या.
उन्हाळ्यातही देऊन जाई श्रावणातली थंडाई ,
नितळ नयनाची मलमली शालीन अंगाई.

आठवण कविता Athavan Aathavan Marathi Kavita

दोन पावले जेव्हा मागे जातो शोधत आपल्या सोबतीच्या खुणा,
वाटेवरच्या धुळीच्या कनांना सुद्धा माहिती आहे आपल्या गप्पा ,
तुझ्या खड्या आवाजाचा मंजुळ झुळकेन घेतला होता धडका,
इतरांना सांगत फिरत होती ती कि माझा हरवलाय विसावा.

जीवनात साला रंगत होती जेव्हा आपण सोबत होतो,
एकमेकांशी बोलताना कुणाला भीक घालत नव्हतो ,
घटका न घटका टेबल आणि खुर्च्या झिजवत होतो,
कॅफे मधला खडूस दादा म्हणायचा “भाऊ आता बिल कधी देतो ?”

आठवण कविता Athavan Aathavan Marathi Kavita मराठी कविता

दादाला बिलापेक्षा माझाच हेवा वाटत असणार,
हि स्वर्ग सुंदरी ह्यांच्यासोबत कशी हाच प्रश्न असणार,
त्याला कुठे माहित होत माणसं कशी पारखणार,
बाह्यरूप पाहून मनाला ओळखता कस येणार ?

तुझ्याशिवाय उदास झालो अगदी थोडक्या वेळात,
अजूनही तू माझी नाही अवघड आहे समजून घेण्यास,
गेलीस जरी दूर मला जाशील कशी विसरून ?
दुसरा हात हातात घेताना माझ्या स्पर्शालाच ठेवशील आठवून.

आठवण कविता Athavan Aathavan Marathi Kavita मराठी कविता

त्याच्या सोबत शांत जेवताना,
पाण्याचा ग्लास हळूच ठेवताना,
आठवेल तुला माझ्या सोबतचा,
मोकळीक तेचा सुवासिक शहारा.

आवडली नाही एखादी गोष्ट,
बोलून करायला नको का स्पष्ट ?
तेव्हाचे तेव्हा झाले असते स्वच्छ,
तर आज लागले नसते एवढे धैर्य

इतके टोकाचे विचार कशाला आज ?
तुझा दूर जाण्याचा निर्णय पुसून टाक.
सोबत राहून भरभरून जाऊ वाहणाऱ्या नदी सारखे ओसंडून,
एकांतात बनून राहण्यापेक्षा केवळ एक पुसटशी आठवण.

Read More :- Tuzi Athavan आठवण

1 thought on “आठवण कविता : जगणं अवघड करणारी हि आठवण : मराठी कविता”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *