डेंग्यूची लक्षणे प्रतिबंधात्मक उपाय डास

डेंग्यूची लक्षणे प्रतिबंधात्मक उपाय डास

डेंग्यू हा डासांमुळे होणारा गंभीर आजार आहे. याची लक्षणे, कारणे, उपाय काय आहे. यावर असणारे घरगुती उपचार,चांगली काळजी घेणे खुप गरजेचे आहे. कारण हा डासांमार्फत होणारा भयानक असा संसर्गजन्य रोग आहे.मागच्या दोन दशकांपासून जगभरामध्ये डेंग्यू रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अतिवेगाने पसरणारा हा संसर्गजन्य रोग आहे. पावसाळा म्हणलं कि अधिक रोगांना निमंत्रण . कारण पावसाळा सुरू झाला की , माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात . डेंग्यूची लक्षणे डेंग्यू ची प्रतिबंधात्मक उपाय डास

पावसाळ्यामध्ये सर्दी ,खोकला ,ताप , डेंगू मलेरिया , टायफाईड , कावीळ असे आजार होतात.भारतामध्ये १९६३ साली कोलकत्ता येथे डेंग्यूची पहिली साथ आली होती . या महामारीत अनेक लोकांचे बळी गेले होते. तसेच अनेक ग्रामीण भागात, शहरामध्ये ठिकठिकाणी साथ वाढत गेली . त्यामध्ये अनेक लोक या महामारीला सामोरे गेले.

या तापालाच डेंगी ताप असे म्हणतात . डेंग्यू झाला तर बऱ्याच जणांना वाटते की मृत्यू ओढवेल. पण यावर योग्य उपचार केले , चांगले उपाय केले , काळजी घेतली तर हा आजार बरा सुद्धा होतो. यासाठी याला घाबरण्याची गरज नाही. तसेच डेंग्यू वर घरगुती उपचार केल्याने देखील हा आजार बरा होण्याची शक्यता असते.आज आपण या लेखामध्ये हा आजार काय आहे , तो कसा होतो, याबद्दल माहिती . हा संसर्गजन्य घातक असा आजार असला तरी डेंग्यू वर घरगुती उपाय कोणते केले जातात , तसेच डेंग्यू न होण्यासाठी कोणती काळजी घ्यावी.

डेंग्यूची कारणे आणि लक्षणे कोणती आहेत .त्यामुळे आपल्याला डेंग्यू झाला आहे हे समजू शकते. या सगळ्यांची माहिती आज आपण या लेखात जाणून घेऊया.डेंग्यूचा डास हा एक फुटांपेक्षा जास्त उंच वर उडू शकत नाही . त्यामुळे हा डास शक्यतो हात आणि पायावर चावतो. डेंग्यूचा डास एकदाच चावल्यावर डेंगू होण्याची शक्यता अतिशय कमी असते.तर काही जणांना डेंग्यूचा डास चार ते पाच वेळा चावल्याने डेंग्यू होण्याची अधिक शक्यता असते. डेंग्यूची लक्षणे डेंग्यू ची प्रतिबंधात्मक उपाय डास

डेंग्यूबद्दल माहिती

हा आजार बहुतांश दमट अश्या वातावरणातील भागांमध्ये पसरत आहे.पण मागील दोन दशकांमध्ये त्याचे प्रमाण अधिक वाढत आहे . तसेच जगभरामधील प्रत्येक भागात डेंग्यूची लागण ही होत आहे. त्यासाठी यावर प्रतिबंधात्मक उपाय करणे खूपच गरजेचे आहे. यावर आत्तापर्यंत कोणतेही ठराविक औषध उपलब्ध झालेले नाही. या आजारावर आपण घरगुती उपचार करू शकतो. डॉक्टरांचा सल्ला देखील घेऊ शकतो.कारण या रुग्णांना लवकरात लवकर उपचार घेणे खूप महत्वाचे असते. हा आजारा घातक ठरण्याची शक्यता जास्त असते. याचे (४) चार प्रकार आहेत . त्यातील दोन प्रकार हे आपल्या शरीरासाठी खूप घातक आहेत .आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात होते.त्यामुळे थकवा येणे अशी समस्या उद्भवते. पांढऱ्या पेशींची संख्या कमी होणे हे शरीराच्या आरोग्यासाठी घातक असते. डेंग्यूची लक्षणे डेंग्यू ची प्रतिबंधात्मक उपाय डास

डेंग्यू ची लक्षणे,प्रतिबंधात्मक उपाय,डास

डेंग्यू लक्षणे

याची लक्षणे ही ओळखता येतात. कारण ही लक्षणे हळूहळू सौम्यापासून तीव्रते कडे वाटचाल करतात. त्यामध्ये आपल्याला बऱ्याच मेडिकल टेस्ट कराव्या लागतात . यामध्ये आपल्याला डेंग्यू तापाची लक्षणे आढळून आल्यास त्यावर आपण उपचार करु शकतो . यावर उपचार करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढीच त्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
डेंग्यू आजाराची लागण झालेल्या रुग्णाला साधारणपणे चार ते सात दिवसांमध्ये डेंग्यूची लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे दिसल्यावर रुग्णाला चार ते पाच दिवसांमध्ये एन एस वन ( NS1) ही चाचणी करणे आवश्यक आहे.

तापाची लक्षणे

१) डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णाचे सांधे, हात, पाय, पाठ दुखणे या समस्या सुरु होतात .
२) डोकेदुखीचा त्रास डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णाला अधिक होतो.
३) तापाची तीव्रता ही अधिक असते. रुग्णाचा ताप हा १०४ अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता ही अधिक असते.
४) कंटाळा येणे , बेचैनी होणे तसेच अस्वस्थ वाटणे .
५) भूक न लागणे.
६) चेहऱ्यावर आणि हातापायावर लाल चट्टे येणे.
७) मळमळणे उलट्या होणे .
८) पोट फुगणे.
९) पांढऱ्या पेशींची संख्या कमी होणे.
१०) थंडी आणि ताप येणे.
११) रक्तदाब कमी होणे. डेंग्यूची लक्षणे डेंग्यू ची प्रतिबंधात्मक उपाय डास

घरगुती उपचार

डेंग्यू झाल्यावर डॉक्टर आपल्याला औषधांचा सल्ला देतात.डेंग्यू झाल्यावर आपण घरगुती उपचार देखील करू शकतो. आपल्याला जेवणामध्ये काही बदल करावे लागतील. या उपायांचा उपयोग डेंग्यूच्या रुग्णांना केला जातो.
१. तुळशीची पाने
२. ड्रॅगन फ्रूट
३. गुळवेल
४. कडुलिंबाची पाने
५. कोरफड
याचा समावेश आपण आहारात केल्याने डेंग्यू बरा होण्यास मदत होते .

Post Office Vima फक्त ₹ 399 ची विमा योजना

लहान मुलांच्या आरोग्य विषयक ब्लॉग्स वाचण्यासाठी क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *