तिचा सत्यवान - नवरा बायको प्रेमकथा

तिचा सत्यवान – नवरा बायको प्रेमकथा- Maza Blog

तिचा सत्यवान – नवरा बायको प्रेमकथाAuthor @यशश्री…?
सकाळपासूनच सगळ्या न्यूज चॅनल वर एकच चर्चा रंगली होती. ” एका डॉक्टर नेच केली तिच्या रुग्णाची हत्या “
” डॉक्टर स्मिता ह्यांना जास्तीत जास्त शिक्षा झालीच पाहिजे…”

स्मिता ने रागाच्या भरात टीव्ही बंद करून रिमोट फेकून दिला… कसला आवाज झाला म्हणून राजेश आत फोनवर कोणाशी तरी बोलत होता तो बाहेर आल तर स्मिता दोन्ही हातानी डोकं घट्ट पकडून खाली बसली होती… राजेश धावतच तिच्या जवळ गेला….

राजेश आणि स्मिता… दोघांचं ही आरेंज मॅरेज होत… ती डॉक्टर तर तो आयटी कंपनीत कामाला होता… दोघांच्या ही लग्नाला वर्ष झालं होत… चांगला सुखाचा संसार सुरू होता… दोघंही एकमेकांसाठी अगदी अनुरूप होते… खूप प्रेम होत त्यांचं एकमेकांवर… भांडण तर कधीतरीच असायचं ते पण अगदी काही मिनिटांसाठी… पण त्यांच्या संसाराला नजर लागली आणि सगळंच बिघडलं….

” स्मिता… स्मिता काय होतंय तुला…, स्मिता…”

” राजेश… सगळ संपलं… मी.. माझं घर… माझा संसार… माझं करिअर… सगळ….” स्मिता त्याच्या कुशीत शिरून हमसून हमसून रडत होती…

” तुला किती वेळा सांगितल मी… नको ना ते न्यूज चॅनल बघत जाऊ… त्रास होतो ना तुला…” राजेश तिचा चेहरा ओंजळीत घेऊन तिला समजावत होता…

” राजेश…”

” अग… तू इथे बघ बरं… ऐक माझं… काहीही संपलेल नाहीये… कळलं तुला… तू काहीही केल नाहीये… सगळ ठीक होणार आहे…”

” नाही राजेश… काहीच ठीक नाही होणार आता… अरे आपले नातेवाईक, बाकीचे लोक पण माझ्याकडे कोणत्या नजरेने बघतायत बघतो ना तू….”

” तुला कधीपासून ह्या सगळ्यांच्या बोलण्याने फरक पडतोय स्मिता… मी आहे ना… माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर… तू अस कधीच वागणार नाहीस… आणि सगळ जग जरी आपल्या विरोधात गेलं ना तरीही मी तुझ्यासोबत च उभा असेन… कायम…” राजेश तिला धीर देत होता…

” स्मिता… चल जेवून घे…” तो तिला आवाज देत होता… पण ती शून्यात नजर लावून बसली होती.

तुम्ही वाचत आहात “तिचा सत्यवान” – नवरा बायको प्रेमकथा

” स्मिता…” तो तिच्या बाजूला येऊन बसला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला…

” ह… काय…” ती एकदम दचकली…

” जेवायला येतेय ना…”

” नाही… मला भूक नाही… तू जेवून घे…”

” तुझ्याशिवाय…?, आजपर्यंत तुला सोडून जेवलोय का मी… जे आज जेवेन…, चल…” तो तिला उठवू लागला…

” मला खरंच इच्छा नाही रे… तू जेव ना…”

” स्मिता… उद्या कोर्टात तारीख आहे… आपल्याला वेळेत हजर राहायला हवं…” तो तिला डायनिंग टेबल च्या खुर्चीवर बसवत म्हणाला… तो ऐकणार नाही म्हणून ती पण बसली…

” स्मिता… उद्याचा विचार नको करू… मी आहे ना… जेव तू…” ती जेवत नाहीये… कसला तरी विचार करतेय बघून त्याने स्वतःहून तिला घास भरवला… तीने ही तो डोळे पुसत खाल्ला…

जेवणं झाल्यावर तो तिच्या बाजूलाच बसून होता… एक मिनिट सुद्धा त्याने तिला त्याच्या नजरेसमोरून दूर न्हवत केलं… ती त्याला बिलगून रडून रडून झोपली होती…. उद्या कोर्टात शेवटची तारीख होती… उद्याच काय तो शेवटचा निर्णय होणार होता… आणि त्याची त्याने पूर्ण तयारी केली होती…

सगळेच कोर्टात हजर होते… काहीवेळाने कोर्टाची procedure सुरू झाली… आरोप प्रत्यारोप होत होते…. जिने स्मिता च्या नावाने केस फाईल केली होती त्या नेहा ने तिची बाजू मजबूत करून ठेवली होती… आणि त्यामुळेच स्मिता ची बाजू कमजोर पडली… स्मिता चा धीर सुटत चालला होता… तर राजेश तिला डोळ्यांनीच धीर देत होता… तो सारखा दरवाजा कडे बघत होता…. पुरावे मजबुत असल्याने निकाल नेहा च्या बाजूने लागत होता…. शेवटी जज नेहा च्या बाजूने निकाल देत होते… आणि स्मिता ला अटक करण्यात येत होती पण तेवढ्यात….

तुम्ही वाचत आहात “तिचा सत्यवान” – नवरा बायको प्रेमकथा

” थांबा जज साहेब… तूम्ही निकाल द्याल त्या आधी मला काही सांगायचं आहे…” दरवाजातून आवाज आला… राजेश चा मित्र संदेश तिथे उभा होता… राजेश कधीपासून त्याचीच वाट बघत होता… तो आला तसं राजेशच्या  जिवात जीव आला…

” हे बघा तुम्ही जे कोणी असाल… पण आता कोर्टाने निकाल दिला आहे… त्यामुळे त्यात काही बदल होणार नाही…. तूम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवू नका…” जज ने उत्तर दिलं…

” एखाद्याचं आयुष्य वाया जाण्यापेक्षा कोर्टाची वेळ वाया जाण हे चांगलं नाही का…?, जज साहेब प्लिज… माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला… एकदा ऐकुन घ्या आमचं… शंभर आरोपी सुटले तरी चालतील पण एका निर्दोष असणाऱ्याला शिक्षा नाही झाली पाहिजे….” संदेश कळवळून बोलत होता… शेवटी जज साहेबांनी ही त्याला बोलण्याची परमिशन दिली… तो कटघर्यात येऊन उभा राहिला… सगळ्यांचं लक्ष आता तो काय बोलणार याकडे लागलं होतं…

” जज साहेब… तर ह्या नेहा मॅडम… सॉरी सॉरी डॉक्टर नेहा मॅडम… ज्यांनी स्मिता वहिनी वरुद्ध कंप्लेंट केली होती… की त्यांच्या मुळे त्या पेशंट आशा चा मृत्यू झाला…”

” जज साहेब… हे फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत… त्याच गोष्टी सांगण्यात काय अर्थ आहे… ज्या इथे सगळ्यांनाच माहीत आहेत…” नेहा चा वकील तावातावाने बोलत होता…

” हे बघा… तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोला…” जज ने ऑर्डर दिली…

” स्मिता वहिनी निर्दोष आहेत…” संदेश ठाम पने म्हणाला…

तुम्ही वाचत आहात “तिचा सत्यवान” – नवरा बायको प्रेमकथा

” तुमच्याकडे काही पुरावे असेल तर तसं सांगा….”

” सांगायचं कशाला… दाखवतो च आता… घेऊन या रे….” संदेश ने त्याच्या साथीदारांना इशारा केला…. सगळे तो काय करतोय ते बघत होते… त्याची माणस लगेच कोणाला तरी घेऊन आले… तसे सगळेच त्या दिशेला डोळे मोठे करून बघू लागले…. ज्या पेशंट च्या मृत्यूचा आरोप स्मिता वर होता ती चक्क त्यांच्या समोर उभी होती….

” स्मिताsssss…” राजेश ओरडला… तिला चक्कर आली होती… तो धावतच तिच्या जवळ गेला… तिच्या चेहऱ्यावर पाणी मारून तिला भानावर आणलं… ती ठीक आहे ह्याची खात्री होताच कोर्टाची पुढची procedure सुरू झाली…

” सो मिस नेहा… हे सगळ काय आहे… तुम्ही माझ्या अशिलाला खोट्या केस मधे अडकवल…” राजेश चा वकील तिला जाब विचारत होता… बराच वेळ त्यांनी तिला आणि त्या आशा ला चांगलच वेठीस धरलं होत… शेवटी आशा कबुल झाली….

” हो… मी जिवंत आहे… पण… मी हे सगळ ह्यांच्या सांगण्यावरून केलं….” आशा रडत बोलून गेली… तीने नेहा कडे इशारा केला…

” You….?” नेहा किंचाळली….

” ऑर्डर ऑर्डर…. हे तुमचं घर नाही… जे काही बोलायचं आहे ते नीट बोला…” जज ओरडले…. आता नेहा कडे सगळ कबुल करण्या शिवाय पर्याय न्हवता…

” हो… मीच केलं हे सगळ…. फक्त आणि फक्त ह्या स्मिता मुळे…. ही आली आणि माझं सगळ आयुष्यच बदललं… आधी हॉस्पिटल मधे सगळे प्रत्येक गोष्ट नेहमी मला विचारून करायचे…. माझ्याशिवाय कोणाचं पान सुद्धा हलायच नाही…. पण फक्त हिच्यामुळे मला कोणीही भाव देत न्हवत…. एवढच काय तर हॉस्पिटल च्या Higher ओथोरिटी सुध्दा हीलाच महत्व देत होते…. मग मी ठरवलं काहीही करून हीचा काटा काढायचा… हिला कायमच आपल्या मार्गातून बाहेर करायचं….” नेहा रागात स्मिता कडे बघून बोलत होती…. स्मिता च्या डोळ्यातून फक्त पाणी येत होत….

” The defence rests your honour….” स्मिता चे वकील बोलले….

” सर्व नियम आणि पुराव्यांच्या विचार करता नेहा यांचा परवाना रद्द करण्यात येत आहे आणि नेहा आणि आशा ह्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनवण्यात येते. तसेच डॉक्टर स्मिता ह्यांना सईज्जत निर्दोष घोषित करण्यात येत आहे…. The court is adjourned for the day…!!!” जज निर्णय सांगून उठून गेले…

तुम्ही वाचत आहात “तिचा सत्यवान” – नवरा बायको प्रेमकथा

स्मिता आणि राजेश च्या आनंदाला पारावार उरला नव्हता…. दोघांचेही डोळे आनंद अश्रूंनी भरून वाहत होते… स्मिता पळतच त्याच्याकडे गेली…. तो पण तिला मिठीत घ्यायला सज्ज होता…. संदेश त्या दोघांना तसं बघून त्याच्या डोळ्यातलं पाणी परतवून लावून त्यांच्याकडे हसत बघत होता….

बाहेर रिपोर्टर उभेच होते…. राजेश स्मिता आणि संदेश बाहेर आले तस सगळे त्यांच्याजवळ आले… त्यापैकी एकाने स्मिता ला प्रश्न केला… ” मॅडम… गेल्या काही दिवसात एवढं सगळ घडल… आणि आता तुम्ही निर्दोष असल्याचे सिध्द झाले आहे… यावर तुम्ही काय सांगाल…”

” जर तुमचा जोडीदार योग्य असेल ना तर कोणतही संकट सहज पार करता येत…. जगाने माझ्यावर अविश्वास दाखवला पण माझा नवरा कायम माझ्या सोबत होता…” हे बोलताना तिच्या डोळ्यातला त्याच्या बद्दलचा आदर आणि प्रेम स्पष्ट दिसत होत…

” एवढंच नाही… तर भावासारखी सोबत करणारा दीर असणं हे माझं खूप मोठं भाग्य आहे…” हे बोलताना मात्र तिने संदेश कडे बघितल…. त्याच्या डोळ्यातून अलगद एक थेंब निसटला…. ती indirectly त्याला भाऊ म्हणाली होती… तेही सगळ्यांसमोर….

स्मिता आधीच थकली होती… त्यामुळे अजून कोणी काही विचारण्या आधीच राजेश तिला तिथून घेऊन निघाला… निघताना त्याने संदेश चे पण आभार मानले…

तुम्ही वाचत आहात “तिचा सत्यवान” – नवरा बायको प्रेमकथा

स्मिता वडाच्या झाडाची पूजा करून झाडाला फेरे घेत होती…. ती घेणाऱ्या प्रत्येक फेरीमध्ये तिला काल पर्यंतचे सगळे दिवस आठवत होते…. झालेल्या प्रकारामुळे तिला आणि त्याला दोघांनाही किती त्रास सहन करावा लागला होता…. नको नको ते आरोप झाले होते…. एक वेळ तर अशी आली होती की स्मिता डिप्रेशन मधे गेली…. पण फक्त आणि फक्त राजेश मुळे ती त्यातून सावरली होती…. त्याने वेळोवेळी तिला दिलेली साथ…. तिच्यावर दाखवलेला विश्वास…. तिचा निर्दोष पना सिद्ध करण्यासाठी केलेले प्रयत्न…. सगळ सगळ तिला आठवत होतं… जिथे संपूर्ण जग तिला दोषी मानून मोकळ झालं होत…. तिथे फक्त राजेश तिच्या बाजूने उभा राहिला होता…. तिची ताकद बनून…. तिची बाजू घेतो म्हणून त्यालाही खूप काही सहन करावं लागलं होत…. पण तरीही त्यानेच तिला सावरून धरल होत…. आणि आज तिच्या असण्यामागच कारण ही तोच होता…. ऐकलं होत…. सावित्री ने सत्यवानाचे प्राण परत आणले…. पण आज खऱ्या अर्थाने सत्यवान त्याच्या सावित्रीच्या मागे खंबीरपणे उभा होता…..

” काय मग…. साता जन्मासाठी बुकिंग केली का माझी…” ती फेरे घेऊन उभी असताना तो तिच्या मागे येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवून उभा राहिला….

” साता जन्मासाठी नाही….. जन्मोजन्मी साठी…..?”
ती त्याच्याकडे बघून गोड हसली…. त्यानेही तिला अलगद त्याच्या मिठीत सामावून घेतल….

समाप्त….

नवरा बायको प्रेमकथा

तुम्ही वाचत आहात “तिचा सत्यवान” – नवरा बायको प्रेमकथा

पहिलं प्रेम भाग १ वाचण्या साठी क्लीक करा पहिलं प्रेम भाग १

Author @यशश्री…?

Click to read- The Power Of Relationships

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *