लाल बहादूर शास्त्री को किसने मारा

लाल बहादूर शास्त्री को किसने मारा :

भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री हे होते. त्यांच्या या कार्यकाळात नेहरूजीं च्या निधनामुळे शास्त्रीजींना ९ जून १९६४ रोजी या पदासाठी नामनिर्देशित करण्यात आले होते .
त्यांचे स्थान दुसरे होते, पण त्यांचा नियम ‘अद्वितीय’ राहिला. या शांत आणि साध्या व्यक्तीला १९६६ मध्ये देशाचा सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न‘ हा देण्यात आला होता.शास्त्रीजी हे महान स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी महात्मा गांधी व जवाहरलाल नेहरू यांच्या पावलावर पाऊल ठेवले. १९६५ रोजी च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी देशाची धुरा सांभाळली.आणि लष्कराला योग्य अशी दिशा दिली.लाल बहादूर शास्त्री को किसने मारा

लाल बहादूर शास्त्री यांचे कुटुंब:

शास्त्री यांचा जन्म २ऑक्टोबर १९०४ रोजी मुगलसराय (उत्तर प्रदेश), येथे झाला. शास्त्रीजींचा जन्म उत्तर प्रदेश मधील कायस्थ कुटुंबात झाला.मुन्शी शारदा प्रसाद श्रीवास्तव असे त्यांच्या वडिलांचे नाव होते. त्यांचे वडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते . त्यांना ‘मुन्शी जी’ या नावाने संबोधले जात असे.त्यांच्या आईचे नाव राम दुलारी असे होते.लाल बहादूर शास्त्री को किसने मारा

शास्त्रीजींचे प्रारंभिक जीवन:

लालबहादूरजींना लहानपणी त्यांच्या घरचे लोक ‘नन्हे’ असे म्हणत. एप्रिल १९०६ मध्ये जेव्हा शास्त्री १ वर्ष आणि ६ महिन्यांचे होते. तेव्हा नुकतेच नायब तहसीलदार या पदावर बढती मिळालेल्या त्यांच्या वडिलांचा बुबोनिक प्लेग च्या साथीने मृत्यू झाला. श्रीमती रामदुलारी देवी त्या वेळेला फक्त २३ वर्षांच्या होत्या. तसेच तिसर्‍या अपत्यासह गर्भवतीही होत्या. त्या आपल्या दोन्ही मुलांना घेऊन रामनगरवरुन मुघलसराय येथे त्यांच्या वडिलांच्या घरी राहायला गेल्या.आणि तिथेच स्थायिक झाल्या. त्यांनी जुलै १९०६ मध्ये सुंदरी देवी या मुलीला जन्म दिला.
अशा प्रकारे शास्त्रीजी आणि त्यांच्या बहिणी त्यांचे आजोबा हजारी लालजी यांच्या घरात लहानाच्या मोठ्या झाल्या .त्यानंतर त्यांचे आजोबा हजारी लालजी स्ट्रोकने मरण पावले (स्ट्रोक ही वैद्यकीय स्थिती आहे . लाल बहादूर शास्त्री को किसने मारा

ज्यामध्ये मेंदूला खराब रक्त प्रवाहा झाल्यामुळे पेशींचा मृत्यू होतो). १९०८ च्या मध्यात त्यांचे भाऊ (शास्त्रींचे चुलते ) दरबारी लाल, जे गाझीपूर येथील अफू नियमन विभागात मुख्य कारकून होते . आणि त्यांचा मुलगा (रामदुलारी देवीचा चुलत भाऊ) बिंदेश्वरी प्रसाद यांनी कुटुंबाची देखभाल करण्यास सुरुवात केली .शास्त्रीजींचे प्राथमिक शिक्षण मिर्झापूर येथे झाले . आणि त्यापुढील शिक्षण हरिश्चंद्र हायस्कूल व काशी-विद्यापीठ येथे झाले.शास्त्रीजी यांनी संस्कृत या भाषेतून ग्रॅज्युएशन केले.‘शास्त्री’ ही पदवी त्यांना काशी-विद्यापीठात मिळाली. या काळापासून त्यांनी आपल्या नावाला ‘शास्त्री’ हे नाव जोडले. यानंतर ते शास्त्री म्हणून ओळखले जावू लागले.१९२८ मध्ये ललिता यांच्याशी त्यांचा विवाह झाला . त्यांना सहा अपत्ये होती. त्यांचा एक मुलगा अनिल शास्त्री हे काँग्रेस पक्षाचे सदस्य होते .लाल बहादूर शास्त्री को किसने मारा

शास्त्रीजी यांची राजकीय कारकीर्द :

स्वतंत्र भारतामध्ये त्यांची उत्तर प्रदेश संसदेच्या सचिवपदी नियुक्ती झाली. गोविंद वल्लभपंत यांच्या मंत्रिमंडळाच्या छायेखाली त्यांच्याकडे पोलीस व वाहतूक व्यवस्था देण्यात आली.
या कारकीर्ती दरम्यान शास्त्रीजींनी महिलेची कंडक्टर म्हणून नियुक्ती केली . आणि पोलीस खात्यामध्ये लाठीऐवजी पाण्याच्या तोफांनी गर्दी नियंत्रित करण्याचा नियम केला गेला .
१९५१ मध्ये शास्त्रीजींना ‘अखिल-भारतीय-राष्ट्रीय-काँग्रेस’चे सरचिटणीस बनवण्यात आले. लाल बहादूर शास्त्री हे पक्षासाठी नेहमीच समर्पित होते. १९५२ , १९५७, १९६२ च्या निवडणुकीत त्यांनी पक्षाचा भरपूर प्रचारआणि प्रसार केला . लाल बहादूर शास्त्री पर १० लाईन

काँग्रेसला प्रचंड बहुमताने विजय मिळवून दिला.शास्त्रीजींची क्षमता पाहून जवाहरलाल नेहरूजींच्या आकस्मिक निधनानंतर त्यांची पंतप्रधान या पदी नियुक्ती करण्यात आली, पण त्यांचा कार्यकाळ हा खूप कठीण आणि खडतर होता. शत्रू-देश आणि भांडवलशाही देश यांनी आपली सत्ता अत्यंत आव्हानात्मक बनवली होती. अचानक १९६५ मध्ये संध्याकाळी ७.३० वाजता पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ला केला. या स्थितीमध्ये अध्यक्ष सर्वपल्ली राधा कृष्णन यांनी बैठक बोलावली. या बैठकीमध्ये तीनही संरक्षण विभागांचे प्रमुख आणि शास्त्रीजी हे उपस्थित होते.

लाल बहादूर शास्त्री को किसने मारा

या चर्चेदरम्यान, प्रमुखांनी लाल बहादूर शास्त्रींना संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली आणि त्यांच्या आदेशाची प्रतीक्षा केली, तेव्हाच शास्त्रीजींनी त्यांना उत्तर दिले, “तुम्ही देशाचे रक्षण करता ,
तुम्हीच आम्हाला सांगा काय करायचे आहे? या प्रकारे भारत-पाक युद्धाच्या काळात शास्त्रीजी यांनी प्रशंसनीय नेतृत्व देऊन “जय जवान ,जय किसान” असा नारा दिला .ज्यामुळे देशात सगळीकडे एकता निर्माण झाली आणि भारताने पाकिस्तानचा पराभव केला. ज्याची पाकिस्तानने अजिबात कल्पनाही केली नव्हती.कारण त्याआधी तीन वर्षांपूर्वी युद्धात चीनने भारताचा पराभव केला होता.१९६५ च्या युद्धात लाल बहादूर शास्त्रींच्या ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेने अन्नटंचाईच्या काळात सैनिकांचे आणि शेतकऱ्यांचे मनोबल वाढवले.

शास्त्रीजी यांचा मृत्यू कसा झाला?

रशिया आणि अमेरिका यांच्या दबावामुळे शास्त्रीजींनी रशियाची राजधानी ताश्कंद या ठिकाणी पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांची भेट घेऊन शांतता करारावर स्वाक्षरी केली.दबावाखाली शांतता करारावर स्वाक्षरी केल्याचे बोलले जात आहे. कराराच्या रात्री ११ जानेवारी १९६६ रोजी शास्त्रींजींचा रहस्यमयरीत्या मृत्यू झाला. त्यावेळी शास्त्रीजींना हृदयविकाराचा झटका आला होता. पण असेही म्हणले जाते की त्यांचे शवविच्छेदन झाले नाही. कारण त्यांना विष प्राशन करण्यात आले होते, हा एक सुनियोजित कट होता. जो अजूनही ताश्कंदच्या हवेत दडून बसला आहे.अशाप्रकारे केवळ १८ महिने लाल बहादूर शास्त्रींनी भारताची धुरा सांभाळली. त्यांच्या अकस्मात मृत्यूनंतर गुलझारी लाल नंदा यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली. यमुना नदीच्या काठी शास्त्रीजींचे अंत्यसंस्कार करण्यात आले . आणि त्या जागेला ‘विजय घाट’ असे नामकरण देण्यात आले.लाल बहादूर शास्त्री पर १० लाईन

१९७८ मध्ये त्यांच्या पत्नी यांनी ‘ललिता के अनूस’ नावाच्या पुस्तकात शास्त्रीजींच्या मृत्यूची कहाणी सांगितली. शास्त्रीजीं बरोबर ताश्कंदला गेलेल्या कुलदीप नायर यांनीही अनेक तथ्ये उघड केली .पण बरोबर निकाल लागला नाही. २०१२ मध्ये त्यांचा मुलगा सुनील शास्त्री यांनीही न्यायाची मागणी केली होती, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

शेती नावावर करून घेताना – आजची वास्तवता

उन्हाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्यावी ? तुम्हाला आमच्या या ब्लॉगवर जाऊन नवीन माहिती घ्यायला नक्की आवडेल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *