15 August Marathi Speech: कथा स्वातंत्र्य दिनाची

15 August Marathi Speech/bhashan: १५ ऑगस्ट १९४७
“वंदे मातरम”, आज १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस आपल्याला भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून माहित असेल. पण तुम्हाला माहित आहे का ह्याच दिवशी आपल्याला स्वातंत्र्य का मिळालं ?. आज आपण जाणून घेऊ नक्की १४ ऑगस्ट च्या रात्री काय झालं. ती रात्र ज्या रात्री भारताचा इतिहास भूगोल बदलून गेला. ती रात्र होती स्वातंत्र्याची रात्र.दिल्ली मध्ये १४ ऑगस्टच्या सायंकाळपासून जोरदार पाऊस सुरु होता. रात्र होता होता “रायसिंग हिल्स” वरती जवळ जवळ ५ लाख लोकांचा जमाव झाला. रात्री १० च्या सुमारास सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद आणि माऊंट बेटेन रिसरॉय हाऊसवर पोचले. १४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री १२ वाजण्यास २ मि. बाकी असतानाच पंडित जवाहरलाल नेहरूंनी दोन ओळी बोलून भाषणास सुरवात केली. “एट द स्ट्रोक ऑफ मिड-नाईट आवर्स व्हेन द वर्ल्ड स्लेप्ट इंडिया विल बी अवेक टू लाइफ अँड फ्रीडम”. थोड्याच वेळात १२ वाजले आणि १५ ऑगस्ट हा दिवस भारताला आनंद घेऊन आला. १९० वर्षानंतर ब्रिटिश सरकारकडून स्वतंत्र झाला होता पण आनंदसोबत दुःख पण होतं कारण भारताने आपला ३,४६,७३७ square.कमीचा विस्तार आणि जवळ जवळ ८,१५,००,००० जनसंख्या गमावली होती. देश दोन तुकड्यांमध्ये विभाजित झाला होता, हिंदुस्थान आणि पाकिस्तान.

15 august marathi bhashan pdf

15 August Marathi Speech: १५ ऑगस्ट १९४७

हिंदुस्थान असाच स्वतंत्र नव्हता झाला १५ ऑगस्टच्या खूप आधीपासून ब्रिटिश हुकूमतचा अंत सुरु झाला होता. महात्मा गांधींच्या जण आंदोलनाने देशात नवीन क्रांतीची सुरवात झाली होती तर दुसरीकडे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने इंग्रजांच्या नाकात दम आणला होता. त्यात दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश सरकारकडे एवढा दम पण नव्हता की ते आता भारतावर राज्य करू शकतील. म्हणून माऊंट बेटेनला भारताचा शेवटचा व्हाइसरॉय बनवले ज्यानेकरून देशाला जास्तीत जास्त पद्धतीने स्वतंत्रता देऊ शकेल. इंग्रजांनी भारताला सुरवातीला ३ जून १९४८ च्या दिवशी स्वतंत्र घोषित करण्याचा निर्णय घेतला होता पण मोहम्मद अली जिन्हाने पाकिस्तान नावाने स्वतंत्र देश निर्माण करण्याचे ठरवले होते. देशात सांप्रदायिक हिंसा होण्यास सुरवात झाली. हि बिघडती परिस्थिती लक्षात घेता इंग्रजांनी भारताला लवकरात लवकर स्वतंत्र करण्याचा निर्णय घेतला कारण इंग्रजांना देखील भारताला एक नव्हे तर दोन तुकड्यांकडे विभाजित करायचे होते.

15 August Marathi Speech/bhashan: १५ ऑगस्ट १९४७

स्वातंत्र्यासाठी १५ ऑगस्टचाच दिवस का निवडण्यात आला, त्याच कारण असं आहे की आपण भारतीयच फक्त शुभ-अशुभ मानत नाही तर इंग्रज देखील तेवढेच मानत होते. माऊंट बेटेन मानत होता की १५ ऑगस्टचा दिवस शुभ आहे कारण १५ ऑगस्ट १९४५ च्या दिवशी जपानने शरणागती स्वीकारली होती आणि त्याची ऑफिसिअल साइन २ सप्टेंबरला झाले होते. माऊंट बेटेनच्या अनुसार १५ ऑगस्ट चा दिवस मित्र राष्ट्रांसाठी शुभ होता. मग देश स्वातंत्र्यासाठी रात्री १२ चीच वेळ का निवडली? यावर भारतीय ज्योतिषाचं असं मत होत की हीच वेळ देश स्वातंत्र्यासाठी शुभ आहे. असं ठरलं होतं की पंडित जवाहरलाल नेहेरु यांचं भाषण रात्री १२च्या आधी संपले पाहिजे आणि १२ वाजताच शंख नादाने लोकतंत्राची सुरवात होणार. ठरल्याप्रमाणे तसंच झालं. १५ ऑगस्टच्या सकाळी ८:३० वाजता पंडित नेहेरु आणि त्यांच्या कॅबिनेट मंडळाने पद आणि गोपनीयताची शपत घेतली. रात्रीच्या मुसळधार पावसानंतर आकाश शुभ्र दिसत होते. लोक डोळे लावून वाट बघत होते स्वतंत्र भारताचा झेंडावंदनासाठी. सर्वात आधी जवाहरलाल नेहेरु यांनी रात्री १२ वाजताच पार्लमेंट सेंटर हॉल मध्ये झेंडावंदन केले होते आणि दुसऱ्यांदा सकाळी ८:३० वाजता संपूर्ण जनते समोर भव्य राष्ट्रध्वज ब्रिटिश राष्ट्रध्वज उतरवून फडकावला. त्यावेळी संपूर्ण देश आनंदाने रडला. १५ ऑगस्टच्या स्वातंत्रानंतर ब्रिटिश सरकारने संपूर्ण देश एकत्र नव्हता सोडला. इंग्रज सरकारचे काही भारतीय ऑफिसर इंग्रजच राहिले. १५०० ब्रिटिश सरकारची पहिली तुकडी १७ ऑगस्ट १९४७ ला आपल्या मायभूमीला परत गेली. तर शेवटची तुकडी २७ ऑगस्ट १९४७ ला रवाना झाली. मित्रानो, विशेष म्हणजे इंग्रज जसे पाहुणे म्हणून आले होते तसेच जाताना पाहुणचार करून त्यांना पाठवण्यात आले. त्यांच्या शेवटच्या तुकडीने मुंबईच्या बंदरावरून रजा घेतली त्यावेळी जॉर्ज पंचमला रजा करतानाचे गीत बँड- बाजा सोबत वाजवण्यात आले. स्वातंत्र्याच्या १९० वर्षाआधी सुद्धा अमीर चंद आणि मिर जाफरने रॉबर्ट क्लायंटचे असेच सन्मानाने स्वागत केले होते. पण झाले काय प्लासीचे युद्ध आणि १९० वर्षांचे पारतंत्र्य. तरीही आपण भारतीय नाही सुधारलो, “अतीथी देवो भव:”, या सूत्राला आपण आजही नाही सोडले, तो देवतुल्य असो किंवा आपल्याला लुटायला आलेला. मित्रानो देशाच्या या स्वातंत्र्याच्या गोष्टीला लक्षात घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा.
जय हिंद.

15 august marathi bhashan pdf

15 August Marathi Speech: १५ ऑगस्ट १९४७

Author: Chaitanya Thorat

खालील लेख वाचा

रक्षाबंधन २०२०


Made In India Smartphone Review वाचण्या साठी क्लिक करा

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 5 / 5. Vote count: 2

No votes so far! Be the first to rate this post.

As you found this post useful...

Follow us on social media!

2 thoughts on “15 August Marathi Speech: कथा स्वातंत्र्य दिनाची”

  1. Pingback: Eco Friendly Ganesh: मी बनवलेला "माझा बाप्पा" - Maza Blog

  2. Pingback: Ganesh Arti Lyrics: Most needed Artis in Festival - Maza Blog

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *