औरंगजेब आणि त्याचे शिक्षण विषयीचे विचार

औरंगजेब आणि त्याचे शिक्षण विषयीचे विचार
ही गोष्ट आहे १६५९- १६६० सालची
इटालियन पर्यटक निकोलाओ मनूची
(हाच तो मनूची ज्याच्या सांगण्यावरून मीर मोहम्मद याने १६६५साली छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारुढ चित्र काढले)
याने त्याचा भारत प्रवास लिहून ठेवला आहे ज्यात औरंगजेबाच्या दरबारात तो उपस्तीत असताना घडलेल्या एका घटनेविषयी माहिती मिळते. औरंगजेब आपल्या सर्व भावंडांवर मात करून दिल्लीच्या तख्तावर बसला होता, त्याने नुकतेच स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला होता. तिकडे शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून विजापुर काबीज केले होते आणि संभाजी महाराजांचा जन्म नुकताच झाला होता. औरंगजेब अगदी धूर्त शासक होता त्याला कोणावरच विश्वास नसे अगदी लहानपणा पासून संशयी असलेला औरंगजेब अगदीच हुशार आणि चलाख होता. त्याला कायम असे वाटायचे त्याच्या वडिलांनी त्याच्यावर अन्याय केला आणि त्याच्या भावावर दाराशुकोह वर कायम कृपा केली त्याचेच हे उदाहरण.

तो नुकताच राजगादीवर बसून कारभार सांभाळू लागला, दिल्लीच्या नव्या बादशहाची आपल्यावर कृपा राहावी म्हणून अनेक सरदार व प्रतिष्ठित नागरिक त्याला भेटायला येत, नजराणे पेश करत औरंगजेबही त्यांना काही जबाबदारी आणि इनाम देत असे.
औरंजेबाच्या राज्याभिषेकाची बातमी समस्त हिंदुस्थान भर पसरली होती ही बातमी काबुल प्रांतात राहणाऱ्या मुल्लासालेह पर्यंत देखील पोहोचली. नवीन बादशहा आपला जुना शिष्य झाल्याचे ऐकून मुल्लासालेह ला आनंद झाला आणि लालसा देखील झाली,
त्याला वाटले आपण औरंजेबाला शिकवले आणि तो आता दिल्लीपती बादशाह झाला आहे म्हणून आपण भेटायला जावे, आपण एका राजपुत्राला शिकवायला किती कष्ट घेतले ते त्याला सांगावे, जेणेकरून औरंगजेब खुश होऊन आपल्यावर कृपा करून मोठा इनाम देईल. मनात असे इमले बांधून मुल्लासालेह दिल्लीला निघाला. दिल्लीला पोहोचून त्याने औरंजेबाच्या दरबारातल्या अनेक सदारांच्या गाठी- भेटी घेऊन स्वतःचा वशीला लावण्याचा देखील प्रयत्न केला औरंगजेबाला जेव्हा मुल्लासालेह भेटायला आल्याचे समजले तेव्हा त्याने आपण व्यस्त असल्याचे कळवले.
औरंगजेबाच्या मनात त्याच्या शिक्षका बद्दल किंचितही प्रेम नव्हते त्याचे म्हणने होते की ह्या शिक्षकाने मला राजा होण्यासाठीचे कोणतेच शिक्षण दिलेच नाही ह्याने तर फक्त अरबी शिकवण्यात माझे बालपण बरबाद केले मुल्लासालेह आणि माझ्या राजपुत्रांच्या शिक्षकांना सोबतच धडा शिकवला पाहिजे जेणेकरून आत्ताचे शिक्षक तरी नीट काम करतील. तब्बल तीन महिन्यांच्या परिश्रमानंतर मुल्लासालेह ला औरंगजेबाची भेट घेता आली औरंगजेबाने त्या दिवशी सर्व बड्या सरदारांना राजपुत्रांना आणि त्यांच्या शिक्षकांना दरबारात उपस्तीत राहण्याचा हुकूम दिला.
दिवस उजाडला दरबार भरला औरंगजेब दरबारात आला मुल्लासालेह ला उपस्तीत राहण्याचा हुकूम झाला मुल्लासालेह स्वतःच्याच नादात हसतमुखाने दरबारात आला रिवाजाप्रमाणे मुजरा केला पण तो काही बोलणार तोच औरंगजेबाने बोलायला सुरुवात केली

औरंगजेब आणि त्याचे शिक्षण विषयीचे विचार

” मुल्लाजी! बादशहाचे आपल्या राजपुत्रांसाठी चे आद्य कर्तव्य म्हणजे त्यांना उत्तम निरोगी व सुदृढ दाई निवडून तिच्या स्थनपानामुळे आपली मुले सुद्धा मिरोगी सुदृढ आणि बलवान व्हावीत, जेणेकरून बलशाली बादशहा म्हणून ती मुले नावाजली जातील. परंतु इतक्यातच राजाची कर्तव्ये संपत नाहीत. उलट दाई निवडताना जी दक्षता घेतली जाते त्या पेक्षा जास्त काळजी शिक्षक निवडताना करावयास हवी. कारण मुलांची प्रकृती जशी दुधावर अवलंबून असते तसेच त्यांचे बुद्धी चातुर्य शिक्षकावर अवलंबून असते. त्यामुळे सगळेच सरदार लोक बुद्धिमान शिक्षकांच्या शोधात असतात, त्याला चांगले ठाऊक असते ह्या बौद्धिक दुधाशिवाय मुलं आपल्या पित्राचे नावलौकिक करू शकत नाहीत.
म्यासिडोनियाचा फिलिप राजाचा मुलगा होतकरू होता म्हणून त्याला शिक्षण देण्यासाठी फिलिप ने श्रेष्ठ पंडित एरिस्टोटलला आपल्या दरबारात येण्याची विनंती केली आपल्या गुरूच्या विद्येचा अलेक्झांडर ला इतका फायदा झाला की सर्वश्रेष्ठ योद्धा म्हणून तो नावारूपाला आला. एखादा राजपुत्र मोठा झाला की लहानपणी मिळालेले धडे विसरून तो व्यसनी होऊ शकतो, पण लहान वयात जर त्याला चांगले धडेच दिले नाही तर तो मुलगा गुणवान सद्गुणी कसा बर होईल! एकंदरीत पाहता मुलाला घडवण्याचे काम आईवडिलांपेक्षा जास्त शिक्षकांचे असते. मनाची प्रगल्भता उत्तम शिक्षणानेच होते, जर मन बलवान नसेल तो विद्यार्थी उत्तम राजा कसा बनेल! “

इतके बोलून औरंगजेब थांबला नाही त्यानं बायबल मधले उदाहरण देखील दिले तो म्हणाला ” सर्वश्रेष्ठ सालोमन याने वडिलांकडून शिक्षण घेतले त्याने वडिलांकडे धन संपत्ती मागितली का? नाही, तर त्याने परमेश्वराकडे योग्यरितीने राज्यपालन करण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि विवेकबुद्धी दे. कारण सालोमनला माहीत होते ज्याच्याकडे ज्ञान आहे तोच सर्वश्रेष्ठ आहे. इतिहासात अनेक महान राजे होऊन गेले ते त्यांना ज्ञान देणाऱ्या शिक्षकांमुळे असे शिक्षक मिळणे भाग्यच.
जगात प्राचीन काळी ऍसिरियन, आणि पर्शियनय इ. लोकांनी राज्ये होती, सिथीयन जमातीचे लोक पूर्वी कातडी वस्त्र विकीत डोगराळ भागात राहत, ते संख्येने थोडे असत, नेच लोक म्हणजे आज तुर्क नामाने प्प्रख्यात झाले आणि आशिया व आक्रिका यावर दृढपणे सत्ता गाजवत आहेत, या गोष्टी तुम्ही मला शिकविल्यात काय ! युरोपियन फिरंगी यांची साधने अल्प आहेत. असे असुनहीं त्यांनी ऑटोमन तुर्कांशी युद्ध केले आणि तिचा पराभुत केले. या युरोपियन फिरंग्यांच्या कल्पकतेच्या आणि शौर्याच्या गोष्टी तुम्ही मला कधी तरी सांगितल्या काय! निदान तुम्ही मला चीनी संपत्ति आणि वैभव यांच्या गोष्टी तरी सांगितल्यात का नाही. तुम्ही या गोष्टी माझ्यापासून दडवून ठेवल्यात.
इतकेच नाही हिंदुस्तानसोडलं तर बाहेर कुठे बादशहा नाहीत असतील तर तर लहान सहान असतील असे खोटंच सांगितलं त्यांची युद्धकला सैन्यबळ शस्त्रास्त्र चालीरीती त्यांचे शासन व्यवस्था त्यांचे धर्म ह्याबद्दल देखील सांगितलं नाही इतकेच काय आमचे पराक्रमी पूर्वज तैमुरलंग यांचे राहणीमान शासन व्यवस्था त्यांचे पराक्रम देखील सांगितले नाही तुम्ही दिल ते फक्त अरबी पांडित्यपूर्ण शिक्षण जे शिकण्यात मी माझी बारा वर्षे वाया घालवली तुम्ही अरबीत जे शिकवलं ते माझ्या मातृभाषेत शिकवलं असत तर लवकर समजलं असत तुम्ही मला मुघलांचे रीतिरिवाज देखील शिकवले नाही तुम्ही मला का शिकवलं नाही की शस्त्र कसे हाताळायची किल्ल्याला वेढा कसा द्यायचा शत्रूसोबत तह कसे करायचे ह्या सगळ्यचा दोष नक्की कुणाला द्यायचा माझ्या निष्काळजी वडिलांना की अज्ञानी तुम्हालाच? तुम्हाला युद्धकला अवगत नाही तुम्हाला राजकारण अवगत नाही तुम्हाला लढाईची रचना समजत नाही जर माझ्या सुभ्यात कुणी मंत्र्याने गैरव्यवहार केला तर ते कसं हाताळायच ते सुद्धा तुम्ही मला शिकवलं नाही मला ज्या गोष्टींची गरज होती त्यातलं तुम्ही मला काहीच शिकवलं नाही तुम्ही माझं बालपण व्यर्थ दवडण्यात घालवला! इतकेच नाही आजचा हा दिवस सुद्धा तुमच्यामुळे वाया गेला असे मी समजतो!”
इतकं बोलून औरंगजेब दरबारातून निघून गेला.

औरंगजेब आणि त्याचे शिक्षण विषयीचे विचार

***हा संवाद पाहून आपल्याला वर्तमानाचा भास नक्कीच झाला असेल, कारण आपली शिक्षणव्यवस्था सुद्धा अशीच धसमुसळी दिसते आपल्याला लहानपणापासून जे शिक्षण मिळते त्यातलं दहा टक्के सुद्धा बाहेर वापरता येत नाही आपलं व्यवहारज्ञान अर्धवटच राहत आपल्यातले कलागुण जोपासले जात नाहीत त्या कलागुणांना प्रोत्साहन देखील मिळत नाही अभ्यासाच्या नावावर घोकंपट्टी चालते मग नंतर आपणच औरंगजेबासारखे आपल्या पालकांना आणि शिक्षकांना दोष देतो. काही शहाजहान सारखे पालकही आपल्या मुलांच्या अंगचे कलागुण न पाहता त्यांच्यावर अन्याय करतात. त्यामुळे मुलं अपयशी होऊन वाईट संगतीत जातात. मुलांच्या आवडीनिवडी जपणे आणि त्यातूनच त्यांचे क्षेत्र निवडून त्यांना लहानवयातच त्या क्षेत्रासाठी तयार करणे ही पालकांची जबाबदारी आहे.
औरंगजेबाचा एकंदर स्वभाव पाहता त्याने इतकी तक्रार असलेल्या शिक्षकाला शिक्षा दिली असावी, परंतु मनूचीच्या पुस्तकात तसा उल्लेख नाही. त्यामुळे तो शिक्षक जीवाने जरी वाचला असला तरी इतके बोल ऐकून मनाने नक्कीच मेला असेल.
तुम्हाला गोष्ट काशी वाटली comment मध्ये नक्की सांगा.
लेखन सीमा!

संदर्भ:-
Storia do Mogor(असे होते मोगल) -Niccolao Manucci

Author – Vikram Rasal

आमचे इतर महत्वाचे ब्लॉग वाचा

Subhedar Malharrao Holkar: मराठी इतिहास

Made In India Smartphone Review वाचण्या साठी क्लिक करा

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 5 / 5. Vote count: 2

No votes so far! Be the first to rate this post.

As you found this post useful...

Follow us on social media!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *