सर्व सणांनमध्ये मोठा सण म्हणून दिवाळीला ओळखतात. या सणाला प्रत्येक दिवसाचे एक महत्व असते. या प्रत्येक दिवसाची माहिती तर घेऊयाच आणि बघूया या वर्षी तारखेनुसार कोणता दिवस कसा साजरा करायचा आहे ते. पुढे वाचत राहा दिवाळी माहिती मराठीत : 2021 Diwali Date Marathi हा लेख…..
2021 Diwali Date Marathi
ह्या वर्षी १ नोव्हेंबर २०२१ हा दिवाळीच पहिला दिवस असणार आहे. त्या दिवशी गोवत्स द्वादशी म्हणजेच बासुबारस साजरी करायची आहे. त्यानंतर २ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी आणि धन्वंतरी जयंती असेल. या दिवशी यम दीपन करावे. त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२१ ला नरकचतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन साजरे केले जाईल. ५ नोव्हेंबर ला बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा तर ६ नोव्हेंबरला भाऊबीज आलेले आहे. तुम्ही ह्या वेळी दिवाळी खूप जल्लोषात आणि हर्षोल्हासात साजरी करावी अशीच अपेक्षा. चला तर आता बघूया ह्या प्रत्येक सणाचे ऐतिहासिक आणि पारंपारीक महत्व.
वसुबारस : दिवाळी माहिती मराठीत
दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस होय. वसुबारस या शब्दाचा अर्थ असा की वसू म्हणजे द्रव्य म्हणजे धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवशी गाई आणि वासरांची पूजा करतात. घरामध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे. समस्त द्यायची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्या घरी गुरे आणि वासरे आहेत. त्यांच्याकडे या दिवशी पूर्ण वरणाचा स्वयंपाक केला जातो. सुवासिनी बायका गाईच्या पायावरती पाणी घालून हळद, कुंकू, अक्षदा, फुले वाहून गळ्यात फुलांची माळ घालतात. निरंजनने ओवाळून त्यानंतर केळीच्या पानावर ती नैवेद्य ठेवून गाईला खाऊ घालतात. या दिवसापासून अंगणामध्ये रांगोळी काढण्यास सुरूवात करतात. बऱ्याच महिलीचा उपवास असतो. या दिवशी गहू आणि मूग खात नाही. महिला बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला बाळांना चांगले आरोग्य मिळावे. आणि सुख मिळावे यासाठी ही पूजा प्रथम केली जाते.

2021 diwali date marathi
धनत्रयोदशी: दिवाळी माहिती मराठीत
धनवंतरी किंवा धनत्रयोदशी ही अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी असते. या दिवशी आई माता लक्ष्मी पूजा केली जाते. दिवाळी उत्सव चालू असताना. धनत्रयोदशी आगळे वेगळे रूप येते.
धनत्रयोदशी या सणा पाठीमागे सुंदर अशी एक कथा आहे. कथित भविष्यवाणी प्रमाणे हेम राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मरण पावणार असे सर्वांना माहित असते. आपल्या पुत्राने जीवनातील सर्व सुख अनुभवावे म्हणून राजा आणि राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चौथा दिवस खूप भयंकर असतो. कारण त्या दिवशी तो मरण पावणार हे निश्चित असते. त्यादिवशी त्याची पत्नी आणि आई वडील त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवततात . महालाचे प्रवेशद्वार अशाच प्रकारे सोन्या-चांदीने भरून लख्ख प्रकाश केला जाते. मोठमोठ्या दिव्यांनी महालात सगळीकडे प्रकाश प्रज्वलित केला जातो. जेव्हा यम राजपुत्राच्या खोलीमध्ये सर्प स्वरूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा त्यांचे डोळे सोन्या-चांदीच्या प्रकाशाने दिपून जातात. या कारणामुळे यम देव आपल्या यमलोकामध्ये परत जातात. अशा प्रकारे राजकुमारचे प्राण वाचतात. म्हणून या दिवसास यमदीप दान करावे असे म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून. त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर दिव्यास नमस्कार करावा. असे केल्याने अपमृत्यू टळतो असा समज आहे.
याच दिवशी कित्येक वर्षांपूर्वी समुद्रमंथन केले गेले. दुर्वासास ऋषींच्या शापातून देवांना मुक्त करण्यासाठी कूर्म अवतार धारण केलेल्या भगवान विष्णूंच्या पाठीवर समुद्राचे घुसळणे चालू होते. तेव्हा त्यातून अनेक रत्ने बाहेर पडली. त्यातील एक म्हणजे देवी लक्ष्मी आणि दुसरे म्हणजे देव धन्वंतरी. धनवंतरी हि आरोग्याची देवता आहे त्यामुळे धनवंतरी पूजन केले जाते.
नरक चतुर्दशी: दिवाळी माहिती मराठीत
दीपावली मध्ये अश्विन कृष्ण चतुर्दशीला हा सण साजरा केला जातो. नरक चतुर्दशीच्या दिवशी माता लक्ष्मीचे पहाटे स्वागत करून आपल्यातील आत्मज्योत प्रकाशित करण्यासाठी आत्मेतील अहंकार नष्ट व्हावा अशी प्रार्थना करतात. या दिवशी सकाळी पहाटे सूर्योदय होण्याच्या आधी अभ्यंग स्नान करायचे असते. आंघोळ करताना उटणे, सुवासिक तेल, सुगंधी साबण वापरतात.
नरक चतुर्दशीची पुरातन कथा: पूर्वी भूमीवर नरकासुर नावाचा एक ताकतवान असुर राज्य करत होता. देव आणि मानव यांना त्याच्याकडून खूप त्रास होऊ लागला. जिंकून आणलेल्या सोळा शस्त्र उपवर राजकन्यांना त्याने कारागृहामध्ये कोंडून ठेवले होते. त्याची बातमी पूर्ण श्रीकृष्णाला समजतात. त्याने नरकासुरावर आक्रमण केले. या युद्धात नरकासुराला श्री कृष्णाने ठार केले. तेथील राजकन्यांना कारागृहातून सोडून आणले. त्याच्या पराक्रमावर खुश होऊन नरकासुराला मरताना श्रीकृष्णाने एक वरदान दिले. ते म्हणजे जो त्या तिथीला पहाटे अंघोळ करील त्याला नरकाची पीडा होणार नाही. त्यामुळे हा दिवस नरक चतुर्दशी म्हणून साजरा केला जाऊ लागला. श्रीकृष्णाच्या या पराक्रमाने स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला. श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदी शाळेतील सोळा सहस्त्र कन्याची मुक्तता केली. तो हा दिवस दुष्टांचा नाश आणि मुक्तीचा आनंद असे या दिवसाचे महत्त्व आहे. या दिवशी पहाटेच पणत्या लावल्या जातात. सर्वत्र समृद्धी व्हावी यासाठी अशा पणत्या लावण्याची पारंपरिक प्रथा आहे.
2021 diwali date marathi
लक्ष्मी पूजन: दिवाळी माहिती मराठीत
अश्विन मध्य अमावास्येला घरात सोने, नाणे , महत्वाच्या वह्या यांचे पूजन होते. व्यापारी धनाशी निगडित सर्व गोष्टींची पूजा करतात. धन सोबत आरोग्य लक्ष्मी (केरसुणी) ची देखील पूजा केली जाते. व्यापारी लोकांच्या हिशोबाचे नवीन वर्ष ह्याच दिवशी सुरु होते. संध्याकाळी लक्ष्मी आणि कुबेर पूजन केले जाते आणि फटाके किंवा दिव्यांची आरास केली जाते.
बलिप्रतिपदा
बळीराजाच्या दानशूरतेने प्रसन्न होऊन विष्णू अवतार वामन यांनी त्याला पातळाचे राज्य वरदान म्हणून दिले. आणि त्याचा द्वारपाल म्हणून राहण्याचे काम स्वीकारले. हा दिवस दिवाळी पाडवा म्हणूनही ओळखला जातो. हा दिवस साडेतीन मुहुर्ता पैकी एक मुहूर्त आहे. ह्या दिवशी नवीन प्रकल्प चालू केले जातात. ह्या दिवशी विक्रम सवन्त सुरु होतो. पत्नी पतीला ओवाळणी घालते आणि पती तिला औक्षण घालतो.
भाऊबीज: दिवाळी माहिती मराठीत
ह्या दिवशी यम आणि त्यांची बहीण यमुना ह्यांच्या प्रेमाचे स्मरण केले जाते. बहीण आपल्या भावाला गोड जेवण जेवू घालते आणि ओवाळते. त्याच्या संरक्षणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.
2021 diwali date marathi
Khup chhan
Pingback: गुढी पाडवा महत्व मुहूर्त व पूजा विधी थोडक्यात कथा - May Marathi