मराठी महिन्यातील भाद्रपद महिना म्हटला की, आपल्याला आठवतो तो म्हणजे गणेशोत्सव. महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे.दरवर्षीप्रमाणे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या तिथीला गणेश चतुर्थी व्रत साजरे केले जाते. या चतुर्थीला सिद्धी विनायक व्रत असेही म्हणले जाते.या दिवशी देशातील अनेक भागांमध्ये घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळामध्ये श्रीगणेशाच्या मूर्तीची स्थापना करून पूजा करतात. २०२२ या वर्षी बुधवार ३१ ऑगस्टला, भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी आहे.गणेश चतुर्थी बुधवारी (Ganesh Chaturthi 2022) आल्याने या व्रताचे महत्त्व अनेक पटींनी वाढत आहे . कारण गणपती बाप्पा हा स्वतः बुधवारचा देव आहे.
2022 Ganesh Chaturthi Date गणेशोत्सव माहिती मराठी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
भाद्रपद महिना हा चातुर्मासातील दुसरा महिना . नभस्य हे याचे वैदिक नाव आहे. भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेस चंद्र हा पूर्वा किंवा उत्तरा भाद्रपदा नक्षत्राजवळ असतो . म्हणून या महिन्याला भाद्रपद असे नाव दिले आहे.
श्री गणेश जन्माची आख्यायिका :
देवी पार्वतीला स्नानासाठी जायचे होते. पण आसपास त्यांच्या जवळ लक्ष ठेवण्याकरता कोणीच नव्हते. तेव्हा देवी पार्वतीने आपल्या अंगावरील मळाने एक सुंदर मूर्ती बनवली . आणि ती जिवंत ही केली.या मूर्तीलाच पहारेकरी म्हणून नेमले आणि सांगितले की, कोणालाही आतमध्ये प्रवेश करू देऊ नकोस. एवढे सांगून पार्वतीमाता स्नानासाठी आत गेली.काही वेळाने श्री भगवान शंकर तिथे आले. आणि ते आतमध्ये जाऊ लागले. तेव्हा त्या पहारेकऱ्याने त्यांना अडवले. त्यावर श्री भगवान शंकर खूप संतप्त झाले . त्यांनी त्या पहारेकऱ्याचं शिर धडावेगळं केलं.पार्वतीदेवी जेव्हा स्नान करून बाहेर आल्या तेव्हा त्यांनी हा सगळा प्रकार पाहिला आणि त्या संतापल्या. ते धडावेगळं शिर पाहून त्यांनी पूर्ण ब्रम्हांड हादरवून सोडलं. 2022 Ganesh Chaturthi Date गणेशोत्सव माहिती मराठी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
ब्रम्हदेवापासून सगळे देव पार्वती मातेची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते . पण पार्वती माता कोणाचं काहीही ऐकून घेत नव्हत्या . तेव्हा देवादी देव महादेव आपल्या गणाला आदेश देतात की,
पृथ्वीतलावर जाऊन सगळ्यात अगोदर जो प्राणी दिसेल त्याचं शिर कापून घेऊन या . त्याप्रमाणे गण बाहेर पडले . त्यांना सर्वात आधी हत्ती दिसला. त्याचं शिर घेऊन गण कैलास पर्वतावर आले.
भगवान शंकरांनी ते हत्तीचे शिर पुतळ्याला लावले आणि त्या मूर्तीला जिवंत केले. हा माता पार्वतीचा मानस पुत्र गज (हत्ती) आनन (मुख) म्हणजेच ‘गजानन’ होय. भगवान शंकर देवाने त्याला गणाचा ईश म्हणेज देव म्हणून गणेश नाव ठेवले . हा दिवस होता चतुर्थीचा . त्यामुळे या चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणून खूप महत्त्व आहे.

हरतालिका व्रत :
हरतालिकेचं व्रत हे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी केलं जातं. हे व्रत सुवासिनी आपल्या नवऱ्याला उदंड आयुष्य मिळावं म्हणून करतात. तर कुमारिका चांगला पती मिळावा म्हणून करतात.
या दिवशी महादेव आणि पार्वती देवीची स्थापना करून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. निर्जळ व्रत करून हा उपवास गणेश चतुर्थीला सोडला जातो. गणपती विसर्जनासोबतच हरतालिका या व्रताच्या पूजेचेही विसर्जन केले जाते.
2022 Ganesh Chaturthi Date गणेशोत्सव माहिती मराठी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त :
गणेश चतुर्थी (गणेशोत्सव ) म्हणजेच भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी ३० ऑगस्ट या दिवशी (30 August 2022) दुपारी ३ वाजून ३४ मिनिटांनी सुरू होईल. तसेच भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी ३१ ऑगस्ट या दिवशी दुपारी ३ वाजून २३ मिनिटांनी समाप्त होईल. यंदा गणेश चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता गणपती बाप्पा आपल्यासोबत शुभ रवियोग घेऊन येत आहेत.या योगामध्ये सर्व अशुभ योगांचे प्रभाव नष्ट करण्याची क्षमता आहे.असे म्हणले जाते. म्हणजेच सर्व संकटे ,अडथळे ,दुःख दूर करून भक्तांना प्रसन्न करण्यासाठी विघ्नहर्त्या बाप्पाचे आगमन होत आहे.
श्री गणेश चतुर्थीचे महत्त्व:
गणेश चतुर्थी म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथीला धार्मिक दृष्टीकोनातून विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी विघ्नहर्ता, मंगलमूर्ती, गजानन , गणेशजींचा जन्म दुपारी झाला. त्यामुळे गणेश चतुर्थी हा दिवस गणेश जन्मोत्सव म्हणूनही साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक भाविक १०(दहा ) दिवस गणेशमूर्तीची स्थापना करून मनोभावे पूजा करतात . तसेच काही भक्त गणेशमूर्तीची एक दिवस, तीन दिवस, पाच दिवस, सात दिवस स्थापना करुन पूजा करतात.असे मानले जाते की गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाची मूर्ती घरात ठेवून श्रद्धेने पूजा करणाऱ्यांचे सर्व संकट , दुःख गणपती बाप्पा दूर करतात.
2022 Ganesh Chaturthi Date गणेशोत्सव माहिती मराठी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये मोदक अर्पण करणे हे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. तसेच मोतीचूर लाडू आणि बेसनाचे लाडूही बाप्पाला अतिशय प्रिय मानले जातात. गणेशोत्सवाच्या पाचव्या आणि सहाव्या दिवशी गोड खीर अर्पण करणे चांगले मानले जाते.