26 January Speech In Marathi: प्रजासत्ताक दिन
नमस्कार माझ्या देश वासियांनो प्रजासत्ताक दिन हा आपला राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपली राजधानी नवी दिल्ली याठिकाणी खूप मोठी परेड पाहायला मिळते.जणू सगळ्या जगामध्ये भारत आपला देश आपली शक्ती दाखवतो. तसेच देशामध्ये देखील सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. भारतातले लोकसुद्धा वेगळ्या पद्धतीने आपापली देशभक्ती व्यक्त करतात. प्रजासत्ताक दिनाला भारतात खूप विशेष महत्त्व दिले जाते.खर तर या दिवशी आपला देश पूर्णपणे स्वातंत्र झाला असं मानतात . २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी घटना समितीने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला तर २६ जानेवारी १९५० या दिवशी राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यात आली. म्हणून हे दोन दिवस भारताच्या इतिहासात खूप महत्त्वाचे मानले जातात . त्यामुळे भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र बनले. याचीच आठवण म्हणून भारतात २६ नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन साजरा केला जातो. भारताच्या राज्यघटनेचा प्रवास हा खूप खडतर होता. प्रजासत्ताक दिन म्हणजे काय ?
26 January Speech In Marathi: प्रजासत्ताक दिन
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताची सार्वभौम राज्यघटना तयार करण्याचे काम हे तब्बल २ वर्षे ११ महिने , १८ दिवस चालू होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षते खाली संविधान समितीने राज्यघटनेचा मसुदा तयार केला.तसेच २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी स्वीकरण्यात आले. १५ ऑगस्ट हा दिवस जेवढा महत्वाचा आहे, तेवढाच २६ जानेवारी आहे .कारण या दिवसा पासून भारताचं लोकशाही पर्व सुरू झालं. या दिवशी भारत सार्वभौम, लोकशाही, आणि गणराज्य बनला. म्हणून २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन(दिवस) म्हणून भारतभर उत्सहाने साजरा केला जातो.
भारतातील पहिला प्रजासत्ताक दिवस
भारतामध्ये १९५० साली पहिला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला होता. १९५० रोजी आपल्याला आणि देशाला भारताचं संविधान आणि
डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या स्वरुपात भारताचे पहिले राष्ट्रपती मिळाले होते. भारताच्या या पहिल्या प्रजासत्ताक दिवसापासून प्रमुख पाहुणे हे वेगवेगळ्या देशातील राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान यांना बोलावण्याची परंपरा सुरू झाली.
26 January Speech In Marathi: प्रजासत्ताक दिन
प्रजासत्ताक हा दिवस भारतात सर्वत्र अगदी आनंदाने साजरा केला जातो. भारताची राजधानी दिल्ली येथे सकाळी ध्वजारोहण अगदी सोपस्कार रित्या पार पडले जाते. लाल किल्ल्यावरून मा. पंतप्रधान्नांचे देशाला उद्देशून भाषण होते. तसेच या कार्यक्रमात भारतातील सगळे घटक राज्य भाग घेतात. भारतातील सगळ्या क्षेत्रातील वैभवाचे दर्शन घडविणारी खूप मोठी मिरवणूक काढली जाते . देशातील प्रत्येक राज्यात,प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्या मध्ये , तसेच शहरांत आणि प्रत्येक गावागावातून “प्रजासत्ताक दिन” साजरा केला जातो. सरकारी कार्यालयांतून ,शाळांतून,व अन्य ठिकाणी हि सकाळी ध्वजारोहण व इतर मनोरंजनाचे कार्यक्रम साजरे केले जातात .अनेक ठिकाणी प्रभातफेऱ्या काढल्या जातात तेव्हा ” भारत माता की जय , वंदे मातरम ” अशा घोषणा दिल्या जातात. भाषणं , प्रदर्शने यांचे आयोजन करतात . तसेच धाडसी मुलांचा,आणि वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तुत्व गाजविनाऱ्या लोकांचा या दिवशी सरकार कडून गौरव करतात . ज्या ठिकाणी पुरातन किल्ले आहेत त्यांना रोशनाई केली जाते. प्राथमिक शाळेतून लहान मुलांना खाऊ दिला जातो. त्यामुळे मुलांनाही खूप आनंद होतो. प्रजासत्ताक दिनाला “गणराज्य दिन” असेही म्हणले जाते. या यामुळेच आपल्या सर्वांना आपण भारताचे नागरिक असल्याचा खूप अभिमान आहे.
26 January Speech In Marathi: प्रजासत्ताक दिन
पण विचार केला तर खरच आपण आपल्या देशाबद्दल कर्तव्यदक्ष आहोत का?
फक्त घोषणा देण किंवा उत्सहाने हा दिवस साजरा करण म्हणजे आपण भारतीय आहोत असं नाही.
तर एक सुजाण नागरिक म्हणून आपण भारत देश्याच्या विकासासाठी प्रयत्न करण महत्त्वाचे आहे .
आणि हीच खरी आपली देशासाठी ” मानवंदना “ठरेल . हे मात्र नक्की !

26 January Speech In Marathi प्रजासत्ताक दिनाच्या रंजक गोष्टी .
– २६ जानेवारी १९५० या दिवशी सकाळी १० वाजून १८ मिनिटांनी भारताचे संविधान हे लागू करण्यात आले.
– प्रजासत्ताक दिवशी राष्ट्रगीताच्या वेळेस २१ तोफांची सलामी दिली जाते.
– १९५५ मध्ये पहिल्यांदा राजपथा वरील परेड मध्ये पाकिस्तान देशाचे पहिले गव्हर्नर जनरल मलिक गुलाम मोहम्मद प्रमुख अतिथी होते.
– मेजर ध्यानचंद स्टेडियम या ठिकाणी पहिल्या प्रजासत्ताक दिनाची परेड झाली होती.
– भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित स्वरूपातले संविधान आहे. ते एका दिवसात वाचून पूर्ण होत नाही.
– भारताच्या संविधानामध्ये ३९५ अनुच्छेद आणि ८ अनुसूची आहेत.
-प्रजासत्ताक या दिवशी सर्वोच मानाचे अशोक चक्र आणि किर्ती चक्र हे सन्मान दिले जातात.
-आतापर्यंत १९५१, १९५२, १९५३, १९५६, १९५७, १९५९, १९६२, १९६४, १९६६,१०६७, १९७० या वर्षी हि कोणतेही विदेशी अतिथी उपस्थित नव्हते. तसेच कोरोना महामारीमुळे हि प्रजासत्ताक दिनी प्रमुख अतिथी नव्हते .
– २०१४ या वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र सरकारने पहिल्यांदा मुंबई मधील मरीन ड्राईव्हवर परेड आयोजित केली होती.
26 January Speech In Marathi: प्रजासत्ताक दिन
शेती नावावर करून घेताना – आजची वास्तवता
पहिलं प्रेम भाग १ वाचण्या साठी क्लीक करा पहिलं प्रेम भाग १
Click to read- The Power Of Relationships
You choose peace or war?
Where there is a will, there is a way.