5 September Shikshak Din

मी एक आनंदी शिक्षक आणि शिल्पकार शिक्षक | Best 5 September Shikshak Din Kavita

अर्चना अशोक कुलकर्णी आणि राजेश साबळे ओतुरकर यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत 5 September Shikshak Din Kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

मी एक आनंदी शिक्षक | 5 September Shikshak Din Kavita

काव्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धा
दिनांक: २४/०८/२०२३
विषय: शिक्षकदिन

मी एक आनंद शिक्षक

मी एक आनंद शिक्षक होते

मी एक आनंदी शिक्षक | 5 September Shikshak Din Kavita

मुला फुलांच्या बागेमध्ये
अविरत हर्षे विहरत होते
भरभरून आनंदाचे लेणे
अभिमानाने मिरवित होते
मी एक आनंद शिक्षक होते…१

जीव लावुनी शिकवत होते
शिकविताना शिकतही होते
ज्ञानकळ्याना उमलविताना
पहात होते बहर तो फुलांचा
मी एक आनंद शिक्षक होते…२

प्रतिमा आदरणीय गुरूंची
मनात आदरे बसली होती
तोच ठेऊनी पुढती आरसा
वारसा त्यांचा चालवित होते
मी एक आनंद शिक्षक होते..३

आयुष्याच्या निवांत ‌ काळी
आठवणींची ही मांदियाळी
पुन्हा विहरते मी फुलमाळी
झेप गगनीचा सुगंध दरवळे
मी एक आनंद शिक्षक होते.. ४

ईश्वर चरणाशी एक प्रार्थना
धाडशील जर पुनर्जन्माला
बागेमधेच रे मुला फुलांच्या
विहरू दे मज सवे तयांचे
मी एक आनंद शिक्षक होते..५

अर्चना अशोक कुलकर्णी, ठाणे

शिल्पकार शिक्षक | 5 September Shikshak Din Kavita

काव्यबंध समूह.. आम्ही मराठी भाषेचे शिल्पकार…
गुरुवार काव्यलतिका स्पर्धा. २०२३
विषय:- शिक्षक दिन
…………………………..
शिल्पकार शिक्षक

शिल्पकार शिक्षक | 5 September Shikshak Din Kavita

विध्यार्थी घडविणारा आजचा, शिल्पकार गुरु आहे।
जसा मातीच्या घड्याला, कुंभार आकार देत आहे।।
देशाभिमान जागवून जो, स्वाभिमान जागवितो आहे।
तोच खरा गुरुजी आज माझा, विध्यार्थी प्रिय आहे।।१।।

जो सगुण निर्गुणांचा मेळ घालुनी, शिकवितो मुलांना।
तोच विध्यार्थी मिळवून देतो, सन्मान गुरुजनांना।।
तापवून कंकणाला, सोनार झळाळी आणतो आहे।
तसे शिक्षणाने गुरुजी मुलांचे, मन उजळीत आहे।।२।।

जो शाळेत घडीभर मुलांचा, माय-बाप होतो।
जात पंथ विसरून जो, मुलात मुलं होतो।।
चांगल्या वाईट मुलांचा, गुण पारखून घेतो आहे।
त्यास देशात मिरविण्याचा, बहुमान प्राप्त आहे।।३।।

हाच विध्यार्थी गुरूचा, उद्या देश करील जागा।
भेदभाव विसरून सारे, जरा माणूसकीने वागा।।
यश कीर्ती स्वाभिमाने, विध्यार्थी घडवितो आहे।
सन्मान विसरून सारे, जगास घडवितो आहे।।४।।

या सन्मान सोहळ्याचा, असा सुदिन रोज यावा।
गुरु-शिष्य परंपरेचा आदर्श, जगी सर्वां मिळावा।।
छनी हतोड्याने शिल्पकार, शिल्प घडवतो आहे।
अशा आदर्श शिक्षकांचा, आज सन्मान होत आहे।।५।।
………………………………..
रचना-राजेश साबळे,ओतूरकर
उल्हासनगर (ठाणे)

शिक्षक | 5 September Shikshak Din Kavita

5 september shikshak din

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
21 × 7 =