सौ. स्वरूपा कुलकर्णी आणि हरी सारंग यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत 5sep Teacher Day Marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
गुरुजी तुम्ही होतात म्हणून | 5sep Teacher Day Marathi
काव्यबंध शब्दसमुह
काव्यलतिका कविता स्पर्धा
विषय- शिक्षक दिन
शिर्षक- गुरूजी तुम्ही होतात म्हणून…

मी वाचली बाराखडी सारी
तुमच्या काळ्या फळ्यातुनी
रेखिली अक्षरे वळणदार
तुमच्यामुळे पाटीवरी…
तुम्ही होतात म्हणूनी
पुस्तके आम्हा समजली
त्या शेकडो पानांतुनी
विषयांची ओळख झाली…
शिकून मोठे कसे व्हावे
हे गणित मजला उमगले
गुरूजी तुमच्या बक्षिसाने
स्वर्गच ठेंगणे वाटले….
मराठीशी गट्टी झाली
निबंध कविता धड्यातुनी
मी सदा वाचत गेलो
भाषेची अद्भूत सफर न्यारी…
इतिहास मजला शिवरायांचा
कायम स्मरला जीवनातही
तुम्ही रूजवला भगवा झेंडा
महिमा स्वधर्म क्रांतीचाही …
इंग्रजी न वाटली कधी परकी
तुम्ही रूजवली गोडी भारी
मी बघा आज सहज बोलतो
बोली जगाची नव्या युगाची…
जरी बोलतो अनेक भाषा
तरी संस्कृत ही देवभाषा
तुमच्या प्रयत्नाने झाले
संस्कार तियेचे अजोड तेंव्हा..
विज्ञानाची कास धरूनी
सावध ऐकून पुढल्या हाका
मी उभा नवयुगासमोरी हा
गुरूजी ही तुमचीच मनिषा!
भूगोल सारा मजला वाटतो
तळहाती ठेवला तुम्ही सारा
मी पहातो लखलख चंद्र तारे
ओळख त्यांची अचूक मला…
कसे नी केंव्हा फिटतील हे
ऋण तुमचे गुरूजी सारे
मी होतो नतमस्तक आता
शिल्पकार तुम्ही जीवनाचे…
कवयित्री- सौ.स्वरूपा कुलकर्णी
शिक्षक कोण असतो? | 5sep Teacher Day Marathi
काव्यलतिका स्पर्धा
विषय:- शिक्षक दिन
शीर्षक:-शिक्षक कोण असतो??

शिक्षक बाप असतो
शिक्षक माय असतो
बापाप्रमाणे क्षणात वज्राहूनही कठोर होतो
आणि माईप्रमाणे क्षणात लोण्याहूनही मऊ होतो तो शिक्षक असतो
ज्ञानयोग,कर्मयोग,राजयोग
यांचा त्रिवेणी संगम असतो
अपयश आल्यावर पाठीवर मायेचा हात फिरवून
पाठबळ देणारा शिक्षक असतो
वाट चुकलेल्या वाटसरुला वाट दाखविणारा
वाटाड्या असतो
अंधाऱ्या रात्री चालताना दिशा दर्शवणारा
दीपस्तंभ असतो
जीवनाची डगमगलेली नौका किनारी लावणारा
नावाडीही असतो
कधी तो सवंगडी होतो,तर कधी जमदग्नी होतो
म्हटलं तर गुरू नाहीतर आयुष्याचा कल्पतरू असतो
शिक्षक आयुष्यरुपी वृक्षाचा आधारवड असतो
मातीपासून मडक बनवणारा कुंभार असतो
दगडातून मूर्ती कोरनारा मूर्तिकार असतो
निस्तेज देहाला सचेत करणारा प्राणवायु असतो
खऱ्या अर्थी तो राष्ट्रनिर्माता असतो
✍✍..हरी सारंग

5sep teacher day marathi
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह