712 Online 7/12 Utara Ithe Milel Marathi 7 12

712 Online 7/12 Utara Ithe Milel Marathi 7 12

सातबारा उतारा ऑनलाइन महाराष्ट्र :

सातबारा उतारा ऑनलाइन महाराष्ट्र ७/१२ उतारा किंवा सातबारा उतारा हा जमिनीच्या नोंदीमधील उतारा आहे,जो महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्याद्वारे राखला जातो . यामध्ये विशिष्ट भूखंडाचे संपूर्ण तपशील दिले जातात. महाभूलेख या वेबसाइटवर आपल्याला ऑनलाइन ७/१२ उपलब्ध आहे.जेव्हा आपण एखादा प्लॉट खरेदी करण्यासाठी जातो, त्यावेळी त्या प्लॉटचे निरीक्षण करण्यासाठी गेल्यानंतर जसे की रोल, इम्पॉर्टेन्स, लीगल स्टेटस,इत्यादी त्यावेळी ७/१२ उतार्‍याची आपल्याला गरज पडते. 712 Online utara 7 12 utara 7/12

लँडची रेकॉर्ड असलेली Bhulekh.Mahabhumi or Bhumi Abhilekh ही महाराष्ट्राची वेबसाइट आहे.त्यामध्ये आपल्याला ७/१२ उतारा, ८ अ उतारा आणि मालमत्ता पत्रक हे मिळते.

महाभूलेख ७/१२ हे राज्यामधील जमिनीची कागदपत्रे शोधणे, तसेच डाउनलोड करणे आणि काढणे यासाठी वन-स्टॉप असा प्लॅटफॉर्म आहे.७/१२ आणि ८अ कागदपत्रे ही भूतकाळातील मालकी आणि जमिनीवरील विवादांची पडताळणी करण्यासाठी महत्वाची आहे.

७/१२ महाभुलेखात दिसल्याप्रमाणे ऑनलाईन उतारा हा महसूल विभागाकडून तहसीलदारांमार्फत जारी केला जातो. महाभूलेख ७/१२ गावाचा फॉर्म क्रमांक दाखवतो.
इतर सर्व अधिकारांच्या नोंदीप्रमाणे, महाभुलेख ७/१२ मधील ऑनलाइन ७/१२ उतारामध्ये सर्व्हे नंबर, जमिनीतील त्यांचा वाटा, जमिनीवरील बोजा , क्षेत्रफळ, मालक, इ. यासह जमिनीची महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे.

712 Online 7/12 Utara Ithe Milel Marathi 7 12

ऑनलाइन (online ) सातबारा उतारा :

आपण ऑनलाइन ७/१२ उतारा काय आहे याविषयी माहिती करून घेतली. आता आपण ऑनलाइन ७/१२ उतारा कसा काढायचा याविषयी माहिती करून घेणार आहोत.

स्टेप पहिली :

ऑनलाइन ७/१२ उतारा डाऊनलोड करण्यासाठी “https://bhulekh.mahabhumi.gov.in/“ ह्या वेबसाइटला भेट द्या. तुमच्या पुढे एक विंडो ओपेन होईल. त्यामध्ये आपला विभाग निवडून गो वरती क्लिक करावे .जर आपण कोणत्या विभागात येता हे माहीत नसेल तर तुम्हाला खाली विभाग सिलेक्ट केल्यानंतर त्या विभागातील जिल्हे आपल्याला दिसतात. त्यानुसार तुम्ही ज्या जिल्ह्यात येता त्यावरून तुमचा विभाग निवडावा . 712 Online utara 7 12 utara 7/12

स्टेप दुसरी :

आपल्या विभागाची निवड केल्यावर पुढे तीन ऑप्शन येतील. एक ७/१२ , दूसरा ८ अ आणि मालमत्ता पत्रक . आपण ऑनलाइन ७/१२ काढण्याचा विचार करत असाल तर त्याच्यावर क्लिक करा.त्यावर क्लिक केल्यानंतर आपला जिल्हा,तालुका, गाव याची निवड अचूक करा.

स्टेप तिसरी :

दिलेल्या माहितीची निवड केल्यानंतर आपल्याला सर्वे नंबर , गट नंबर माहीत असेल तर त्यानुसार तुम्ही ७/१२ शोधू शकता . तसेच नावावरून देखील ७/१२ शोधू शकता.

ह्या काही साध्या स्टेप्स आहेत ज्या तुम्हाला ऑनलाइन ७/१२ शोधण्यास मदत करतील. 712 Online utara 7 12 utara 7/12

महाभूलेख ऑनलाइन सेवा :

आपण महाभूलेख वेबसाइटला भेट दिल्यावर आपल्याला अनेक सेवा भेटतात जसे की

१. ई – नकाशे बद्दल माहिती .

२. ऑनलाइन जमीन रेकॉर्ड .

३. महाभूलेख अॅप्लिकेशन .

४. ऑनलाइन ७/१२.

५. ऑनलाइन ८ अ.

६. मालमत्ता पत्रक .

७. प्रॉपर्टि कार्ड .

८. Digitally Signed ७/१२ .

९. डिजिटल नोटिस बोर्ड .

Post Office Vima फक्त ₹ 399 ची विमा योजना

लहान मुलांच्या आरोग्य विषयक ब्लॉग्स वाचण्यासाठी क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *