Dhokla Recipe in Marathi | 4 पद्धतीच्या ढोकळा रेसिपी

Dhokla Recipe in Marathi | 4 पद्धतीच्या ढोकळा रेसिपी

Dhokla Recipe in Marathi : ढोकळा, ढोकळ्याची चटणी रेसिपी मराठी

खायला अतिशय चवदार असा ढोकळा बनवा वेगवेगळ्या पद्धतीने..
१)तांदुळ व हरभराडाळीचा ढोकळा
2)हरभराडाळीचा ढोकळा
3)मुगडाळीचा ढोकळा
४) नाचनीचा ढोकळा

साहित्य:-

3 हिरव्या मिरच्या बारीक केलेल्या
चवीनुसार मीठ
चिमूटभर हिंग
दीड टीस्पून साखर
एक टेबलस्पून तेल
अर्धा टीस्पून हळद
एक टेबलस्पून बेसन
दोन टेबलस्पून दही
एक टीस्पून इनो
अर्धा चमचा सोडा

Dhokla Recipe in Marathi : ढोकळा रेसिपी मराठी दाखवा

ढोकळा रेसिपी मधुरा Dhokla Recipe in Marathi

1) तांदुळ व हरभराडाळीचा ढोकळा :

१.हरभराडाळ अर्धी वाटी, एक वाटी तांदुळ रात्रभर भिजवुन सकाळी निथळुन घ्यावी.
२.मिक्सर मध्ये भिजवलेली डाळ, मिरची ,आलं,मीठ, साखर, दही,तेल, लिंबुरस सर्व बारीक़ करुन घ्यावे.
३.कुकर च्या तळाशी पाणी घालून स्टॅन्ड ठेवावे. पाण्याला छान उकळी येऊ द्यावी.ज्या मध्ये ढोकळा करणार आहोत त्याला तेल लावून घ्यावे.आता वरील मिश्रणात 2 तासा नंतर सोडा घालून अलगद मिक्स करून घ्यावे आणि भांड्यात घालून कुकर ची शिटी काढून मंद आचेवर 15 मिनटे वाफवून घ्यावे.
४. 15 मिनीटांनी एकदा टूथपिक किंवा चाकू घालून चेक करावे.मिश्रण चाकू ला लागले नाही म्हणजे ढोकळा तयार.नाहीतर 5 मिनटे अजून वाफवून घ्यावे.
शिटी न लावता कुकरमध्ये विस मिनीटे वाफवुन घ्या
नंतर फोडणी व साखरेचं पाणी टाका.
…….,………………………………………

2) हरभराडाळीचा ढोकळा

१.हरभरा डाळ सात ते आठ तास भिजवावी.
२.मिक्सर मध्ये भिजवलेली डाळ, मिरची ,आलं,मीठ, साखर, दही,तेल, लिंबुरस सर्व बारीक़ करुन घ्यावे.
३.कुकर च्या तळाशी पाणी घालून स्टॅन्ड ठेवावे. पाण्याला छान उकळी येऊ द्यावी.ज्या मध्ये ढोकळा करणार आहोत त्याला तेल लावून घ्यावे.आता वरील मिश्रणात 2 तासा नंतर सोडा घालून अलगद मिक्स करून घ्यावे आणि भांड्यात घालून कुकर ची शिटी काढून मंद आचेवर 15 मिनटे वाफवून घ्यावे.
४. 15 मिनीटांनी एकदा टूथपिक किंवा चाकू घालून चेक करावे.मिश्रण चाकू ला लागले नाही म्हणजे ढोकळा तयार.नाहीतर 5 मिनटे अजून वाफवून घ्यावे.
शिटी न लावता कुकरमध्ये विस मिनीटे वाफवुन घ्या
नंतर फोडणी व साखरेचं पाणी टाका.

Dhokla Recipe in Marathi : ढोकळा कुकर रेसिपी मराठी मधुरा दाखवा

3) मुगडाळीचा ढोकळा

कृती:
१.मुगडाळ 4 ते 5 तास भिजवावी.
२.मिक्सर मध्ये भिजवलेली डाळ, मिरची ,आलं,मीठ, साखर, दही,तेल, लिंबुरस सर्व बारीक़ करुन घ्यावे.वाटताना पाण्याचा वापर अजिबात करू नये.गरज पडल्यास एकच चमचा पाणी घालावे.
३.कुकर च्या तळाशी पाणी घालून स्टॅन्ड ठेवावे. पाण्याला छान उकळी येऊ द्यावी.ज्या मध्ये ढोकळा करणार आहोत त्याला तेल लावून घ्यावे.आता वरील मिश्रणात इनो घालून अलगद मिक्स करून घ्यावे आणि भांड्यात घालून कुकर ची शिटी काढून मंद आचेवर 15 मिनटे वाफवून घ्यावे.(इनो ढोकळा करताना घालावा आधी घालू नये.इनो घातल्यावर मिश्रण जास्त ओव्हर मिक्स करू नये नाहीतर ढोकळा फुलत नाही)
४. 15 मिनीटांनी एकदा टूथपिक किंवा चाकू घालून चेक करावे.मिश्रण चाकू ला लागले नाही म्हणजे ढोकळा तयार.नाहीतर 5 मिनटे अजून वाफवून घ्यावे.

Dhokla Recipe in Marathi : ढोकळा कुकर रेसिपी मराठी मधुरा दाखवा

4) नाचणी ढोकळा

साहित्य:
2वाटी नाचणी पीठ
1/4 वाटी रवा
1/4वाटी बेसन पीठ
1वाटी आंबट दही
1/2 चमचा खाण्याचा सोडा
चिमुटभर हळद
4चमचे साखर
चवीपुरते मीठ .
कृती:
१.दह्यात पाणी मिसळून पीठ भिजेल इतपत पातळ करणे.
२.सर्व साहित्य छान मिक्स करावे
३.कुकर च्या तळाशी पाणी घालून स्टॅन्ड ठेवावे. पाण्याला छान उकळी येऊ द्यावी.ज्या मध्ये ढोकळा करणार आहोत त्याला तेल लावून घ्यावे.आता वरील मिश्रणात सोडा घालून अलगद मिक्स करून घ्यावे आणि भांड्यात घालून कुकर ची शिटी काढून मंद आचेवर 15 मिनटे वाफवून घ्यावे.
४. 15 मिनीटांनी एकदा टूथपिक किंवा चाकू घालून चेक करावे.मिश्रण चाकू ला लागले नाही म्हणजे ढोकळा तयार.नाहीतर 5 मिनटे अजून वाफवून घ्यावे.

Dhokla Recipe in Marathi : ढोकळा कुकर रेसिपी मराठी मधुरा

झाला हा टेस्टी स्पॉंजि ढोकळा तयार☺

तडका For Dhokla

साहित्य

एक टीस्पून मोहरी
8 ते 10 कडीपत्ता
चिमूटभर हिंग
एक चमचा तेल
2 मिरचीचे उभे तुकडे
थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:-

कढईत तेल घालावे.तेल छान गरम झाले कि त्यात मोहरी,कडीपत्ता,हिंग आणि मिरचीचे तुकडे घालून तडका करून घ्या.ढोकळा थंड झाला कि हव्या त्या आकारात काप करून वरून तडका घालावा आणि कोथिंबीर भुरभुरावी.वरून ओल्या नारळाचा थोडा खिस ही घालू शकता

ढोकळा कोथिंबीर चटणी for Dhokla

ढोकळा चटणी- साहित्य

अर्धा कप कोथिंबीर
एक टीस्पून हरबरा डाळ
हिरवी मिरची
एक टीस्पून जिरे
चवीनुसार सैंधव मीठ
3 ते 4 थेंब लिंबाचा रस
एक टीस्पून गूळ/ साखर
1/4 टीस्पून चाट मसाला

ढोकळा चटणी कृती:-
प्रथम हरबरा डाळ भाजून घ्या.आता मिक्सर मध्ये कोथिंबीर.हरबरा डाळ,मिरचीचे तुकडे जिरे,सैंधव मीठ,लिंबाचा रस आणि गूळ घालून फिरवून घ्या(पाण्याचा वापर करू नये.गरज पडल्यास अर्धा ते एक चमचा फक्त पाणी घालावे)आता यात चाट मसाला घालून छान एकजीव करून घ्या.झाली स्वादिष्ट कोथिंबीर चटणी तयार.यातले जिन्नस तुम्ही आवडी प्रमाणे कमी जास्त करू शकता.आवडत असल्यास थोडा पुदिना ही वापरू शकता

Whole Wheat cake in 30 min ,sugar free(No oven,No maida,No sugar,No egg):गव्हाचा केक बिना अंड, मैदा,ओवन,साखर
Please Like,Comment,Share and Subscribe to my channel?☺️Which is absolutely free ..free..free?☺️?

Author : Snehal, Ahmednagar

Cake Recipe in Marathi

मिसेस स्नेहल ह्यांची केक रेसिपि वाचा

5 thoughts on “Dhokla Recipe in Marathi | 4 पद्धतीच्या ढोकळा रेसिपी”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *