Maza Blog

Modak Recipe: ३ प्रकारचे मोदक फक्त १० मिनिटात

Modak Recipe: ३ प्रकारचे मोदक फक्त १० मिनिटात
नमस्कार !!आज आपण गणेशोत्सव निमित्त घरी सहज, सुंदर, अप्रतिम आणि कमी वेळात बनवणार आहोत तीन प्रकारचे मोदक!! या मोदक ची खासियत आहे या मोदक साठी आपण गॅस चा वापर अजिबात करणार नाही त्यामुळे घरातील लहान मुलेसुद्धा हा नैवेद्य बाप्पासाठी तयार करू शकतात चला तर पाहूया रेसिपी!!

साहित्य :

१. एक पॅकेट ओरिओ बिस्कीट
२. अर्धी वाटी खोबर्‍याचा किस
३. १/४ वाटी मलई किंवा दूध
४. बिया काढलेले खजूर
५. ड्राई फ्रूट चे तुकडे

Modak Recipe: ३ प्रकारचे मोदक फक्त १० मिनिटात

Ingredients:

  1. Oreo Biscuits
  2. 1/2 bowl desigated coconut
  3. 1/4 bowl malai or milk
  4. 1 bowl seedless dates
  5. Crushed Dryfruits

Modak कृती:

modak recipe


१. सर्वात पहिले बिस्किटा पासून मोदक कसे बनवायचे ते पाहू.
२. त्यासाठी आपल्याला क्रीम आणि बिस्कीट वेगवेगळे करायला लागतील.
३. बिस्किटांची मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायची आहे.
४. बिस्किटं पावडर मध्ये तूकडे राहणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे.
५. बारीक झालेल्या पावडर मध्ये मलई मिक्स करून गोळा बनवून घ्यायचा आहे .
६. गोळा असाच पाच मिनिट ठेवायचा आहे.
७.आता आपण बाजूला काढलेल्या क्रीम मध्ये खोबऱ्याचा किस छान मिक्स करून घेणार आहोत.
८. मोदकाचे सारण आपले तयार झाले आहे ,आता हे सारण आपण मोदक पात्रांमध्ये भरणार आहोत.
९.बिस्किटांचे मिश्रण मोदक पात्रांमध्ये पूर्णपणे भरून घ्यायचे आहे खालच्या बाजूने बोट घालून सारण भरण्यासाठी जागा करावयाची आहे.आता या जागेत आपण क्रीम आणि खोबऱ्याचे मिश्रण भरणार आहोत.
१०.अशा पद्धतीने आपले क्रीम भरून केलेले ओरिओ मोदक तयार आहेत!!

Modak Recipe: ३ प्रकारचे मोदक फक्त १० मिनिटात

आता आपण याच मिश्रणापासून दुसऱ्या प्रकारचे मोदक कसे बनवता येते येतील ते पाहूयात. त्यासाठी मोदक पात्रांमध्ये अर्ध्या बाजूला बिस्किटांचा मिश्रण आणि अर्ध्या बाजूला क्रीमचे मिश्रण भरायचे आहे.मिश्रण छान भरून घ्यायचे आहे आता पात्रामधून मोदक काढण्यासाठी तयार आहे
अशा पद्धतीने आपण ओरिओ पासून दोन प्रकारचे मोदक बनवले आहेत .

modak marathi

Modak Recipe: ३ प्रकारचे मोदक फक्त १० मिनिटात

आता आपण तिसऱ्या मोदक पाहूयात त्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टींची गरज आहे. एक म्हणजे बिया काढलेले खजूर आणि दुसरे म्हणजे ड्रायफ्रूट चे तुकडे.
1 ड्रायफ्रूट मध्ये तुम्ही काजू बदाम दिसता अक्रोड पिस्ता त्यांचा वापर करू शकता खजूर सोबत तुम्ही अंजीर ही वापरू शकता.
2 आता बिया काढलेले खजूर तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट्स चे काप मिक्स करून घ्यायचे आहे.
3 मोदक भरायच्या आधी मोदक पात्राला तूप लावून घ्यायचे आहे
4 आता हे मिश्रणला आपल्याला मोदक पात्रांमध्ये छान भरून घ्यायचे आहे.
5 अशा पद्धतीने आपला ड्रायफ्रूट मोदक प्रसादासाठी तयार आहे!!

modak recipe in marathi

Modak Recipe: ३ प्रकारचे मोदक फक्त १० मिनिटात

तर नक्की करुन पहा !!

रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करा, तुम्हाला आणखी काही लहान मुलांसाठी व्हिडिओज पाहण्यासाठी एकदा माझ्या चैनल ला नक्की व्हिजिट करा धन्यवाद!!

Author : Snehal, Ahmednagar

marathi recipe

मिसेस स्नेहल ह्यांची केक रेसिपि वाचा

आणखी वीडियोस इथे पहा..
1.#BabyReceipe#StayHome:Wheat Kheer:With very IMP information:8+month:गव्हाची खीर:महत्वपूर्ण माहिती

  1. बाळाचे आरोग्य पावसाळ्यात कसे जपावे आणि घरगुती उपाय सहित आणखिहि बरेच काही#BabyCare Monsoon:0 to 5year
    https://youtu.be/eTvjkmDLnzA
  2. New,trending45+baby girls name Begin with letter ‘A’:नवीन ४५+ मुलींची मराठी ‘अ’ने सुरवात होणारी नावे

4.New Hindu baby girl & boy names begin with”S”letter:100+:हिंदू लहान मूली व् मुलांची नविन नावे

Modak Recipe: ३ प्रकारचे मोदक फक्त १० मिनिटात

5.#BabyReceipe#Bread:10+ Baby:Shahi Tukda:ब्रेड पासून बनवा टेस्टी शाही टुकड़ा बाळासाठी

6#OriginalBabyPhotoshoot: DIY Latest and Trending Baby Photoshoot at home with zero budget
https://youtu.be/3da_Rw5Kai4

7.#BabyActivities:12 Baby Engaging Activities at home with Zero budget for 10 -15month babies

Subscribe To My Channel on:
https://www.youtube.com/channel/UCFLTlDsF5S8r5siAIBMheZQ?sub_confirmation=1
?Like?Comment?Subscribe?Share?
Thank you!!?☺️?

1 thought on “Modak Recipe: ३ प्रकारचे मोदक फक्त १० मिनिटात”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *