Friendship Friend or Friends in Marathi | मैत्री कशी असावी ? Maitri Kashi Asavi

Friendship in Marathi | मैत्री कशी असावी ?

“मैत्री” हा शब्द जरी उच्चारला तरी पूर्ण आज पर्यंतचा संपूर्ण जीवनाचा अनुभव समोर उभा राहतो. या नावातच आपुलकी, प्रेम, सहानुभूती, संघर्ष, जीवनाचा आधार दिसून येतो. हृदयाला भिडणारी माणसांची नावं घेताच आपल्या चेहेऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा आनंद दिसून येतो. दरवर्षी आपण खूप लोकांना भेटतो पण ती शाळेची मैत्री, कॉलेजची मस्ती या पेक्षा सुखाचे क्षण दुसरे कोणतेच नाही. या व्यतिरिक्त ऑफिस, रस्त्यावरील भेळवाला, शेजारचे आजोबा यांची मैत्री पण एक गोड अनुभव देऊन जाते.
Friendship Friend or Friends in Marathi | मैत्री कशी असावी ?

मैत्री कुणाशी होते ? Friendship in Marathi

या सर्वांमध्ये कोणी न कोणी एक व्यक्ती अशी भेटते जीला आपण आपल्या मनातले सर्व काही सांगतो अक्षरशः आपल्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा. ती व्यक्ती सुद्धा आपल्या सर्व गोष्टी प्रेमाने तर कधी मस्करीत घेऊन ऐकते, पण कायम आपल्याला साथ देते. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर आपल्याला कोणी न कोणी एक असा मित्र कायम भेटत असतो. लहानपणा पासून आपले आई वडील आपल्याला कायम सांगत असतात की चांगले मित्र बनव, कायम चांगल्याची संगत ठेव. तरीही काही माणसं अशी पण भेटत असतात ज्यांना व्यसनाची सवय तर असते पण मनाची खूप चांगली असतात. त्यांची मैत्रीही आपल्याला वेगळा अनुभव देऊन जाते. मोजून मापुन मैत्री कधी करता पण येत नाही आणि होत पण नाही. मैत्री करताना कधीच आपण खूप विचार करत नाही, कधीच जात-पात, धर्म, हुशारी किंवा पैसे बघत नाही. ती आपोआप होऊन जाते.

Friendship Friend or Friends in Marathi | मैत्री कशी असावी ? Maitri Kashi Asavi |

Friendship Friend or Friends in Marathi | मैत्री कशी असावी ? Maitri Kashi Asavi

मैत्रीची सुरुवात !

मैत्रीची सुरवात कुठल्या कारणाने होईल हे सांगता येत नाही. शाळेत असताना पेन्सिल मागून होते तर कॉलेजला असताना “ती तुझी वाहिनी आहे”, असं सांगून सुद्धा होऊ शकते. ऑफिस मध्ये तर आपण आठ तास असतो, तिथे तर कायम एकमेकासोबत बोलून चालून मैत्री होते. मैत्री मध्ये वाद होणे ही साहजीक बाब आहे, पण त्यामुळे ती व्यक्ती कायमची दूर गेली तर त्याचे दुःख असह्य होते. शेवटी का होईना आपण परत त्या वक्तीला भेटून मैत्रीची सुरवात करतो. या चढ उतारातच खरी मैत्री दिसून येते.

Friendship Friend or Friends in Marathi | मैत्री कशी असावी ?

मैत्री म्हणजे काय ? Friendship in Marathi

आपण मैत्री, मैत्री म्हणतो, पण नेमकी मैत्री आहे तरी काय? कोणासोबत तासंतास गप्पा मारणे म्हणजे मैत्री, कोणासोबत रोज रात्री बाहेर फिरायला जाने म्हणजे मैत्री, कोणासोबत सुट्टीच्या दिवशी पार्टी करणे म्हणजे मैत्री. प्रत्येक वेळी जवळच्या माणसाला भेटणं शक्य होत नाही, याचा अर्थ असा नाही की ती अथवा तो आपली मैत्रीण- मित्र नाही. एकविसाव्या शतकात दूर असूनही माणसं जवळ आहेत, टेकनॉलॉजि मुळे. या टेकनॉलॉजि ने फेसबुक, व्हाट्स अँप, हाईक, स्काईप एवढे पर्याय आणून ठेवलेत की मित्रांना आपण कधीच दूर ठेऊ शकत नाही. आपण आपले सर्व अनुभव मित्रांना पाठवून आनंद व्यक्त करतो. मग त्यात अचानक दूर राहणारे मित्र ट्रिप प्लॅन करतात. ती वेगळी गोष्ट आहे की शेवट पर्यंत प्लॅनच करतात, ती कधीच साध्य होत नाही.

Friendship Friend or Friends in Marathi | मैत्री कशी असावी ?

आजच्या काळातली मैत्री

सोशिअल मीडिया मुळे व्यक्तीला न पाहता सुद्धा मैत्री होते, तो एक वेगळाच अनुभव असतो. काही व्यक्तींना आपलं ऐकणारी माणसं आवडतात तर काहींना दुसऱ्यांचा गप्पा ऐकण्यात मजा येते. ऐकणारी आणि ऐकवणारी माणसं जवळ आली तर त्या मैत्रीला उदंड आयुष्य लाभते. “मी” हा शब्द या नात्यात नसतोच, कारण इथे आपण तो शब्दच विसरून जातो. खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा दोन जिवलग मित्रांचे भांडण होते. कारण त्यात दोघेही एकमेकांची काळजी पोटी भांडत असतात. “साल्या, किती उशीर केलास, आज परत सरांचा मार खावा लागणार”, तर दुसरा बोलणार “एव्हडीच जर आठवन होती तर लवकर उठवता नाही आलं का”. छोटी छोटी कारणं असतात पण त्यामुळे मैत्रीला तडा जात नाही. विश्वास या एका गोष्टीवरच मैत्री टिकलेली असते. मैत्रीचा आधार म्हणजेच विश्वास. तो टिकला तरच मैत्री टिकते. त्यामुळे काळजी घ्या आणि आपल्या जवळच्या माणसाला दूर करू नका.

Friendship Friend or Friends in Marathi | मैत्री कशी असावी ? Maitri Kashi Asavi |

कोणी तरी म्हटलेलंच आहे:
पापान् निवारयति योजयते हिताय |
गुह्यानि गूहति गुणान् प्रकटीकरोति |
आपद्गतम् च न जहाति ददाति काले |
सन्मित्रलक्षणमिदम् प्रवदन्ति सन्तः ||

Friendship Friend or Friends in Marathi | मैत्री कशी असावी ? Maitri Kashi Asavi |

जी व्यक्ती तुमच्या चुका काढते, सल्ले देते आणि योग्य मार्ग दाखवते, दुसर्यांना तुमच्या चांगल्या गोष्टी सांगते, संकट काळी तुमच्यासोबत असते आणि तुम्हाला गरजेच्या वेळी (पैसे, वेळ, आधार इ.) सहकार्य करते तो तुमचा खरा मित्र.

Author- Chaitanya Thorat

Friendship Friend or Friends in Marathi | मैत्री कशी असावी ? Maitri Kashi Asavi

Marathi Bloggers : Maitri

चैतन्य यांचे आणखी लिखाण वाचा – रक्षाबंधन २०२०

Made In India Smartphone Review वाचण्या साठी क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *