Write Marathi Blog

Write Marathi Blog

मराठी भाषा आपल्याला नुसतीच प्रिय असून चालणार नाही. तिचा रोजच्या वापरात ऱ्हास होणार नाही याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे. आता हि काळजी कशी घ्यायची ? आणि काय ऱ्हास होतोय असे प्रश्न तुम्ही विचारलाच. तर ऐका, दिवसेंदिवस एक एक मराठी शब्द विस्मरणात जात आहे. भले ती तरुण पिढी असो किंवा जुनी पिढी मराठी शब्दांना पर्यायी इंग्लिश किंवा हिंदी शब्द बिनधास्त वापरले जातात आणि एक वेळ अशी येते कि आपल्याला “अरे ह्याला मराठीत काय म्हणतात रे ?” असे प्रश्न विचारावे लागतात. होते का तुमच्या सोबतही असे? आहे ना हि काळजी करण्या जोगी गोष्ट ?
ह्याला उपाय एकाच मराठी वाचन आणि लेखन. जास्तीत जास्त मराठी शब्दांचा वापर दैनंदिन व्यवहारात आणि संभाषणात करायला सुरुवात करा. कारण आपण नाही करणार तर कोण ?

Write Marathi Blog
MAZABLOG- WRITE MARATHI BLOG

मराठीत लिहायला सुरुवात करा, वाचायला सुरुवात करा, बोलताना जास्तीत जास्त मराठी शब्दांचा उल्लेख होईल असा प्रयत्न करा आणि तेही नाही जमाल तर कमीत कमी मराठीत विचार करायला सुरुवात करा.
माझा ब्लॉग हा प्लॅटफॉर्म मुळात मराठी लोकांसाठी बनवलेला आहे. इथे तुम्ही स्वतःचा ब्लॉग लिहू शकता तेही मोफत फक्त आम्हाला ७०२०९६५२२४ या नंबर वर व्हाट्स अँप करा आणि तुमचा ब्लॉग पाठवा. हा प्लॅटफॉर्म अगदी मोफत आहे. आणि शिवाय तुमचे विचार तुमचे नाव आणि फोटो सहित प्रसिद्ध केले जाते. तुमचे विचार मग कोणत्याही स्वरूपाचे असो. कथा, कविता, पाककृती, विमा विषयक, चारोळ्या, व्यवसाय विषयक आणि अजून कोणताही प्रकार असो. मराठी माणसांनी मराठीच्या संवर्धनासाठी केलेला हा छोटासा खारीचा प्रयत्न. हा प्रयत्न मोठा होणार नाही जो पर्यंत तुम्ही साथ देणार नाही. म्हणूनच आमच्या सोबत नक्की ह्या सत्कार्याचे भागीदार व्हा किंवा तुमच्या ओळखीत कुणी लेखक वाचक असतील तर त्यांना कळवा. ………Write Marathi Blog

दिवसभरात आपला कितीवेळ सोशल मीडिया वर टाईमपास करण्यात जातो. त्यातला सगळं नाही तर फक्त थोडासा वेळ आम्हाला द्या. तुम्हाला त्याचे नक्कीच दुःख होणार नाही. कारण म्हटलेच आहे ना “एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ!” धन्यवाद…

Check Our Other Website Thoughtika

Write Marathi Blog

Go to Home Page