आईची आठवण कविता | आई…मला कशी कळली नाही | Aai Gelyavar Kavita Strong Poem 2023

आईची आठवण कविता | आई…मला कशी कळली नाही | Aai Gelyavar Kavita Strong Poem 2023

मित्रांनो आपल्यातील काहीजणांचे नशीब हे फारच विचित्र असते. आयुष्यातील सगळ्यात मोठा आधारवड त्यांच्या जीवनातून निघून जातो. हा आधारवड म्हणजे आई. आपण ऐकले असेल कि “स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी” अश्या शब्दात आईचे महत्व सांगितले जाते. आई गेल्यावर काय परिस्थिती होते याची कल्पना सुद्धा करवत नाही. आणि जिथे स्पष्ट करण अवघड होत तिथेच कवितेचा सहारा घेण कधीही चांगल. असाच सहारा कवीने घेतला आहे. या कवितेत एका मुलाला आई तिच्या शेवटच्या काही दिवसात ज्या पद्धतीने वागत होती त्यावरून प्रश्न पडतो कि “आई मला कशी कळली नाही ?” Aai Gelyavar Kavita

आई…मला कशी कळली नाही | Aai Gelyavar Kavita

हल्ली आई मला
असं का टाळायची
टाळत असली तरी ती
डोळे भरून बघायची

दुर नको जाऊ आज
घारीच थांब रे
हल्ली आई मला नेहमी
असच का सांगायची

घरी असलो तरी
वेगळंच ती वागायची
तासंतास समोर बसून
थोडसच ती बोलायची

जायचं होत तिला
कधी बोललीच नाही
तिच्या वाट्याची भाकरी
ती मलाच का द्यायची

हल्ली मला ती आता
जास्ती जवळ घ्यायची
पण नजरेला माझ्या
नजर नाहीं द्यायची

आईची आठवण कविता | आई…मला कशी कळली नाही | Aai Gelyavar Kavita Strong Poem 2023

आईची आठवण कविता | आई…मला कशी कळली नाही | Aai Gelyavar Kavita 2023

मला कधी कळलं नाही
हल्ली असं का वागायची
बघताना माझ्याकडे तिची
पापणी ओली व्हायची

आणि एक दिवस मला
सार काही कळलं
जायचं होत दुर म्हणुन
आई असं वागायची

बोलता येत असूनही
अबोल ती असायची
मला वाईट वाटलं
म्हणुनच गप राहायची

असं का आई
पोरक करून जायचं
मला एकदा तू
सांगून तरी पहायचं,

सांग ना ग आई
कुठं तुला शोधायची
तुझ्या सारखी आई
पुन्हा कशी मिळायची
पुन्हा कशी मिळायची…

आईची आठवण कविता | आई…मला कशी कळली नाही | Aai Gelyavar Kavita 2023

कवी :- श्री. अभिजित बागुल
8275159813

कवी :- श्री. अभिजित बागुल यांच्या इतर कविता वाचण्यासाठी क्लिक करा. :- Poem-on-evening-in-marathi

वाचा लग्न म्हणजे काय असत कविता : – Marathi Kavita On Marriage

वाचा लेकीवर लिहिलेली अतिशय सुंदर कविता :-Mulgi Marathi Kavita On Daughter

एका मुलाने त्याच्या आई साठी लिहिली आहे असा प्रसंग आहे, आई एका दुर्धर आजाराने ग्रस्त असते आणि तीला ठाऊक असते ती थोड्या दिवसांची सोबती आहे, तरी ही गोष्ट तीला आपल्या मुलाला कळू द्यायची नसते तेव्हा हल्ली हल्ली ती आपल्या मुलाला टाळत असते, मुलाच्या माञ लक्षात येतं नसते की आपली आई हल्ली अपल्या सोबत अशी का वागत आहे. हेच वर्णन कविते मध्ये आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *