Aai Kavita In Marathi

Aai Kavita In Marathi | कविता आईची माया | जेव्हा साहेबाला आईची आठवण येते

तुम्ही आई या विषयावर कविता शोधत इथ पर्यंत आलात म्हणजे नक्कीच देवाची तुमच्यावर कृपा आहे. कारण आईचे उपकार तुम्ही विसरले नाहीत याचेच हे प्रतिक आहे. दैनंदिन जीवनात जवळच्या दूरच्या सर्व लोकांचे आभार मानले जातात. पण आईला तिच्याबद्दल मुलांकडून व्यक्त केलेली कृतज्ञता फारच क्वचितच ऐकायला मिळते. काही लोक तर तिच्या वाढदिवस सुद्धा विसरून जातात. इतकच काय तिचे घेतलेले कष्ट त्यांची ध्यानात राहत नाहीत आणि ते म्हातारपणात तिचा रागराग करतात. तिचा सांभाळ करायला त्यांना कंटाळा येतो. त्यामुळेच मी आधी म्हटलं कि देवाची तुमच्यावर कृपा आहे कारण आईची किंमत करायची सद्बुद्धी त्याने तुम्हाला दिली आहे. चला तर मग पाहूया – Aai var Kavita In Marathi aai sathi / varun kavita | कविता आईची माया | जेव्हा साहेबाला आईची आठवण येते

जन्मास घातलं आईनं माझ्या, अन् स्वर्ग दाविलं आईनं माझ्या…..
किती सोसल्या वेदना अन्, किती जागल्या राती आईनं माझ्या…..
शब्द ही अपुरे पडले तिच्यावर लिहायला, असं सांगितलं लेखणीनं माझ्या…..
जवा आटला पान्हा तिच्या दुधाचा तवा, स्वतःचं रक्त ही पाजलं आईनं माझ्या…..
रक्ताचं पाणी करून वाढवलं अन्, मला शिकविलं आईनं माझ्या…..
दिस रात करून एक, किती काबाड कष्ट केलं आईनं माझ्या…..
मला कराया साहेब मोठ्ठं, स्वतःचे हाल केलं आईनं माझ्या…..

Aai var Kavita In Marathi aai sathi / varun kavita | कविता आईची माया | जेव्हा साहेबाला आईची आठवण येते

स्वतः राहून उपाशी, माझं पोट भरलं आईनं माझ्या…..
स्वतः घालते चप्पल फाटकी-तुटकी, पण मला शुज घेतलं आईनं माझ्या…..
किती भेगा पडल्या तिच्या पायाले, अन् किती चटके सोसलं आईनं माझ्या…..
साडी ही फाटली तिची, पण आम्हासाठी तिलाच शिवून घातलं आईनं माझ्या….
असह्य दुःख मनात असुनही, चेहऱ्यावरी सदा हास्य ठेवलं आईनं माझ्या…..
रडवेला चेहरा पाहून माझा, सदा हसवलं आईनं माझ्या…..

Aai var Kavita In Marathi aai sathi / varun kavita | कविता आईची माया | जेव्हा साहेबाला आईची आठवण येते

आई कविता

मी हरलो जवा जवा, तवा तवा समजावलं आईनं माझ्या…..
एक हार म्हणजे कायमची हार नाही बेटा, असं सांगितलं आईनं माझ्या…..
स्वतःच्या स्वप्नांची राख रांगोळी करून, जन्म दिलं मला आईनं माझ्या…..
वाढवलं मला शिकवलं मला, अन् मोठ्ठा साहेब केलं आईनं माझ्या…

Aai var Kavita In Marathi aai sathi / varun kavita | कविता आईची माया | जेव्हा साहेबाला आईची आठवण येते

अशा या महान माय माऊलीला, नाही येणार कधी विसरता
केलेले उपकार तिचे माझ्यावरी, नाही येणार कधी फेडता
तो असेल कवी कितीही मोठा, तिच्यावर कविता नाही येणार कधी लिहिता
तिच्यापेक्षा अनमोल शब्द, नाही येणार कधी शोधता
तिच्या सारख्या माय माऊलीला, कशाचीही उपमा नाही येणार कधी देता
ती आई आहे आणि आईच आहे, तिच्या सारखं करनार नाही कुठला देवता
अन् म्हणून देवाने तिला पाठवलं, बनवून जन्मदाता

Aai var Kavita In Marathi aai sathi / varun kavita | कविता आईची माया | जेव्हा साहेबाला आईची आठवण येते

तिच्या स्वप्नांची राख रांगोळी, मी आता कधी होऊ देणार नाही
तिच्या तुटक्या चपला, मी पुन्हा कधी तिला घालू देणार नाही
फाटक्या साड्या तिला, मी आता पुन्हा शिवू देणार नाही
तिच्या मुळेच साहेब झालो, अन् तिला विसरून चालणार नाही
जगातील सारे सुख तिच्या पायथ्याशी घालेन, पण तिला आता कधी दुःख देणार नाही
एवढं सगळं करून ही मला, तिचे उपकार फेडता येणार नाही
पण एक वचन नक्कीच देतो, तिला कधी वृद्धाश्रमात पाठवणार नाही
अन् बायको आडवी आली तर सांगतो, तिला घरात येऊ देणार नाही
शेवटी आई आहे ती माझी, अन् आई शिवाय मी राहू शकणार नाही….

Aai var Kavita In Marathi aai sathi / varun kavita | कविता आईची माया | जेव्हा साहेबाला आईची आठवण येते

कवी आशु छाया प्रमोद (रावण)

कवी आशिष

तुम्हाला आमची आठवण हि कविता नक्कीच आवडेल. वाचण्यासाठी क्लिक करा>>>>.

रागावलेल्या आपल्या माणसाला मानवाण्यासाठी कविता राग रुसवा>>>>.

झाशीची राणी लक्ष्मी बाई कश्या होत्या ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *