aai vadil kavita in marathi

आधार | Best aai vadil kavita in marathi in 2023

सौ. राधा खानझोडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत aai vadil kavita in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

aai vadil kavita in marathi

काव्यबंध समूह आयोजित काव्यलतिका..
दिनांक:-१५/१०/२०२३
विषय:-बाबा/वडी

आधार | aai vadil kavita in marathi

आधार | aai vadil kavita in marathi

कितीतरी काळ गेला
आठवणी स्मरणांत
उलगडा आयुष्यांचा
खरे स्थान जीवनांत…!!१!!

जीवनाचा चित्रपट
डोळ्यापुढे सरकला
मूर्ती दिसताच त्यांची
बांध अश्रूंचा लोटला…!!२!!

नाही कुणीही कुणाचे
होता तुमचा आधार
जरी नसलात तुम्ही
नाही आम्ही निराधार…!!३!!

बाप माझा जन्मदाता
आहे आम्हा अभिमान
गाऊ गोडवे हो किती
जगी मिळाला सन्मान…!!४!!

ओढी संसाराचा गाढा
नाही कधी दमलात
आई गेली ती सोडून
माय तुम्ही बनलात…!!५!!

ओढी कुटुंबाचा भार
दुःख मनाशी गिळून
साता ठिगळ्याची धोती
बाप घालतो शिवून…!!६!!

सुख दुःखाच्या संकटी
बाप माझा तो खंबीर
घाव बसती हृदयी
लेकरांना देतो धीर…!!७!!

अंगी कापडाची बंडी
झाली लक्तर फाटून
हाल सारे बघतांना
कंठ येतोय दाटून…!!८!!

आयुष्याच्या वाटेवर
फार खचून गेलात
आम्हा करून पोरके
डाव टाकून अर्ध्यात….!!९!!

सौ. राधा खानझोडे ,नागपूर.

aai vadil kavita in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *