सौ. स्वाती कोरगावकर यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत aaji aajoba kavita in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.
aaji aajoba kavita in marathi
काव्यबंध साहित्य समूह
स्पर्धेसाठी
विषय माझी छकुली
पेटी धनाची | aaji aajoba kavita in marathi

लेक माझ्या लाडकीची
लक्ष्मी आली घरी
स्वर्गातल्या परीसम
अवतरली धरेवरी
पहिली बेटी… पेटी धनाची
स्वागत झाले उत्साहात
बाललीला पाहताना
सारे सारे आनंदात
शुभ्र गौर कांतीची जणू
गुलाबाची सुंदर कळी
हास्यवदनी उमले कधी
मस्त मस्त गोड खळी
क्षण क्षण सरताचि
चालू लागली छकुली
बोबड्या बोबड्या बोलांनी
मन मोहवी गोडुली
साऱ्या सदनी घुमायाचा
पैंजणाचा छमछम नाद
वळूनिया पाहे त्वरी
घालताच कोणी साद
पाहताच नातीस माझ्या
हरखुनी जाते ग भान
लाडकी साऱ्यांचीच
दोन्ही घराची शान
शैशव सरता छकुलीचे
पाऊल पडले विद्यालयी
सुट्ट्यांमध्ये पुन्हा मग
क्षण लाभती सुखमयी
शौर्य पराक्रमाच्या कथा
छान ऐकते आवडीने
पाळी आज्ञा थोरांच्या
संस्कारांच्या शिदोरीने
चित्रकला नि नृत्यकलेत
भाग घेते सदोदित
बक्षीसांची खैरात होता
होते खूप आनंदित
राहते दंग बघण्यात
बागेमधली फुलपाखरे
मला विचारी उत्सुकतेने
चित्र आहे का खरे खरे??
पाठीवरती भावंडाने
झाली आता खूप शहाणी
खेळवताना अपुल्या भावा
गाते शाळेतील गाणी
सांजवेळी दिवेलागणीस
वृंदावनापाशी बसते
शुभंकरोती मंत्र, श्लोक
खूप आवडीने म्हणते
सांगे रोजच मजला
गमतीजमती शाळेतल्या
मैत्रिणीसमान चालतात
गप्पागोष्टी अंतरातल्या
पाठीवरल्या भावंडाने
झाली आता खूप शहाणी
खेळवताना अपुल्या भावा
गाई शाळेतील गाणी
छकुली माझी प्रिय मजला
जणू दुधावरली साय
होवो जगी कीर्तीवंत
नभी उंच भरारी जाय
उन्हाळी सुट्टीची मी
बसते वाट बघत
नेत्री छबी राही उभी
स्नेह होई वृद्धिंगत…
सौ. स्वाती कोरगावकर
कोल्हापूर

aaji aajoba kavita in marathi
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह