ॲड. उमाकांत आदमाने यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Aaji aani Natwanda Kavita विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.
Aaji aani Natwanda Kavita
📗📕काव्यबंध समूह📗📕
स्पर्धेसाठी स्वरचित कविता
“काव्यबंध समूह आयोजित साप्ताहिक काव्यलतिका स्पर्धा “
दिनांक:- १४/०९/२०२३
विषय :- आजीचा छकुला
नटखट छकुला | Aaji aani Natwanda Kavita

नटखट किती बघा
आजीचा छकुला
वात्रटपणा अंगात
म्हणते शेजारची बकुळा //१//
छ्कुल्यास माझ्या
नको कोणाचा वास
बाळ तो अंगणी
खेळतो बघा खास //२//
न लागो कुणाची दृष्ट
कपाळी लावते तिट
छकुला बाई माझा
दिसतो किती धिट //३//
खेळतो बाई सर्वत्र
पदर माझाच धरून
वेडेपणात त्याच्या या
मी स्वतःच गेले स्मरुन //४//
किती लाड करते
मी आजी छ्कुल्याचा
विसरून जाते म्हातारपण
हाच विचार आजीचा //५//
कवी – ॲड. उमाकांत आदमाने
रा.वारजे
ता.हवेली
पुणे

Aaji aani Natwanda Kavita
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह