सौ. कल्पना प्रभाकर चौधरी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत aaji ani natu kavita विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.
aaji ani natu kavita
काव्यबंध समूह आयोजित स्पर्धा
विषय :आजीचा छकुला

माझा अधिराज | aaji ani natu kavita
जन्माला आला पुत्र
मुलाचा बाबा झाला,
मीही झाली आजी
आनंदाचा क्षण आला..
आजी आजोबा सारे खुश
आत्याला तर खूपच लळा,
नातीला माझ्या मिळाला भाऊ
मामाचा पण पिकलाय मळा..
हर्शोल्हासात नामकरण झाले
अधिराज आपल्या घरी आला, सुवासिनीने स्वागत केले
जसा गोकुळात कृष्ण आला…
त्याच्या रोजच्या कला पाहून
आठवते आपल्या पोरांचे बालपण,
असेच ते खेळत होते
त्याच्या येण्याने भरले रीते पण..
देवा कसे मानू तुझे आभार
आभाळा एवढी माया देऊन,
त्याच्या डोळ्यातील अश्रू पाहून
माझेही डोळे येतात भरून….
स्वरचित
सौ .कल्पना प्रभाकर चौधरी
परतवाडा
अमरावती
aaji ani natu kavita

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह