अनिता मधुकर भोई यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत aaji marathi kavita विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.
aaji marathi kavita
काव्यबंध समुह आयोजित
काव्यलतिका स्पर्धा
दि.14/9/023 सप्टेंबर
विषय -आजीची छकुली
माझी आजी

आहे आजीची छकुली
सारे करतात लाड
जरा काही दिले नाही
बसे फुगून सोनुली
जन्म दिला आईने
पण केले मोठे तिला
तिच्या लाडक्या आजीने
आहे सारे ठाव मला
किती राती ती जागली
किती ती आजारपणं
स्वतः तिने काढली
जणू ते तरूणपण
खाऊ करून घातला
हव नको ते पाहिलं
कमी कधी काही नाही
माझे लाड पुरवलं
कधी आई कधी ताई
होई आजी माझी माय
बाबा पण ती झालीच
पण रडवल नाय
घेई नवीन तो ड्रेस
गंध आणि पावडर
सारे टिकली बांगडी
गळ्यामंधी गळसर
अशी आधुनिक आजी
लाभे याच जन्मी मला
ऋण तिचे फिटणार
नाही अशी आहे बाला
करी अनेक संस्कार
सांगे कथा पौराणिक
नव्या युगात जाण्यास
करी मला सक्षमक
अशी मिळावी साऱ्यांना
आजी नवीन विचार
जगाच्याच पाठीवर
स्मरु तिला निरंतर
सारी नाते शिकवते
एकत्रित राहा बोले
आहे बळ ते एकीचे
मोठे सारे पुढे डोले
जुनं ते सोनं सांगते
होते प्रसंगी ती दुर्गा
तिच्या साऱ्या कायद्याने
ज्ञान मिळेल ते वर्गा
अनिता मधुकर भोई कुरूंदवाड (कोल्हापूर)

aaji marathi kavita
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह