aaji marathi quotes

संस्कार | Best aaji marathi quotes 2023

प्रा. शुभांगी धुमाळ यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत aaji marathi quotes विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

aaji marathi quotes

काव्यबंध समुह आयोजित
काव्यलतिका स्पर्धा
दि.१४ सप्टेंबर २०२३
विषय -आजीचा छकुला

संस्कार | aaji marathi quotes

संस्कार | Best aaji marathi quotes 2023

आजी आणि आजोबा
लाड करतात नातवंडाचे…
संस्काराचे धडे देऊन
सोबती असतात सुखाचे…

नातवंडांसोबत समरस होऊन
त्यांना हवे ते खेळ खेळतात…
एकत्र सर्व आरडा-ओरडा करून
संपूर्ण घर डोक्यावर घेतात…

आजीने बनवलेल्या गोड-धोड
पदार्थांचा मस्त आस्वाद घेतात…
तिच्या हातचे वेगवेगळे पदार्थ खाऊन
सर्व नातवंडे तृप्तीचा ढेकर देतात…

आजी घास भरवते
नातवंडांना प्रेमाने….
गोड घास तो मायेचा
तृप्त करी वेगाने….

तुम्ही किती महत्त्वाचे आहात
अशक्य आहे शब्दात सांगणे…
ज्यांच्याकडे आहेत आजी-आजोबा
नातवंडांचे आदर्श असे वागणे…

आजी-आजोबाच शिकवतात
माया- ममता, प्रेम -जिव्हाळा…
काळजी आणि कुतूहल सोहळा
आपुलकी आणि सर्वांविषयी लळा…

आजी आजोबांचे अनुकरण
नातवंडे सदा करती…
खण तशी माती
जपतात सर्व नाती…

उत्तमो-उत्तम आयुष्य घडते
आजी-आजोबांच्या संस्काराने….
सेवा त्यांची करण्याचे भाग्य लाभो
जीवन फुलेल नातवंडांचे आशीर्वादाने…

प्रा. शुभांगी धुमाळ – रानवडे
उरूळी कांचन,
पुणे

aaji marathi quotes

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *