सौ. अनिता डोंगरवार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत aaji mhanje kay poem in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.
aaji mhanje kay poem in marathi
काव्यबंध समुह आयोजित
काव्यलतिका स्पर्धा
दि.14 सप्टेंबर
विषय -आजीचा छकुला
आजी माझी मैत्रीण | aaji mhanje kay poem in marathi

शेतकरी होते आजी आजोबा
शिक्षण देवुन साक्षर झाले बाबा
जुन्या विचाराची पण गोड स्वभावी
बाबा रागावले पदराखाली लपवी …….
सणावारी लाड माझे पुरवी
आजी म्हणे मी तुझी मैत्रीण
हो बोलका माझ्याकडे तुझी अडचण
अनुभवाचा साठा होता मोठा
सुसंस्काराचा होता मोठा कोठा…..
जुने विचार आजीचे
नवे विचार आईचे
अनभन व्हायची थोडीफार
दोघींमधला मी घुसखोर
नाही हो म्हणत दोघींनाही हसवत……
झालो मोठा तरी माझ्यावर नजर
कोण मित्र कसा
वागण्यावरून होती ओळखत
मित्रांशी साधायची संंवाद
त्यांना पण द्यायची थोडे संकार
आजी माझी मैत्रीण
झाली माझ्या मित्रांची पण मैत्रीण……
आलेल्या समस्यांना चुटकिशी सोडवी
विज्ञान युगातला आजीचा छकुला
मानतो त्या जून्या सोन्याला
अडाणी होती तरी मानायची विज्ञानाला……
आजीचे दोन छकुले
घेत होते संस्काराचे धडे
जीवनात यशस्वी झालो
धन्य ती आजी अन् आई बाबा
आजी माझी मैत्रीण
गर्वाने सांगतो सर्वांना
सौ.अनिता डोंगरवार
मु. पो.जि.गोंदिया

aaji mhanje kay poem in marathi
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह