रवी आटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत aaji quotes in marathi text विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.
aaji quotes in marathi text
काव्यबंध साहित्यसमूहाच्या स्पर्धेसाठी
विषय-आजीची छकुली
आजीच्या पाऊल खुणा | Aaji Quotes in Marathi text

माझ्या आजी वर
कविता लिहिणे कठीण आहे
कवितेवर कविता कशी लिहावी
माझी आजी
एक जिवंत कविता होती
तुमच्या माझ्यासारखा
हाडामासाचाच जीव
पण तिच्या व्यक्तित्वात
विधात्याचे एक वलय होते
निर्मळतेचे
नखशिखांत व्यापलेल्या
तिच्या चेतनेने माझ्यावर
दृष्टी धरून ठेवली होती
ममत्वाची
आजी आता नाही
आठवणी मात्र तिच्या
अनंत आहेत
दिवस रात्र
ईश्वराच्या
आशीर्वादासारख्या
माझ्या अवतीभवती
गिरक्या मारत असतात
ती होती माझी मैत्रीण
अनेक मैत्रिणी असल्या तरी
तिच्या मैत्रित मी
सर्वजणींना विसरले
तिचे जीवनात असणे
कदाचित शब्दात मांडता येईल
तिचे जाणे शब्दात कसे मांडू
भल्या मोठ्या पोकळीला
शब्द कसे देऊ
पोकळी अशी आहे की
विस्तारतच जाते
काहीही थांगपत्ता लागत नाही
विज्ञानाच्या सिद्धांतानुसार
आजी माझी कुठेतरी असेलच
कोणत्यातरी निर्जन बेटावर
तिला नसेल गरज
अन्नाची पाण्याची
किंवा श्वासाची
मूर्त स्वरूपात देह
धारण केला असेल
व सतत बघत असेल
माझ्याकडे
तिला जाऊन
दोन वर्षे झालीत
या दोन वर्षात
ती कितीतरी
प्रकाश वर्षे
दूर गेली असेल
ती कितीही दूर गेली
तरी ती मला
स्पष्ट बघू शकत असेल
हमखास
नातेच आमचे तसे होते
आहे व राहील!!!
रवी आटे
सानपाडा
14 सप्टेंबर 2023
aaji quotes in marathi text
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह